मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समजून घेतला महाराष्ट्राचा भौतिक आणि मंदिर स्थापत्य इतिहास.

0

पुणे :

गणेशखिंड येथिल मॉडर्न महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने महाराष्ट्राचा भौतिक आणि मंदिर स्थापत्याचा इतिहास समजून घेण्यासाठी इतिहास अभ्यास दौऱ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यासाठी इतिहास विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग घेतला.

इतिहास विषयातील कौशल्य वृद्धी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अवगत व्हावा तसेच , महाराष्ट्राचा भौतिक इतिहास आणि मंदिर स्थापत्य समजून घेण्यासाठी पुणे शहरापासून जवळच असलेल्या जेजुरी, मोरगाव, भुलेश्वर, थेऊर आणि रामदरा या ऐतिहासिक स्थळांची निवड इतिहास विभागाच्या वतीने करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी जेरुरीगडाचा इतिहास, जेजुरी आणि पेशवे संबंध तसेच येथील हेमाडपंथी स्थापत्य शैली समजून घेतली.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्याचे वेरूळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गाजवळील भुलेश्वर शिवमंदिराला भेट दिली. या मंदिराशी संबंधीत यादव कालखंड, पाच पांडव, बेसॉल्ट खडकातील शिल्प आणि स्थापत्य समजून घेण्यात आले. यासंदर्भात डॉ श्वेता सावले यांनी विद्यार्थ्यांना स्थळ ठिकाणी मार्गदर्शन केले.

अर्वाचीन इतिहासाशी संबंधीत आणि राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती असलेले तसेच शिव देवस्थान म्हणून ओळख असलेल्या रामदारा या स्थळाला भेट देण्यात आली. यानंतर थेऊरच्या चिंतामणी मंदिराजवळच मराठा साम्राज्यातील चौथे पेशवा माधवराव यांच्या समाधी स्थळास भेट देण्यात आली. याद्वारे पेशवे आणि चिंतामणी गणपती मंदिर यांच्यातील संबंध समजून घेतला .

या सर्व स्थळांशी संबधित इतिहास , लोकपरंपरा, दैवतं , मौखिक परंपरा समजून घेणे हे, इतिहास अभ्यास दौऱ्याचे उद्दीष्ट होतं. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणातील अनुभवा-आधारित शिक्षण (experiential learning) हे वैशिष्ट्य समोर ठेवून, इतिहास अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, इतिहास अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक स्थळांची माहिती इतिहास विभागातील डॉ. श्वेता सावले, डॉ.गुंजन गरुड , श्वेता ओहाळ आणि प्राजक्ता यादव यांनी दिली.

याचे समन्वय प्रा किशोर मोरे यांनी केले. या इतिहास अभ्यास दौऱ्यासाठी मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडचे प्राचार्य डॉ. संजय खरात सर, कला शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. ज्योती गगनग्रास मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या पाठींब्यामुळेच इतिहास अभ्यास दौरा यशस्वी झाला.

See also  पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता