सराफ व्यावसायिक मिलिंद मराठे यांचे निधन.

0

पुणे :

15 डिसेंबर रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे शहरातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिक मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांचे रविवारी सकाळी निधन झालंय.

रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर ही गोळी त्यांच्या शरीरातून काढून टाकण्यात आली. त्यांनंतर त्यांना आयसीयूमध्ये देखील हलवण्यात आलं होतं. हृदयाची क्रिया बंद पडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

मिलिंद मराठे शहरातील नामांकित मराठे ज्वेलर्सचे मालक आहेत. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडले होते. लॉक डाऊन च्या काळात त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. आर्थिक समस्येच्या तणावातून त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

See also  पुणे महापालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकाचं एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागासाठी