सोमेश्वर वाडी ग्रामस्थांनी अनुभवला युवा नेते सचिन दळवी यांच्या सोबत ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आनंद..

0

सोमेश्वरवाडी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 100 वा भाग आज रविवारी 30 एप्रिल रोजी प्रसारित झाला. या कार्यक्रमाचे प्रसारण भाजपा कोथरूड विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष सचिन दळवी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात परिसरातील नागरिकांसाठी प्रसारण करत एकत्रित रित्या पाहण्याची सोय केली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी झालेल्या मन कि बातमधील अनेक आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाची माहिती देताना युवा नेते सचिन दळवी यांनी सांगितले की नागरिकांसोबत कनेक्ट राहण्यासाठी ‘मन कि बात’ द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. याच ‘मन कि बातचा’ आज शंभरावा भाग प्रसारित झाला. यासाठी जनसंपर्क कार्यालय मध्ये जोरदार तयारी करत सोमेश्वर वाडी येथील तरुणांपासून तर नागरिकांपर्यंत सर्वांसोबत बसून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पाहिला. मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून हा कार्यक्रम पाहत होते.

एक प्रगल्भ नेतृत्व ज्याला सतत आपल्या देशवासीयांची काळजी आहे म्हणून माननीय पंतप्रधान यांनी जनतेशी कनेक्ट राहता यावे म्हणून मन की बात हा कार्यक्रम सुरू केला. आज शंभर वा भाग प्रसारित होत असताना त्यांचा नागरिकांशी कनेक्ट राहत संवाद साधण्याचा हेतू साध्य झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी खरच एक आदर्श नेतृत्व असुन जे मार्गदर्शन सामाजिक कार्यात वावरताना उत्साह निर्माण करते.

See also  शिवसेनेचे उपशहर प्रमूख राजेन्द्र धनकुडे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त गोरगरिबांना सरंजाम वाटप...!