मनसेकडून पुण्यात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी 3500 ‘राजदूत’ नेमले जाणार

0

पुणे :

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तळागळातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून पुण्यात ‘राजदूत’ नेमले जाणार आहेत. पुण्यात 3500 राजदूत नेमले जाणार आहेत.

याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात लवकरच मेळावा घेणार असल्याची माहिती पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे.

राजदूतांकडे काय जबाबदारी असणार?

आगामी पुणे महापालिकेच्या दृष्टीने राज ठाकरेंच्या या संकल्पनेने मोठी मदत होईल. राजदूत लोकांचे प्रश्न सोडवतील. तीन ते साडेतीन हजार राजदूत पुण्यात काम करतील. एक हजार मतदारांच्या पाठीमागे एक राजदूत काम पाहणार आहे. (Latest News)

स्थानिक पातळीवरील ज्या काही अडचणी असतील त्याकडे राजदूत लक्ष देणार आहेत. हे सर्व विषय वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्याचं काम राजदूतांचं असेल. या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडवल्या जातील. याशिवाय तळागळापर्यंत मनसे पोहोचण्यास नक्कीच मदत होणार आहे.

राज ठाकरे लवकरच कोकण दौऱ्यावर

मनसेच्या मुंबईतील गटप्रमुखांचा 27 नोव्हेंबर रोजी मोळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यानंतर म्हणजेच 28 किंवा 29 नोव्हेंबर रोजी राज ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी ते कोल्हापूरला अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत.

See also  महापालिका निवडणुक ४ सदस्यीय पद्धतीने होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय.