अपुरे मनुष्यबळ अभावी उद्घाटनाची घाई केलेली अग्निशमन केंद्र बंद.

0

पुणे :

रविवारी पुण्यात अनेक उद्घाटन पार पडली आहेत. एकाच दिवसात पुणेकरांनी तब्बल 50च्यावर उद्घाटनं शहरात झालेली पहिली. त्यात रस्ते, उड्डाणपूल, पाणी योजना, आणि अनेक उद्यानांचा देखील समावेश आहे. याचबरोबर रविवारी पुण्यात तब्बल तीन अग्निशमन केंद्राचेदेखील उद्घाटने करण्यात आली आहेत. पण उद्घाटनाच्या काही तासानंतर ही तिन्ही अग्निशमन केंद्र अग्निशमन दलाला बंद करावी लागली आहेत.

प्रतिक्रिया
‘या’ कारणामुळे पाच अग्निशमन केंद्र बंद अवस्थेत

पुणे शहरात फेब्रुवारी महिन्यात दोन, तर रविवारी एकूण तीन अग्निशमन केंद्राचे उद्घाटन झाले. नव्याने सुरू झालेली ही पाचही अग्निशमन केंद्र अग्निशमन दलाला बंद करावी लागली आहेत. याला कारण ठरल आहे ते अग्निशमन दलाकडे असलेल्या मनुष्यबळाचा अभाव. केवळ मनुष्यबळाचा अभाव असल्याने आणि गेल्या अनेक महिन्यांपासून अग्निशमन केंद्रात पदांची भरती न झाल्याने अग्निशमन दलाला नव्याने सुरू करण्यात आलेली पाचही अग्निशमन केंद्रे बंद करावी लागली आहेत.

या 5 अग्निशमन केंद्रांना टाळे –

फेब्रुवारी महिन्यात शहरात सिंहगड रोड आणि गंगाधाम चौक येथे दोन अग्निशमन केंद्र उभारण्यात आली होती. रविवारी एकाच दिवसात वारजे, धानोरी आणि मुंढवा या ठिकाणांच्या अग्निशमन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या या पाचही अग्निशमन केंद्राला आता टाळे लावण्याची नामुष्की अग्निशमन दलावर आली आहे. याचं कारण ठरलंय ते म्हणजे अग्निशमन दलात असणाऱ्या मनुष्यबळाचा अभाव आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अग्निशमन दलात अजूनही 500 पदे रिक्त –

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या अग्निशमन केंद्रांमध्ये जवळपास अधिकारी आणि कर्मचारी मिळून ९१० पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास 500 पदे रिक्त असल्याची माहिती देखील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यातच अग्निशमन दलाचा वाढता ताण लक्षात घेता, दलाला मदत म्हणून ५० कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले होते. त्याचबरोबर आणखी 200 कामगारांची भरतीही कंत्राटी पद्धतीने करावी, असा प्रस्ताव देखील महापालिकेला पाठविण्यात आला असल्याची माहिती माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

See also  शिवजयंती साजरी करण्याबाबत नियमावली सादर केली जाईल : महापौर

पुणे शहरात अग्नीशमन केंद्रांचा अभाव –

पुणे शहरात सध्या एकूण 73 अग्निशमन केंद्रांची गरज आहे. पण शहरात सद्यस्थितीला केवळ 14 अग्निशमन केंद्र आहेत. त्यातही मनुष्यबळाचा अभाव असल्याने अग्निशामन दलावर मोठा ताण पडत असल्याचं लक्षात येत आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यातच आधी 11 आणि आता तब्बल 23 गावांचा समावेश हा पुणे महापालिकेत झाल्याने भौगोलिक दृष्ट्यादेखील पुणे महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून उदयास आली आहे. अशा परिस्थितीतदेखील अग्निशमन दलाला मनुष्यबळाचा अभाव असल्याने अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपुरे मनुष्यबळ असताना उद्घाटनाची घाई कशासाठी केली. हा मोठा प्रश्न आहे.