पुणे रेल्वे स्टेशन दररोज चार तास बंद ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय..

0

पुणे :

पुणेकरांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष खास आहे. वास्तविक पुणे रेल्वे स्थानकावरून रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात.

तसेच हजारो प्रवासी पुण्यात रेल्वे मार्गे दाखल होतात. या हजारो रेल्वे प्रवाशांना आता गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. कारण की पुणे रेल्वे स्टेशन दररोज चार तास बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नुकताच घेण्यात आला आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट विस्तारीकरण म्हणजेच प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी पुणे रेल्वे स्टेशन दररोज चार तास पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि पुणे स्थानकात दाखल होणाऱ्या ट्रेनच्या वेळापत्रकात मोठा बिघाड होणार आहे.

यामुळे रेल्वे प्रवाशांना गैरसोयीचा देखील सामना करावा लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ज्यावेळी पुणे रेल्वे स्थानक बंद असेल त्यावेळी रेल्वे स्थानकावर एकही ट्रेन ये-जा करणार नाही. तसेच या रीमॉडेलिंगच्या कामासाठी अनेक ट्रेन रद्द देखील होणार आहेत.

_’ORTHOS’ *orthopaedic & spine superspeciality centre in Baner.._*

वास्तविक केल्या अनेक वर्षांपासून रीमॉडेलिंगचे काम रखडले आहे. मात्र, आता येत्या तीन महिन्यात रीमॉडेलिंगचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट प्रशासनाने ठेवले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे रेल्वे स्थानकावर 24 तासात जवळपास 155 गाड्या धावतात.

यामध्ये पुणे रेल्वे स्थानकावरून 65 गाड्या सुटतात. पुण्यातून रेल्वे मार्गे दररोज जवळपास दीड लाखाहून अधिक लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने पुढील तीन महिने पुणे रेल्वे स्थानक दररोज चार तास बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने याचा रेल्वे प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ज्यावेळी पुणे रेल्वे स्थानक बंद असेल त्यावेळी शिवाजीनगर आणि हडपसर रेल्वे स्थानकावरून काही गाड्या सोडल्या जातील अशी माहिती देखील एका मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. एकंदरीत पुढील काही महिने पुण्यातील रेल्वे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

See also  पुणे महानगर पालिका प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती.