वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालया जवळ असलेल्या गिरीजाशंकर विहार सोसायटीत अचानक जमीन खचून पडला 15/20 फूट खोल खड्डा

0

वारजे :

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालया जवळ असलेल्या गिरीजाशंकर विहार सोसायटीत असलेल्या विहिरीजवळ पार्किंग कॉलम लगत अचानक जमीन खचली व त्यामुळे 15/20 फूट खोल खड्डा झाला आहे. अग्निशमन अधिकारी आले असुन खबरदारी घेत कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मा. मनपा आयुक्तांशी संपर्क साधला व सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. आयुक्त विक्रमकुमार यांनी त्वरित वरिष्ठ अधिकारी युवराज देशमुख, बिपीन शिंदे, अग्निशमन चे पोटफोडे साहेब व त्यांची टीम जागेवर पाठवली. यावेळी घटनास्थळी पो. नि. संगीता पाटील मॅडम व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली तसेच जवळच राहणारे आर्किटेक्ट प्रकाश कुलकर्णी, स्ट्रकचरलं इंजिनियर निंबाळकर यांनी देखील घटनास्थळी अधिकाऱयांना मार्गदर्शन केले.

यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वानुमते हा खड्डा त्वरित / आत्ता रात्रीच RMC ने बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या खोल खड्ड्यातील गॅस पाईपलाईन व पाण्याची लाईन चे कामं करून ( त्या वर उचलून ) इमारतीस धोका पोहोचू नये म्हणून आता खड्डा बुजविण्यात येतं असल्याची माहिती संदीप खर्डेकर (प्रवक्ता, भाजप. महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून प्राप्त झाली.

See also  अभिजितदादा कदम मित्र मंडळ व प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्ताने गुणवंत क्रिडा प्रशिक्षकांचा सत्कार...