पुणे मेट्रोसाठी बोगदा खणण्याचे सगळ्यात अवघड काम पूर्ण….

0

पुणे :

कसबा पेठेतील साततोटी पोलीस चौकीच्या पुढे जमिनीखाली २८ मीटर खोलीवरचा कातळ फोडून मेट्रोचे भुयार खोदणारे टीबीएम मशीन बाहेर आले आणि बाहेरच्या कर्मचाऱ्यांनी ‘ भारत माता की जय ‘ म्हणून तिरंगा घेऊन त्यांचे स्वागत केले.

याबरोबरच पुणे मेट्रोसाठी बोगदा खणण्याचे सगळ्यात अवघड काम पूर्ण झाले.

शिवाजीनगरकडून आलेले दोन आणि स्वारगेटकडून आलेले दोन असे एकुण १२ किलोमीटर बोगद्यांचे काम आज शनिवारी पुर्ण झाले. आता भुयारी स्थानकांचे काम सुरू असून मार्च २०२३ मध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट ही मेट्रो लाईन सुरु होऊ शकेल.

मंडईपासून या बोगद्याचे काम सुरु करण्यात आले होते. दुपारी बरोबर बारा वाजता साडेसात मीटरचा गोल आकाराचा कातळ भेदत मशिन बाहेर आले. याआधी याच मार्गाने एक बोगदा कसबा पेठेत येऊन पोहोचला होता. शिवाजीनगरपासून सुरु होणारे दोन बोगदेही कसबा पेठेत आले होते. आज चौथा बोगदा पुर्ण झाला. कसबा पेठेत आता चार बोगदे एकत्र आले आहेत. या जागेत मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. त्यातील शिवाजीनगर आण स्वारगेट स्थानकांची कामे जोरात सुरु आहेत. मंडई आणि कसबा पेठ या स्थानकांची कामे रेंगाळली होती. आता बोगद्यांचे काम पूर्ण झाल्याने त्या कामांनाही आता वेग येईल.

 

See also  पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्प लवकरच पुर्ण होणार : गिरीश बापट