एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

0

मुंबई :

राज्यात एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या काही मागण्या घेऊन वेगवेळ्या स्वरूपातील आंदोलन करत आहेत.एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारमध्ये सहभाग करून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या सर्व सुविधा मिळाव्यात ही मागणी घेऊन कर्मचारी आंदोलन करत आहेत.

आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात “एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल.” अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी लिहीलेल्या पत्रावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1456222144002609154?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1456222144002609154%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  कोल्हापुरात धो धो पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर, राष्ट्रीय महामार्ग बंद.