चालत्या ट्रेमधून तरुणीला बाहेर फेकले, मुंबई-पूणे उद्यान एक्सप्रेस मधील प्रकार.

0

मुंबई :

बईमुंबई-पुणे उद्यान एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमध्ये एका तरुणीवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणीने प्रतिकार केल्यावर त्या व्यक्तीने तिला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेमध्ये डब्यात चढण्यावरुन २९ वर्षीय तरुणीचा वाद एका माणसाशी झाला. गाडी दादर स्टेशनवर पोहोचल्यावर लेडिज डब्यातून सर्व महिला खाली उतरल्या. त्यावेळी ही तरुणी डब्यात एकटीच होती. तिला एकटं पाहून या व्यक्तीने लेडिज डब्यात चढून तिच्यावर हल्ला केला.मात्र, तरुणीने प्रतिकार केल्यावर या झटापटीत या हल्लेखोर व्यक्तीने त्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले.

सुदैवाने तरुणी प्लॅटफॉर्मवर पडली. जखमी झाल्याने ती बेशुद्ध झाली.आरोपी त्याविळी दारुच्या नशेत होता. लेडिज डब्यात चढताना झालेल्या वादातून त्याने हे कृत्य केलं. पोलिसांनी या हल्लेखोराला छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनलवरुन अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

See also  ओबीसी आरक्षणावरील मागासवर्ग आयोगाचा अंतरीम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला