“पाणी टंचाई, दूषित पाणी किंव्हा टँकर” ही समस्या नाही तर नेता ही समस्या आहे. समस्या कायमची सोडवायला आप ला संधी द्या..

0

पुणे :

सर्वसामान्य नागरिकांचा पाणी, रस्ते, स्वच्छता या आपल्या समस्या नाहीत तर हे प्रश्न सोडवणारा योग्य उमेदवार,पक्ष आपण निवडून दिला नाही ही आपली समस्या आहे. असे आम आदमी पार्टीचे राज्य सहभागी गोपाल इटालिया यांनी सांगितले. पाणी प्रश्न संदर्भात धायरी येथे आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित पाणी परिषदेच्या वेळी ते बोलत होते.

यावेळी सहप्रभारी महाराष्ट्र राज्य गोपाल इटालिया, महाराष्ट्र राज्य संयोजक रंगा राजुरे , महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, शहर समन्वयक अभिजीत मोरे, पाणी परिषद आयोजक आणि धायरी मधून आप चे इच्छुक उमेदवार धनंजय बेनकर, आप युवा राज्य संघटक संदीप सोनवणे, शहर संघटक एकनाथ ढोले , शहर संपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, आप मीडिया प्रमुख सुदर्शन जगदाळे, जल हक्क आंदोलन समिती अध्यक्ष आबासाहेब कांबळे, किशोर मुजुमदार, प्रीतम कोंढाळकर, राजाभाऊ बेनकर, राहुल बेनकर, संदीप बेनकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला धायरी गाव परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय बेनकर यांनी केले होते.

यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने जलहक्क आंदोलन समितीच्या पाणीपुरवठा प्रश्न बाबत करण्यात आलेल्या पाठपुराव्या संदर्भात माहिती देण्यात आली. शहरात असलेली अपूर्ण पाणीपुरवठ्याची कामे, चाळीस टक्के पाणी गळतीच्या नावाखाली होत असलेली पाणी चोरी, तसेच समाविष्ट गावांना दररोज पाणी मिळत नसल्याची बाब यावेळी मांडण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे म्हणाले, स्मार्ट सिटी मध्ये पाणी मिळत नसेल तर याला सध्याचे सरकार जबाबदार आहे. नागरिकांनी आम आदमी पार्टी सोबत रस्त्यावर उतरून स्वतःचा पाणी प्रश्न सोडवून घ्यावा.

विजय कुंभार “या देशाचे मालक जनता आहे, प्रशासन काम करत नसेल, सध्याचे नेते काम करत नसतील तर नेते बदला. आप ला या वेळी संधी द्या पुणे शहर टँकर मुक्त करू”

See also  नांदे गावात विकास पॅनलचे सहा तर परिवर्तन पॅनलचे तीन सदस्य निवडून आले.

यावेळी धायरी गाव परिसरातील महिलांनी आपला पाणी प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमोर यावेळी उपस्थित केला. फक्त पाईपलाईन व टाक्यांवर खर्च नको तर त्यामध्ये पाणी द्या असा प्रश्न यावेळी मांडण्यात आला.