बालेवाडीतील अनाधिकृत बांधकामे पाडली पालिका अधिकारी म्हणाले…

0

बालेवाडी :

बालेवाडी येथे अनधिकृत बांधकामावर व पत्राशेडवर चार ठिकाणी पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून (झोन तीन) कारवाई करण्यात आली.

स्मार्ट सिटी म्हणून परिचित असणाऱ्या बालेवाडी येथील साई चौक, दसरा चौक, स. नं. ४४ आणि ४५ येथे मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे करुण पत्रा शेड टाकून दुकाने उभी करून व्यवसाय सुरू होते. ते पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आले.

बांधकाम विकास विभाग झोन तीन चे कनिष्ट अभियंता गंगाप्रसाद धमदिमे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बालेवाडी येथील साई चौक दसरा चौक जवळ अनधिकृत बांधकामे व पत्राचे शेड टाकून व्यवसाय सुरू होते. सदर जागा मालकांना नोटीस पाठवून सदर शेड काढून घेण्याचे सांगितले होते. परंतु ते काढून घेतल्याने १२ बांधकाम असणारी दुकाने आणि पत्र्याची शेड असणारे दुकाने पाडून सदरची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सदर अनधिकृतपणे उभे असणारे पत्राशेड, बांधकामे जेसीबीच्या साह्याने जवळपास १२००० चौ. मी. क्षेत्रावर पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई बांधकाम विकास विभाग झोन तीन चे उपअभियंता जयवंत पवार, कनिष्ट अभियंता गंगाप्रसाद धमदिमे, कनिष्ट अभियंता संग्राम पाटील, कनिष्ट अभियंता संदेश कुलमूडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

 

 

See also  विध्यार्थी हे देशाचा नविन इतिहास घडवणारी नविन पिढी - अनुराधा ओक