बालेवाडी हायस्ट्रीट येथील अनाधिकृत हॉटेलवर अतिक्रमण कारवाई. इतर अनाधिकृत हॉटेल वर ही होणार कारवाई

0

बालेवाडी :

बालेवाडी हाईस्ट्रीट ला अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई करत टेरेस वरील व साईड मार्जिन मधील मदारी हॉटेल चे अतिक्रमण पाडले सदर कारवाई करवाई बांधकाम विकास विभाग झोन तीन च्या वतीने करण्यात आली.

बाणेर बालेवाडी परिसरामध्ये असलेल्या टेरेस हॉटेलवर प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील अनाधिकृत हॉटेल व टेरेस वरील अनधिकृत बांधकामावर कारवाईचे मागणी सातत्याने नागरिक करत होते.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने टेरेस हॉटेल वरील कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाईला सुरुवात करत हायस्ट्रेट वरील दोन हॉटेलवर कारवाई करण्यात आली.

कनिष्ठ अभियंता गंगाप्रसाद दंडिमे यांनी सांगितले की, सदर अतिक्रमण नोटिस पाठवल्या होत्या. सदर सर्व टेरेस वरील तसेच हॉटेलच्या पार्किंग परिसरातील बांधकामे अनाधिकृत आल्याने कारवाई केली आहे. इतर अनधिकृत हॉटेल वर देखिल पुढील काळात कारवाई केली जाणार आहे. सदर करावाई कार्यकारी अधिकारी श्रीकांत वायदंडे, उप अभिंता जयवंत पवार, संग्राम पाटील, गंगाप्रसाद दंडिमे, संदेश कुळवमोडे यांच्या उपस्थितीत झाली.

See also  सुस, म्हाळुंगे गावातील प्रश्न संदर्भात डॉ. सागर बालवडकर यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट.