पुणे उद्या पासून अनलॉक पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

0

पुणे :

राज्यात कोरोनाचा जोर ओसरला असला तरी अजूनही काही निर्बंध कायम आहेत. त्यामुळे हे निर्बंध शिथिल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. आता पुण्यातील कोरोना निर्बंधाबाबत पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणे उद्यापासून अनलॉक करण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी वेळ वाढवून मिळावी, यासाठी पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले होते. पण आता वेळ वाढवून मिळाल्याने व्यापाऱ्यांसह हॉटेलचालक आणि दुकानदारांना दिलासा मिळालाय. तसेच विविध निर्बंधातून सूटही देण्यात आली आहे.

उद्यापासून पुणे अनलॉक

– सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार.
– -हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार.
-शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी.
–मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार आहे. मॉलमध्ये फक्त लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार आहे.
– पुणे ग्रामीण सुद्धा लेवल तीन वर

तर पुन्हा निर्बंध कडक करणार…..

दरम्यान सूट देताना अजित पवार यांनी कोरोनाचे नियम पालण्याचे आवाहनही केलंय. सोबतच निर्बंध शिथिल करताना त्यांनी पुणेकरांना इशाराही दिलाय. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा 7 टक्क्यांच्या पुढे गेल्यास, पुन्हा निर्बंध लावण्यात येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

See also  पुण्यात पोलिसांनची जबरदस्त  कारवाई ....