लिजेंड क्रिकेट – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Wed, 19 Jan 2022 02:47:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि युवराज सिंगला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात https://maknews.live/archives/7594?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597-%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ad%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25bf Wed, 19 Jan 2022 02:47:15 +0000 https://maknews.live/?p=7594

मुंबई :

भारताकडून लेजेंड्स क्रिकेट लीगसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि युवराज सिंगला संधी देण्यात आली आहे. हे खेळाडू आता पुन्हा मैदानात खेळताना दिसणार आहेत.

लेजेंड्स क्रिकेट लीग निवृत्त खेळाडूंची स्पर्धा आहे. जानेवारीपासून ओमानमध्ये स्पर्धा सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतातील खेळाडूंव्यतिरिक्त इतर देशांतील निवृत्त खेळाडूसुद्धा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शोएब अख्तर, सनथ जयसूर्या आशियाकडून खेळणार आहेत.

लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खेळणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु तेंडुलकर खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लीगमध्ये एकूण ३ संघांची स्पर्धा होणार आहे. संघांची घोषणा झाली असून भारताकडून कोणते खेळाडू खेळणार याची माहिती दिली आहे.

लेजेंड्स क्रिकेट लीग येत्या २० जानेवारीपासून सुरु होणार आहे. २९ जानेवारी २०२२ पर्यंत स्पर्धा सुरु असणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून गट विभागले गेले आहेत. दोन फेऱ्या होणार असून एका फेरीत ३ सामने खेळवण्यात येतील. पहिल्या सामन्यात इंडिया महाराज विरुद्ध आशिया लायन्सचा सामना होणार आहे. या सामन्यासह सर्वच सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होतील.

https://twitter.com/llct20/status/1478340782549463040?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478340782549463040%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

इंडिया महाराजा संघातील खेळाडू

वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग, युसूफ पठाण, इरफान पठाण, प्रज्ञान ओढा, नमन ओझा, एस बद्रीनाथ, आरपी सिंग, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर

]]>