नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या वतीने महिलांना ई श्रम कार्ड वाटप…!

0

बाणेर :

महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या वतीने परिसरातील महिलांना ई – श्रम कार्ड वाटप करण्यात आले. परिसरातील गोरगरीब कष्टाळू कामगार महिलांना याचा लाभ होणार आहे.

यावेळी बोलताना नगरसेविका स्वप्नाली सायकर म्हणाल्या की, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. स्वतःचा लौकिक महिला स्वतः मिळविते. म्हणूनच महिला दिनानिमित्त असंघटित महिलांना ई श्रम कार्ड वाटप करत आहोत त्यामूळे महिलांना या कार्ड निमित्त फार फायदा होईल. सर्व महिलांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

यावेळी 400 महिलांना ई – श्रम कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका स्वप्नाली सायकर आणि भाजपा नेते प्रल्हाद सायकर उपस्थित होते.

See also  म्हाळुंगे येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन भाजपच्या वतीने संपन्न.