कॅट परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ…

0

पुणे :

कॉमन ऍडमिशन टेस्ट (कॅट) परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. जे उमेदवार यापूर्वी अर्ज करू शकले नाहीत, त्यांना आता अर्ज भरता येणार आहे. 20 सप्टेंबर पर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर होती.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. राखीव आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांसाठी 45 टक्के गुण आवश्यक आहेत. ही परीक्षा 24 नोव्हेंबर 2024 रोजी देशभरातील 170 शहरांमध्ये विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.

देशातील 22 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएमएस) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अर्ज करू शकतात. यावर्षी कॅट परीक्षेच्या अर्जाच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन हजार 400 रुपये शुल्क होते. ते वाढवून यावर्षी दोन हजार 500 रुपये करण्यात आले आहे. आरक्षित आणि दिव्यांग श्रेणीसाठी एक हजार 200 रुपये शुल्क होते. ते आता एक हजार 250 रुपये करण्यात आले आहे.

See also  पुणे महानगर राहण्या करिता सर्वात्तम शहर विकसित करावे : उद्धव ठाकरे