शरद पवार – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Tue, 02 May 2023 08:02:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 राजकारणातील मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची शरद पवार यांची घोषणा… https://maknews.live/archives/13113?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2583%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b9%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a3%25e0%25a5%258d Tue, 02 May 2023 07:40:32 +0000 https://maknews.live/?p=13113

मुंबई :

माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो.

मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले.

मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झाला. हळहळू मी पुण्यात काम केले. त्यानंतर मला मुंबईत काम करायचे सांगितले. मग महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांशी संपर्क येत होते. त्यावेळी अनेक मोठे नेते हॉटेलमध्ये उतरत नव्हते तर पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उतरत होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क आला. त्यावेळी युनोस्कोच्या संघटनेसाठी माझी निवड झाली. मला जपान, अमेरिकामध्ये जाण्याची संधी मिळाली. जपानला आम्ही गेलो तेव्हा जपानच्या पंतप्रधानच्या कार्यालयात काम करायला मिळाले. त्यावेळी जपानमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रमाचे नियोजन आम्ही केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यलयात काम करण्याची संधी मिळाली.

त्यावेळी दौरा सोडून मला परत बोलवले. मला विधानसभेला उभे राहण्याची संधी मिळाली. १९६७ मध्ये तिकीट मिळाले. निवडणूक सोपी नव्हती. परंतु अनेक वर्षे युवकांच्या चळवळीत काम केले. त्यानंतर विद्यार्थी चळवळीत काम केले. त्याचा फायदा झाला आणि मी निवडून आले.

मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

]]>
खारघरच्या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी : शरद पवार https://maknews.live/archives/12967?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2596%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2598%25e0%25a4%25b0%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2598%25e0%25a4%259f%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258c%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b9 Fri, 21 Apr 2023 20:26:10 +0000 https://maknews.live/?p=12967

शरद पवार :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई दौऱ्यावर आहेत. तर त्यांनी (२१ एप्रिल) एका कार्यक्रमादरम्यान खारघरच्या दुर्घटनेमध्ये देखील भाष्य करत सत्ताधारी सरकारवर निशाणा लगावला आहे.

अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला असून त्याची जबाबदारी ही शिंदे फडणवीस सरकारची असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कडक उन्हात गर्दी जमवून आपल्याला अनुकूल वातावरण करण्याचा डाव शिंदे-फडणवीस सरकारचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तर या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांच्यामार्फत करावी अशी मागणी त्यांनी केली.

तसंच पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेताना काळजी घेता, मग या ठिकाणी का काळजी घेतली गेली नाही असा सवाल शरद पवार यांनी केला. शरद पवार म्हणाले की, ‘या घटनेची चौकशी आता अधिकाऱ्याच्या समितीकडून करण्यात येत आहे. अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देत नाही. त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी.’ अशी मागणी पवारानी केली आहे.

दरम्यान, रविवारी (16 एप्रिल) ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम खारघरमध्ये भर दुपारी आयोजित करण्यात आला होता. दुपारी रखरखत्या उन्हात हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 14 श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर याबाबत सत्यता सर्वांसमोर आली पाहिजे म्हणून मागणी केली जात आहे.

]]>
कितीही दबाव आला तरी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाणार नाही, ज्यांना जायचे त्यांचा वैयक्तिक निर्णय… https://maknews.live/archives/12906?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f Mon, 17 Apr 2023 01:26:53 +0000 https://maknews.live/?p=12906

मुंबई :

गेल्या काही दिवसापासून अजित पवार महाआघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फुटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली.

या संधर्भात माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. काही लोक दबावाला बळी पडू शकतात. मात्र, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. महाविकास आघाडीत फूट पडणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याचे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, मी व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पवारांनी महाविकास आघाडी आणि राज्यातील राजकारण यासंदर्भात महत्वाची भूमिका मांडली. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षाचे नेते फोडायचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. आमदार फोडले. आदित्य ठाकरे यांनी यावर खुलासा केलाय, कसे नेते रडत होते. आम्हाला तुरुंगात जायचं नाही. तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत वापरलं जातआहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही लोकांबाबत ही चर्चा आहे,हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे. यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे, असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असेही पवार म्हणाले आहेत.

]]>
चिंचवड विधानसभेचे उमेदवार नाना काटे यांनी घेतली राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांची भेट.. https://maknews.live/archives/12432?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259a%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ad%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2589%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be Mon, 06 Mar 2023 01:12:54 +0000 https://maknews.live/?p=12432

पिंपरी :

चिंचवड विधानसभेचे उमेदवार नाना काटे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी प्रदेश मुख्य समन्वयक सुहासभाऊ उभे, भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रभाकर वाघेरे, उल्हासदादा पवार उपस्थित होते.

यावेळी नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. तसेच आगामी काळातील कामा संदर्भात देखील यावेळी खासदार शरद पवार यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले.

येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत आपण योग्य पद्धतीने नियोजन करून काम केल्यास विजय आपलाच असणार आहे. लोकांनाही आता बदल हवा असल्याने आपल्याला अत्यंत जबाबदारीने काम करावे लागणार आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून येणार्‍या महापालिका निवडणुकींच्या तयारीला आतापासून लागा. अशा सूचना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या.

]]>
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री ११ वाजता घेतली आंदोलन करणाऱ्या एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट.. https://maknews.live/archives/12290?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2581%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-2 Wed, 22 Feb 2023 01:12:28 +0000 https://maknews.live/?p=12290

पुणे :

पूण्यात मागील ३६ तासांपासून पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री ११ वाजता आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाने वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एकत्र विद्यार्थ्याचे धरणे आंदोलन सरू आहे. जोपर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षेबाबत निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार रात्री ११ वाजता आंदोलनस्थळी पोहोचले व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी अनेकवेळा आंदोलने करुनही आयोगाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे जोपर्यंत आयोग वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून घेण्याचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यानंतर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, एमपीएससी जोपर्यंत अधिकृतपणे नोटिफिकेशन काढणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकानी सांगितले.

शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना सांगितले की, येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेऊ. या बैठकीला मीही उपस्थित राहीन, असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं. आंदोलनस्थळी येताना आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर येत्या दोन दिवसांत यावर चर्चा करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याची माहिती शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिली.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होणाऱ्या संबंधित बैठकीला कोण-कोण हजर राहणार? अशा पाच विद्यार्थ्यांची नावंही आपल्याला कळवावीत. या पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन मी या बैठकीला जाईल, असं आश्वासन शरद पवारांनी दिलं.

]]>
काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही : शरद पवार https://maknews.live/archives/11681?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2581%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b9%25e0%25a5%258b%25e0%25a4%258a-%25e0%25a4%25b6 Wed, 28 Dec 2022 23:53:04 +0000 https://maknews.live/?p=11681

पुणे :

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 137 व्या वर्धापनदिनी महापुरुषांचे छायाचित्र प्रदर्शनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस भवनला भेट दिली आहे.

यावेळी त्यांनी प्रदर्शन पाहत असताना काँग्रेसने भारताला दिलेल्या भरीव कामगिरीची आठवण करून देत त्यांनी काँग्रेसच्या राजकारणाची आणि संयुक्त महाराष्ट्राचाही त्यांनी इतिहास सांगितला. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याचीही शरद पवार यांनी आठवण करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचा इतिहास सांगताना त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनाच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा त्यांनी गौरव केला.

यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगताना इंदिरा गांधी यांच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना कन्व्हीन्स केल्या नंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली असंही त्यांनी यावेळी सांगताना अधोरेखित केले.

मागील काही दिवसांपासून राजकीय टीका करण्याबरोबरच काही लोकांकडून भारत काँग्रेस मुक्त करायचा आहे अशी वल्गना केली जाते आहे. पण काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

देशासाठी काँग्रेसची विचारधारा आणि योगदान कुणालाच दुर्लक्षित करता येणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट करून सांगितले. काँग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील आणि तसे मतभेद माझेही काही आहेत मात्र काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल 24 वर्षांनंतर पुण्यातील काँग्रेस भवनला भेट दिली आहे. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती.

]]>
महाराष्ट्राच्या सन्मानासाठी महामोर्चात सर्वजण सहभागी : शरद पवार https://maknews.live/archives/11545?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be Sat, 17 Dec 2022 23:02:27 +0000 https://maknews.live/?p=11545

मुंबई :

‘जर अद्यापही राज्यकर्त्यांनी धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करु आणि त्यांना उलथून कसं टाकायचं याचा विचार करु.’ असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.

सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबात केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं होतं. याच मोर्चात भाषण करताना शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपवर तुफान हल्ला चढवला.

महाविकास आघाडीचे सगळे दिग्गज नेते हे यावेळी रस्त्यावर उतरुन मोर्चात सहभागी झाले आणि नंतर ते सभास्थळी पोहचले. पण शरद पवारांचं वय आणि प्रकृती यामुळे त्यांनी मोर्चात न जाता सरळ सभास्थळ गाठलं. मात्र, यावेळी पवारांनी आपल्या भाषणातून मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात कठोर भूमिका घ्यावी असं आवाहन केलं.

छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी महाराष्ट्र उभा आहे त्याच विचारांना राज्यपाल सारखे व्यक्ती अपमानास्पद बोलत असतील तर त्यांना पदावर राहण्याची आवश्यकता नाही.केंद्राने त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, ” महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मी कधीही पाहिला नाही. मला विधान भवनात जाऊन 55 वर्षे झाली अनेक राज्यपाल मी पाहिले. तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राच नावं लौकिक वाढवण्याचे काम केले. मात्र, हे राज्यपाल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. या देशात अनेक राजे-रजवाडे होऊन गेले. पण साडेतीनशे वर्ष झाली तरीही सामान्य माणसाच्या मनात एक नाव कायम राहिलं आणि ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती. शिवाजी महाराजांच्याबाबत उल्लेख राज्याचा मंत्री करतो. पण महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. यासंबंधीची तीव्र भावनाचा व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने इकडे तुम्ही जमा झाले आहेत.” असं पवार म्हणाले.

]]>
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भूमिका देशाच्या ऐक्यासाठी घातक : शरद पवार https://maknews.live/archives/11372?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%259f%25e0%25a4%2595%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2596%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25b8 Wed, 07 Dec 2022 00:46:32 +0000 https://maknews.live/?p=11372

मुंबई :

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणात बेळगावमध्ये जे काही झाले ते अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळे रुप दिले जात आहे.

बेळगावध्ये जे घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारशी संपर्क साधला. परंतू, त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये निर्माण झालेल्या तणावात्मक परिस्थितीवर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भूमिका देशाच्या ऐक्यासाठी घातक असल्याचेही शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये सीमावाद आहे. प्रकरण उच्च न्यायालयात आहे. न्यायालयात दोन्ही राज्यांना आपापली भूमिका मांडण्याची पूर्ण संधी असताना कर्नाटक सरकारची आगळीक धोक्याची आहे. दोन राज्यांच्या संघर्षामध्ये सुरु असताना केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं योग्य नाही. केंद्र सरकारने तशी भूमिका घेतल्यास देशाच्या ऐक्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेसुद्धा या प्रश्नावर योग्य भूमिका घ्यायला हवी.

चोवीस तासात परिस्थिती नियंत्रणात आणा

महाराष्ट्र हे संयमी राज्य आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारनेही योग्य ती काळजी घ्यावी. आज बेळगावमध्ये अत्यंत विदारक स्थिती आहे. पुढच्या 24 तासात परिस्थिती नियंत्रणात आणावी नाहितर महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले जातील. महाराष्ट्रात कर्नाटकच्या कृत्याचे पडसाद उमटले तर परिस्थिती कोणत्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारने वेळीच योग्य पावले उचलावीत.

आम्हाला बेळगावला जावे लागेल

बेळगावमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. कर्नाटक सरकारने वेळीच योग्य ती काळजी आणि पावले उचलली नाहीत तर माझ्यासह (शरद पवार) आम्हा सर्वपक्षीय नेत्यांना बेळगावमध्ये तिथल्या जनतेला धीर देण्यास जावे लागेल, असे शरद पवार यांनी म्हटलेआहे.

या घटना आताच का?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगाव, सोलापूर आदी ठिकाणांवर दावा सांगतात. गुजरात, तेलंगणा सीमेलगतची गावे वेगळी भूमिका मांडत असल्याचे कानावर येते आहे. हे सगळं आताच का घडतं आहे? आजवर असा मुद्दा कधीच आला नाही. पण, हे सगळे आताच का घडत आहे? असा सवाल विचारत या सर्व प्रकाराला कोणीतरी चिथावणी देत असल्याचा संशयही शरद पवार यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नव्याने उकरुन काढला आहे. त्यांच्या विधानामुळेच परिस्थिती पुन्हा चिघळली असल्याचे शरद पवार म्हणाले.

]]>
आजारी असुन देखील शरद पवारांची राष्ट्रवादीच्या शिर्डीत सुरु असणा-या मंथन शिबिराला हजेरी https://maknews.live/archives/11024?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2587%25e0%25a4%2596%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a6-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0 Sun, 06 Nov 2022 02:11:11 +0000 https://maknews.live/?p=11024

नगर :

शरद पवारांना त्यांचे कार्यकर्ते 80 वर्षांचा तरुण म्हणतात. वयाच्या 80 व्या वर्षात पवार पायाला भिंगरी लावून राज्याचा दौरा करतात, कधी दिल्लीत जातात.

कोरोना (Corona) परिस्थितीत जेव्हा राज्यातले अनेक नेते घराबाहेर पडायला घाबरत होते तेव्हाही पवार राज्याचा दौरा करत होते, शेतक-यांच्या बांधावर जात होते. पवारांच्या या उत्साहाचा हेवा त्यांच्या विरोधकांनाही वाटतो.

पवारांचा असाच उत्साह, कार्यकर्त्यांप्रती तळमळ पुन्हा एकदा दिसली. शरद पवार 6 दिवसांपासून म्हणजे 31 ऑक्टोबरपासून आजारी आहेत, मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्याही अवस्थेत पवारांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीत सुरु असणा-या मंथन शिबिराला हजेरी लावली.

मुंबईहून हेलिकॉप्टरनं पवार शिर्डीत दाखल झाले, त्यानंतर कारनं राष्ट्रवादीच्या मंथन आणि अभ्यास शिबिराला उपस्थित राहिले. फक्त उपस्थित नाही तर पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं.

पवारांनी वयाची 80 वर्ष ओलांडलीयेत. त्यांच्या वयाचे फार कमी नेते आज सक्रिय राजकारणात आहेत. पण पवारांचा उत्साह दांडगा आहे. आजारी असतानाही शरद पवारांचा सक्रियपणा कमी झालेला नाही. उलट काही दिवसांपूर्वी मी काय म्हातारा झालोय का अशी मिश्किल टीपणी पवारांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन केली होती. पवारांसाठी पार्टी आणि कार्यकर्ते फर्स्ट असंच म्हणावं लागेल.

]]>
रयत शिक्षण संस्थेने स्त्रियांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम करावे – खासदार शरद पवार https://maknews.live/archives/10859?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25af%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d Mon, 03 Oct 2022 01:11:25 +0000 https://maknews.live/?p=10859

पुणे :

समाजाच्या जडणघडणीत स्त्रियांचा 50 टक्के वाटा आहे. कर्तुत्वाच्या बाबतीत स्त्रिया कुठेही कमी नाहीत मात्र स्त्रियांच्या कर्तुत्वाला प्रोत्साहन द्यायला आपण कमी पडतो, अशी खंत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. रयत शिक्षण संस्थेने स्त्रियांच्या कर्तुत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम करावे असं आवाहनही पवार यांनी केले.

रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘शरद रयत चषक अंतर महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धे’च्या पारितोषिक वितरण समारंभात पवार बोलत होते. या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील 32 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, पश्चिम विभागाचे चेअरमन ऍड. राम कांडगे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन ऍड.भगीरथ शिंदे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आदी उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग आहे जिथं लोक माझ्यावर बोलतात आणि मला ऐकावं लागतय. सहसा मी हे टाळतो. हा सगळा कार्यक्रम माझ्याभोवती केंद्रित आहे हे माझ्या लक्षात आलं. शालेय, महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. विज्ञानाभिमुख विषय विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी दिले पाहिजेत. जेणे करुन विद्यार्थ्यांमध्ये विचार प्रकिया घडून येते.

यावेळी बोलताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, शरद पवार राजकारणी नेते असले, तरी राजकारणातून समाजकारण करायचं आणि त्यातून समाजाचा विकास करायचा ही भूमिका त्यांनी विद्यार्थीदशेपासून ठेवली आहे. अस कोणतेही क्षेत्र नाही जिथं पवारांचा वावर नाही. शरद पवार हे व्यक्ती नाही तर विद्यापीठ आहे. ह्या विद्यापीठात जीवनातले सगळे विषय शिकता येतात.

रयतला अत्याधुनिक करण्यात शरद पवारांचं मोठं योगदान आहे, अस मत संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी व्यक्त केलं. पवारांच्या दूरदृष्टीने रयत शिक्षण संस्थेत खूप पूर्वीपासून अत्याधुनिक शिक्षण देण्यास सुरवात झाली. इतकचं नव्हे तर नवीन राष्ट्रीय धोरणानुसार सर्व सोयी आम्ही उपलब्ध करुन देतोय.

या कार्यक्रमात चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालयाच्या स्मरणिकेचे आणि सुवर्ण स्मृती स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. एस. टी. पवार, नीता शेटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी आभार मानले. प्राचार्य अरुण आंधळे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. पश्चिम विभागाचे चेअरमन मा. ॲड. राम कांडगे, विभागीय अधिकारी श्री. के. डी. रत्नपारखी, सहा विभागीय अधिकारी एस. टी. पवार, अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, एस.एम.जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. बी. पी. गार्डी, प्रा. कैलास एरंडे, प्रा. उमेश पाटील, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. डॉ. अतुल चौरे, विशाल कराळे यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

]]>