बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या…!

0

बाणेर :

बाणेर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा लावणारा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक सुवर्ण क्षण आला आहे. उद्या शुक्रवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता स्वराज्य प्रतिष्ठान, बाणेर यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या अखंड हिंदूस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (खासदार राज्यसभा), आमदार चंद्रकांतदादा पाटील (भाजपा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य), सिनेअभिनेते नाना पाटेकर (संस्थापक नाम फाउंडेशन) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर अध्यक्ष-औंध-बाणेर प्रभाग समिती सदस्य-पुणे जिल्हा नियोजन समिती आणि प्रल्हाद रामभाऊ सायकर संस्थापक, अध्यक्ष-स्वराज्य प्रतिष्ठान बाणेर आणि समस्त बाणेर ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खासदार गिरीश बापट, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाची माहिती देताना स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सायकर यांनी सांगितले की, संपूर्ण हिंदुस्थान चे हृदय स्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा होत आहे. ही बाब बाणेर गाव आणि परिसरातील सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. अशा आपल्या लाडक्या राजाच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आग्रहाची विनंती आहे.

See also  राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान