पुण्यासारख्या शहरात मेट्रोची काय गरज : राज ठाकरे

0

पुणे:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत “नवं काहीतरी” या विषयावर व्याख्यान दिलं. राज ठाकरे यांनी यावेळी राजकारण, नगर नियोजन, महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारणाची घसरलेली पातळी, राजकारणपासून दूर राहणारा समाज या सर्व गोष्टींवर भाष्य केलं.

यावेळी नगररचना, शहरांची नेमकी गरज यावर बोलताना राज ठाकरेंनी पुणेकरांना बरेच चिमटे काढले मात्र, त्यासोबत राज्य सरकारचे (Govt) कानही टोचले.

१९९५ च्या आधीच्या पुण्यात आणि त्यानंतरच्या पुण्यात अनेक बदल झाले आहे. त्यावेळी नदी पलीकडचं पुणं आणि नदी अलीकडचं पुणं असे पुण्याचे केवळ दोन भाग होते. मात्र आता पुणं वाढत आहे. अनेक गाव पुण्यात समाविष्ठ झाले आहेत. त्यामुळे पुण्याचं रुपडं पालटलं. आता पुणं हिंजवडी, महाळुंगेपासून मगरपट्टापर्यंत पुणं पसरलं आहे. त्यामुळे मी मागील अनेक भाषणांमध्ये सांगत असतो कि मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असं ते म्हणाले.

‘प्रत्येक शहराचा एक स्वभाव असतो. त्यानुसार विकासकामं झाली पाहिजे. आता पुणे आणि नागपूरचंच पाहा.. तिथलं लोकं मारली किक की निघाले… पुणेकर तर घेतला शेला अन् निघाले. म्हणजेच इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा लोकं स्वत:च्या वाहनांना अधिक प्राधान्य देतात. अशावेळी अशा शहरांमध्ये मेट्रोसारखी व्यवस्था काय कामाची?, इथं आपण रिकाम्या मेट्रो का पळवतोय?’ असा सवाल करत राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली.

See also  पुण्यात 100% लसीकरण करण्यासाठी महापालिकेची 'हर घर दस्तक' मोहीम सुरू