विद्यांचल हायस्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

0

बाणेर :

बाणेर येथील अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ विद्यांचाल हायस्कूल येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद सूरकुतवार अध्यक्ष रोटरी क्लब, सुकानंद जोशी सेक्रेटरी रोटरी क्लब, प्रमुख पाहुण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो.

यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे यांनी सांगितले की, संस्थेच्या वाटचालीमध्ये संस्थेचा स्टाफ शिक्षक वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडत असल्यामुळे संस्थेच्या शाळेमधील शिक्षणाचा दर्जा हा उच्चतम राहिला आहे. शाळेची गुणवत्ता वाढलेली असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागत असतो. यासाठी सर्व शिक्षक वर्गाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. म्हणूनच शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करीत त्यांचा आज सन्मान आपण करत आहोत असे त्यांनी सांगितले.

यावेळी या शाळेच्या वाटचालीमध्ये मोलाचे काम करणारे विविध शिक्षकांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. उपस्थित प्रमूख पाहुण्यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त करीत शिक्षकांचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम तसे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

See also  बाणेर येथील व्यवसायिकाचे 15 लाखासाठी अपहरण : चतुशृंगी पोलिसांनी सापळा रचून चौघांना केली अटक.