श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त जादा बसेस, ‘या’ ठिकाणावरुन सुटणार बस

0

पुणे :

जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा 27 मार्च रोजी आहे. त्यासाठी पीएमपीमएलने जादा बसचे नियोजन केले आहे.

बीज सोहळ्यानिमित्त देहूगाव येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. तुकाराम बीज निमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच उपनगरांतून देहूगाव येथे जाणाऱ्या भाविकांच्या व प्रवाशी नागरिकांच्या सोयीसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही परिवहन महामंडळामार्फत जादा बसेसची व्यवस्था नेहमीच्या तिकीट दराने करण्यात येत आहे. देहूगाव व आळंदी साठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

बसमार्गाचे नाव स्थानकाचे नाव स्वारगेट ते देहूगाव स्वारगेट व देहूगाव स्थानक,  मनपा भवन ते देहूगाव मनपा भवन व देहूगाव स्थानक,  मनपा भवन ते आळंदी मनपा भवन व आळंदी स्थानक, देहूगाव ते आळंदी देहूगाव व आळंदी स्थानक, स्वारगेट ते आळंदी स्वारगेट व आळंदी स्थानक,
पुणे स्टेशन ते देहूगाव पुणे स्टेशन डेपो व देहूगाव स्थानक,
निगडी ते देहूगाव निगडी व देहूगाव स्थानक,  हडपसर ते आळंदी हडपसर व आळंदी.

तसेच देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी देहूगाव येथील झेंडे मळ्याजवळ मिलिटरी परिसरातील उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात असून सदर ठिकाणाहून वरील जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तसेच देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरीता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील. जादा बसेसची व्यवस्था 26 ते 28 मार्च अखेर करण्यात आलेली आहे.

See also  नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर