बालेवाडी वुमन्स क्लब च्या वतीने वसंत पंचमी सोहळा उत्साहात पार…

0

बालेवाडी :

सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी बालेवाडी वुमन्स क्लब च्या वतीने एसकेपी कॅम्पस येथे वसंत पंचमीच्या सोहळा, हळदी कुंकू व स्नेहभोजना चे आयोजन केले होते. कोविडनंतर जवळजवळ दोन वर्षांनी कार्यक्रम होत असल्याने उत्तम संख्येने या भागातील महिलांनी उपस्थिती दर्शविली.

क्लबच्या संस्थापिका प्राध्यापिका रूपाली बालवडकर यांनी दीप प्रज्वलन केले. क्लब ची सेक्रेटरी प्राची सिद्दिकी यांनी कार्यक्रमाची आखणी आणि संपूर्ण सूत्रसंचालन केले. क्लबच्या उपाध्यक्ष मित विज यांनी व्यवस्थापन बघितले. जुईले गोरे यांनी वसंत पंचमी ची माहिती दिली तर सुनंदिता दास गुप्ता यांनी सुंदर कथक नृत्य सादरीकरण करून रंगत आणली.

गायिका योगिता बडवे व सोनिया अहुजा यांनी गानसम्राज्ञी लता दीदींना श्रवणीय गाण्यांनी श्रद्धांजली वाहिली. उपस्थितांनी सोनाली कुलकर्णी, सौम्या सिंग यांच्या नृत्याला व अंशुमाला सिंग यांच्या खेळांना भरभरून दाद दिली. मानसी पाटील आणि श्वेता बावठणकर यांनी स्टेजची व्यवस्था बघितली. विद्या पात्रीकर यांनी मीडिया चे काम बघितले. महत्वाचे म्हणजे डॉ. सागर गणपत बालवडकर यांच्या तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.

 

या कार्यक्रमाची माहिती देताना बालेवाडी वुमन्स क्लबच्या अध्यक्षा प्रा. रूपाली बालवडकर यांनी सांगितले की, महिलांना बऱ्याच काळापासून घरातून बाहेर पडत कार्यक्रमात सहभागी होता आले नव्हते. म्हणूनच वसंत पंचमी चे निमित्त साधून हळदी कुंकू आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बऱ्याच दिवसानंतर झालेल्या या कार्यक्रमाला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेक दिवसांनी झालेल्या या सांस्कृतिक मनोरंजनाच्या कार्यक्रम मुळे बालेवाडी मध्ये चैतन्य निर्माण झाले. बालेवाडी वुमन्स क्लब नेहमीच महिलांना एक वेगळे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करत असते. पुढील काळात देखील अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून महिलांना स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत.

See also  भाजप विरुद्ध महा विकास आघाडी क्रिकेट सामन्यांमध्ये भाजपचा निसटता संघर्षमय विजय....