शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वरवाडी येथे भव्य रक्तदान शिबिर

0

सोमेश्वरवाडी :

शिवराज्यभिषेक दिवस म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांच्या वतीने श्री शिवशंभु चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने रविवार दि. ५/६/२०२२ रोजी सकाळी ९ : ०० ते ४ : ०० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिराची माहिती देताना माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ओजस्वी विचारांनी प्रेरित होऊन शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला, ५ जून २०२२ रोजी सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.  मागील वर्षी आम्ही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास आपण भरभरून प्रतिसाद देत मोठया संख्येने रक्तदान केले होते. मागील वर्षी जनतेच्या उस्फुर्त सहभागामुळेच तब्बल ४३८ बॉटल रक्तसंकलन करणे आम्हाला शक्य झाले होते.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. निरोगी समाजासाठी युवकां बरोबरच ज्यांना ज्यांना शक्य होईल अशा सर्वांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा ठेवा जपावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असून समाजासाठी नेहमीच उपयोगी पडण्यासाठी अग्रेसर राहिले पाहिजे. म्हणून  माझी परिसरातील सर्व नागरिकांना, युवकांना विनंती आहे की, मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील जास्तीत जास्त नागरिकांनी युवकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन निरोगी समाजासाठी हातभार लावावा असे आव्हान करत आहे. शिबिरात रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देखील दिल्या जाणार आहे. चला तर मग,  ५ जूनला रक्तदान शिबीरास भेट देण्यास विसरू नका. आम्ही आपल्या प्रतीक्षा करत आहोत.

संपर्क:- 8308123555

दिनांक ५ जुन २०२२
वेळ सकाळी ९ ते सायं ४ पर्यंत
स्थळ:- सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी, पाषाण पुणे-411008

See also  शाहीर अण्णा भाऊ साठे १०१ वी जयंती बालेवाडीत उत्साहात साजरी...