नव्याने समाविष्ट गावांचा २४/७ पाणी पुरवठा योजनेत समावेश करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

0

सुस :

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी गावांचा प्रभारी नगरसेवक होताच जनतेच्या प्रती आपुलकीच्या भावनेने कर्तव्य म्हणून मोफत पाणी पुरवठा प्रकल्प राबविला आहे. पुढील काळात मूलभूत सुविधांसाठी येणाऱ्या अडचणी राहणार नाही. तसेच नव्याने समाविष्ट गावांचा २४/७ पाणी पुरवठा योजनेत समावेश करणार आहे. लवकरच नगरपालिका म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत गावांच्या बैठकी घेणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे या दोन गावांमध्ये नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने रोज २ लक्ष लिटर म्हणजेच रोज २० टँकर पिण्याच्या कॉर्पोरेशनच्या पाण्याचा पुरवठा संकल्प गुरुवारी सुसगाव येथे जलपूजन शुभारंभाचा कार्यक्रम माननीय महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अमोल बालवडकर यांनी सांगितले की, सुसगावाला सर्वाधिक सतावणारी कोणती समस्या असेल तर ती पाण्याची समस्या आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गावातील पाण्याची समस्या सोडवायची असेल तर पायाभूत सुविधा उभ्या करण्याची प्रामुख्याने गरज आहे. सुस म्हाळुंगे सहित नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांचा २४x७ या योजनेमध्ये समावेश करण्यात यावा आणि पाइपलाईनचे व पाण्याच्या टाक्यांचे काम व्हावे यासाठी जातीनं लक्ष घालून सदर काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असे देखील यावेळी सांगितले.

ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अपूर्वा निकाळजे, उपसरपंच दिशा ससार यांनी गावातली समस्या बद्दल महिती दिली व नागरीकांच्या असणाऱ्या अपेक्षा सांगितल्या.

सदर वेळी माननीय महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक किरण दगडे पाटील, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, सरपंच अपूर्वा निकाळजे, उपसरपंच दिशा ससार, मा. चेअरमन दत्तोबा चांदेरे, मा. सरपंच मिराताई देवकर, मा. सरपंच नारायण चांदेरे, मा. चेअरमन अंकुशराव गाडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदास चांदेरे, रासप अध्यक्ष अप्पासाहेब सुतार, उपसरपंच वि.ग्रा.स. गजानन चांदेरे, मा. उपसरपंच वि.ग्रा.स. गणेश साळुंके, ग्रा.स. अमोल चांदेरे, व्हाईस चेअरमन सोपान चांदेरे, वसंत चांदेरे, अनंता चांदेरे, सरचिटणीस भा.यु.मो.पु. शरद भोते, युवा नेते अनिल बापू ससार, ॲड. अशिष ताम्हाणे, प्रकाश तपकीर, नितीन रनवरे, प्राजक्ता रनवरे, रिमा सोमय्या, सुसगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी व सभासद यावेळी उपस्थित होते.

See also  शाहीर अण्णा भाऊ साठे १०१ वी जयंती बालेवाडीत उत्साहात साजरी...