शिवम सुतार यांच्या वतीने महिलांचे प्रबोधन व्हावे म्हणून दाखविला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट..

0

पुणे :

माजी स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार यांच्या वतीने सुतारवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी, पंचवटी, सुस या परिसरातील तरुणींना आणि महिलांसाठी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन करण्यात आले होते.

याबद्दल माहिती देताना माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी सांगितले की, लव्ह जिहाद चे भयाण वास्तव दाखवणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ चे आपल्या माध्यमातून मोफत आयोजन करण्यात आले होते. तब्बल २०० महिला भगिनी आणि तरुणींनी हा चित्रपट पाहिला. लव्ह जिहाद म्हणजे नक्की काय ? तसेच यावर महिला भगिनींमध्ये, तरुणींमध्ये प्रबोधन व्हावे, या हेतूने आपण या उपक्रमाचे आयोजन केले होते.

सुतारवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी, पंचवटी, सुस या परिसरातील तरुणींनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत या उपक्रमाला प्रतिसाद दर्शवला. याबद्दल महिला भगिनी आणि तरुणींचे आभार व्यक्त करतो असे शिवम आबासाहेब सुतार यांनी सांगितले.

See also  भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी अमोल बालवडकर यांचा कसबा मतदारसंघात प्रचार: स्थलांतरित मतदारांसाठी तयार केली लिंक