मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा लढायला तयार राहा – मराठा क्रांती मोर्चा, महाराष्टू

0

फलटण :

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी या शिंदे फडणवीस सरकारने ठोस पावले उचलावीत,तसेच आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून संपूर्ण महाराष्ट्रात नव्या जोमाने समाज एकवटावा यासाठी मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्याने सुरुवात करावी यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्गदर्शक यांनी फलटण येथे बैठक आयोजित केली होती, त्या मध्ये आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घ्यायचेच आणि तेही ५०% च्याआत ओबीसीमधूनच असा नारा देत पुनःश एकदा हरिओम म्हणत बिवड बदलत नव्या जोमाने सुरुवात करायची असा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चा ची फलटण तालुक्यातील सर्व मराठा समाजातील असलेले समन्वयक यांची बैठक जिल्ह्याचे प्रमुख मार्गदर्शक विवेकानंद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, यावेळी फलटण तालुक्यातील प्रमुख समन्वयक CMS , WMO यांचे प्रतीनीधी उपस्थित होते, यावेळी सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले, व त्या नंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी व नव युवकांना वाव देत गाव ते जिल्हा केडर बेस मराठा क्रांती मोर्चा संघटण निर्मीती साठी येत्या 28 जानेवारी ला स्वराज मंगल कार्यालय सातारा येथे १ वाजता जिल्यातील अकरा तालुक्यातील सर्व समन्वयक व मार्गदर्शक यांची बैठक घेण्यात येणार आहे.

त्या मध्ये सर्वानुमते पुढील दिशा ठरविण्यात येणार असून येणाऱ्या काळात मराठा समाज पुन्हा एकवटून आरक्षणा सह समाजाच्या इतर सर्व प्रमुख विषयांच लढा अधिक तीव्र करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवावी लागेल,व जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन व जे येणार नाहीत त्यांना सोडून हा लढा पुढे न्यायचा असल्याने आता मतभेद बाजूला सारून न्यायालयीन लढ्याबरोबरच रस्त्यावरील लढ्याला सज्ज राहण्याची तयारी दर्शविली आहे.यावेळी फलटण तालुक्यातील सर्व समन्वयक या बैठकीला उपस्थित होते.

See also  संजय राऊत यांच्या पत्नीस ईडीची नोटीस ?