ISRO साठी निवड झालेल्या निकिता सुपेकर हिचा बाणेर नागरी पतसंस्थेचे वतीने सन्मान.

0

बाणेर :

बाणेर येथील निकिता जितेंद्र सुपेकर यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग डेहराडून येथे एम टेक इन रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस साठी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल तिचा सन्मान डॉ दिलीप मुरकुटे पाटील आणि बाणेर नागरी पतसंस्था बाणेर यांच्या वतीने पुणे बार असोसिएशन अध्यक्ष पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डॉ‌. दिलीप मुरकुटे पाटील यांनी निकिता सुपेकर यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आपल्या बाणेर गावचे नाव निकिताने देश पातळीवर झळकावले आहे. तिच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो आहे. भविष्यात देखील तिने अजून उंची गाठावी यासाठी शुभेच्छा आहे. भविष्यात कोणती अडचण आल्यास आम्ही खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही यावेळी देत आहे.

या वेळी पांडुरंग थोरवे यांनी सांगितले की, निकिता सुपेकर हिने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये देशामध्ये दुसरा क्रमांक मिळवला असून यासाठी देशभरातून सहा जणांची निवड करण्यात आली आहे. हि अभिमान वाटावा अशी बाब आहे. बाणेर नागरी पतसंस्था नेहमीच परिसरातील नागरिकांना पाठींबा देवुन सहकार्य करत असते.

सत्काराला उत्तर देताना निकिता सुपेकर म्हणाल्या की, बाणेर नागरी पतसंस्था आणि डॉ. दिलीप मुरकुटे यांनी केलेलं कौतुक माझ्यासाठी खुप आनंददायी आहे. सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा पुढील वाटचालीस उत्साह वाढविणाऱ्या आहेत. कोल्हापूर विद्यापीठातून नॅनो टेक्नॉलॉजी मधून पदवी तर पुणे विद्यापीठातून एम.एस.सी. पर्यावरण शास्त्र अभ्यासक्रम मी पूर्ण केला आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग डेहराडून येथे एम टेक इन रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस साठी निवड करण्यात आली. माझ्या यशात माझ्या कुटुंबीयाबरोबर मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेल्या सर्वांचे सहकार्य लाभले. सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद यावेळी तिने मानले.

यावेळी पुणे महानगर पालिका मुख्याधिकारी राकेश विटकर, बाणेर नागरी पतसंस्था अध्यक्ष राजेंद्र शेडगे, उपाध्यक्ष संजय ताम्हाणे, ॲड. दिलीप शेलार, पिरंगुट शाखाध्यक्ष राम गायकवाड, संचालिका शितल भुजबळ, रूपाली सायकर, कमल दर्शने, तज्ञ संचालक नामदेव कळमकर, बाणेर शाखाअध्यक्ष ऋषभ मुरकुटे, संचालक आकाश धनकुडे, कैलास आटोळे आदी उपस्थित होते.

See also  बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम