पहा भारतीय जनता पक्षाचा विकासनामा – भाग 2. नगरसेवक अमोल बालवडकर.

0

बालेवाडी  :

भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर प्रभागात केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा आपल्या समोर अमोल बालवडकर यांनी मांडला आहे. त्यामुळे केलेल्या कामाची माहिती “भारतीय जनता पक्षाचा विकासनामा” या व्हिडिओ मालिकेतून आपल्यापर्यंत पोहचवत आहे.

प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी एमएनजीएल कनेक्शन बसवण्याच्या हेतूने विविध सोसायटीच्या नागरिकांची २ वर्षांपूर्वी याच दिवशी बैठकीचे आयोजन करून या कामाचा श्रीगणेशा केला होता. एमएनजीएल कनेक्शनचे दर स्वस्त आहेत, सिलेंडर सारखे याला ट्रान्सपोर्ट करावे लागत नाही, वापरण्यास सुरक्षित व जागेची बचत होते असे अनेक फायदे आहेत. बाणेर-बालेवाडीसह प्रभागात १०९ सोसायटींमध्ये एमएनजीएल कनेक्शन देण्यात आले आहेत व यातून तब्बल ७००० कुटुंबाना फायदा झाला.

एमएनजीएल कनेक्शनच्या अनेक वापरकर्त्या कुटुंबांपैकी एक सायखेडकर परिवाराची प्रतिक्रिया जाणून घेतली. वापरण्यास सुलभ, पैश्यांची बचत व सिलेंडरसारखे बदलण्याची याला गरज नाही यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या वर्षभरात संपूर्ण प्रभाग सिलेंडर मुक्त करण्याचा आमचा मानस आहे व त्यादृष्टीनेच आम्ही कार्य करू.

भारतीय जनता पक्ष नेहमीच नागरिकांचा विचार करून विकासाचे कार्य करत आला आहे. आपला नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभागात झालेली विकास कामे असेच सुरू राहतील व प्रभागाचा होणारा विकास अमूलाग्र असेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो.

हे कार्य लवकरत लवकर पूर्णत्वास नेण्यात मदत केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पुण्यनगरीचे खासदार गिरीशजी बापट, शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक व एमएनजीएलचे संचालक श्री. राजेश पांडे यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मॅक न्यूज. लाईव्ह शी बोलताना दिली.

See also  बालेवाडी येथील रहिवाशांनी कर वसुली बद्दल दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महानगरपालिकेला नोटीस