सोमेश्वरवाडी ग्रामसंस्कृती उद्यानामध्ये दिवाळी पूर्वसंध्याला सुर तेची छेडीता या कार्यक्रमाचे सनी निम्हण यांच्या वतीने आयोजन.

0

सोमेश्वरवाडी :

पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी, औंध येथील नागरिकांना दिवाळी निमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून बहारदार गीतांचा “सुर तेची छेडता” हा दिवाळी पूर्व संध्या कार्यक्रम संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ठीक ६ : ०० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी संगीतमय मेजवानी ठरणार आहे. तसेच गौरी गणपती सजावट आणि डान्स स्पर्धेचा बक्षीस समारंभ देखील होणार आहे.

या कार्यक्रमा बद्दलची माहिती मॅकन्यूजला देताना सनी निम्हण यांनी सांगितले की, ही दिवाळी सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पसरवत आहे. या अश्या चैतन्यमय वातावरणात आपल्या सोबत आनंद साजरा करण्यासाठी आम्ही, सोमेश्वर फाऊंडेशन च्या वतीने, नागरिकांसाठी घेऊन येत आहोत, ‘सूर तेचि छेडिता’ हा बहारदार गीतांचा दिवाळी पूर्व संध्या कार्यक्रम. या दिवाळीचा आनंद सर्व मिळून एकत्र साजरा व्हावा म्हणून नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान त्यांनी केले.

स्थळ : संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, पाषाण
दि : बुधवार ३/११/२०२१ रोजी सायं. ६वा.

कलाकार :
जितेंद्र भुरुक,
राजश्री पवार,
अभिनेत्री सराफ,
अश्विनी कुरपे

सोबत भव्य वाद्यवृंद

आणि

गणपती सजावट आणि डान्स स्पर्धेचा बक्षीस समारंभ

संयोजक : माजी नगरसेवक सनी निम्हण, सोमेश्वर फाउंडेशन

See also  प्रकाश बालवडकर यांच्या सहकार्याने बालेवाडी येथे मोफत लसीकरण मोहीम