लहू बालवडकर – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Sun, 07 Jan 2024 11:53:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 लहू बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैतन्यस्पर्श कार्यक्रमाचे बावनकुळे यांनी केले भरभरून कौतूक…. https://maknews.live/archives/15430?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8-2 Sun, 07 Jan 2024 11:53:06 +0000 https://maknews.live/?p=15430

पुणे : भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे चैतन्यस्पर्श हा भारतातली १२ शक्तिपीठांच्या पादुकादर्शनाचा अभूतपुर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी चैतन्यस्पर्श कार्यक्रमाचं बावनकुळे यांनी भरभरून कौतूक केलं. तसेच २२ जानेवारी रोजी सर्वात मोठी दिवाळी साजरी करण्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी लहू बालवडकर यांना आवाहनही केलं. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपचे महासचिव विक्रांत पाटील, उपाध्यक्ष राजेश पांडे, उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांना यावेळी लहू बालवडकर यांनी राम मंदिराची प्रतिकृतीही भेट दिली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लहू बालवडकर यांच्या लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे चैतन्यस्पर्श भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. यातच २२ जानेवारी रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या सोहळ्यासाठी राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. तसेच अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेला मंगल अक्षता कलशही ठेवण्यात आला. या मंगल अक्षता कलशजी पुजा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडली.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भारतातली १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाच्या पुजनाचा आणि पादूका दर्शनाचा आगळावेगळा कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्रात कुठेही असा सोहळा होत नाही,  परंतु लहू बालवडकर दरवर्षी पादुकांचा सोहळा करताहेत. आपल्या देशातील देव धर्म येणाऱ्या पिढीसाठी कायम राहावं अस काम लहू बालवडकर करीत आहेत. हे खरोखरच अत्यंत महत्त्वाचं आहे. पादूकांचा दर्शन घेतल्यानंतर आपल्या जीवनात नव ऊर्जाची प्राप्त होतेय., अशा भावनाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान,  २२ जानेवारीला आपल्या देशात सर्वात मोठी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. पाचशे वर्षापुर्वी रामलल्लाचा जन्म झाला, त्याठिकाणी राम मंदिर बांधण्याची सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. यापूर्वीच्या पाचशे वर्षापूर्वी पंचवीस ते तीस पीढ्या निघून गेल्या की , त्यांना राम लल्ला तंबूतून मंदिरात येण्याचं भाग्य बघायला मिळालं नाही परंतु मोदींमुळे आपल्याला हे बघायला मिळणार आहे. तसेच २२ जानेवारीची दिवाळी अशी करावी की इतिहासात अशी पहिल्यांदाच केली गेली. तिकडे राम मंदिरात पुजा केली जाईल, तर इकडेही पुजा करा. तसेच महाप्रसाद दिला जाईल तर इकडेही द्या. २२ जानेवारीला राम लल्ला मंदिरात येणार आहे. त्यामुळे लहु बालवडकर यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपल्या लोकांना राम लल्ला च्या दर्शनासाठी अवश्य घेऊन जा. जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात रामलल्ला बसणार आहे, त्यामुळे लहु बालवडकर यांना विनंती आहे की त्यांनी सर्व लोकांना राम लल्लाचं दर्शन घडवून आणावं असु बावनकुळे म्हणाले.

]]>
लहू बालवडकर यांचा उपक्रम, ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी !’ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी सेवेत.. https://maknews.live/archives/13640?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2589%25e0%25a4%25aa%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ae Sat, 10 Jun 2023 06:50:37 +0000 https://maknews.live/?p=13640

बालेवाडी :

संपूर्ण महाराष्ट्राच्या भक्तिभावाचा संस्कृतीचा, परंपरेचा मानबिंदू असलेला उत्सव म्हणजेच आषाढी वारी. या निमित्त सर्व वारकरी संप्रदाय व भाविक विठ्ठालाच्या नामस्मरणात एकरूप होतात. आषाढी वारीनिमित्त लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबिवले जातात. यातच भाजपचे युवा नेते लहू बालवडकर यांच्या आजी श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर या गेल्या २५ वर्षापासून नित्य नियमाने पांडुरंगाच्या भेटीला जात असतात. या २५ वर्षाचं औचित्य साधून लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी रूग्णवाहिका देण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री तशा उच्च व तत्रंशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, युवा किर्तनकार ह.भ.पचैतन्य महाराज वाडेकर औदुंबर ग्रुप हरी भक्त वारकरी मंडळ व बाणेर,बालेवाडी,सुतारवाडी,पाषाण, सोमेश्वरवाडी,सुस,महांळुगे परिसरातील सर्व नागरीक माता भगिनी उपस्थित होते.

लहू बालवडकर यांच्या मातोश्री श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर या गेल्या २५ वर्षापासून वारीला जात आहेत. पंरतु आता शाररीक वृद्धपकाळामुळे सध्या त्या जाऊ शकत नसल्याकारणाने तिच्या संकल्पनेतून दोन वर्षापुर्वी रूग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक वारीसाठी पाठविण्याचा निश्चय लहू बालवडकर सोशल वेल्फेअरने केला. त्याचप्रमाणे याही वर्षी लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी रूग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक पंढरपुरपर्यंत अहोरात्र सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपुर्ण वारी दरम्यान मोफर वैद्यकीय आरोग्य तपासणी सेवा शिबीर वेल्फेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा शिबीर लावण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपुर यादरम्यान ११ जून ते २७ जून या कालावधीत लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा शिबीर लावण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा शिबीर लावून रोज १ ते २ हजार वारकरी माय माऊलींना मोफत तपासणी करून औषधोपचार केला जाणार आहे.

]]>
लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या चैतन्यस्पर्श सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! महिला पुरुष भजन स्पर्धेचेही होतंय कौतुक; भक्तिमय वातावरणात पार पाडली स्पर्धा https://maknews.live/archives/11793?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25ab%25e0%25a5%2587%25e0%25a4%2585%25e0%25a4%25b0-3 Sun, 08 Jan 2023 17:24:53 +0000 https://maknews.live/?p=11793

बालेवाडी :

सुसंस्कृत पुण्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लहू बालवडकर. बाणेर, औंध, बालेवाडी, सुस, महाळुंगे भागात सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे हे युवा नेतृत्व. सामाजिक कार्यामध्ये सर्वात पुढे असणारे लहू बालवडकर हे अध्यामिक क्षेत्रात देखील चांगलेच सक्रीय असतात. नुकतेच लहू बालवडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहू बालवडकर सोशल वेलफेअरकडून “चैतन्यस्पर्श” या अलौकिक सोहळ्याचे तसेच भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

चैतन्यस्पर्श या सोहळ्याच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांनी भारतातील १३ शक्तीपीठांमधील संत आणि देवतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला. अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. अंदाजे १८ ते  २० हजार भाविकांनी यावेळी या अद्भुत सोहळ्याला हजेरी लावली तसेच जवळ पास पंधरा हजार भक्तीनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 8 तास चाललेल्या या सोहळ्यानंतर संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महाआरती झाली यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सोहळ्याच्या निमित्ताने अवघा बालेवाडी परिसर भक्तिरसात नाहून निघाला.  या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते.

“चैतन्यस्पर्श” सोहळा नेमका काय आहे ?

“चैतन्यस्पर्श”  हा भारतातील १३ शक्तीपीठांचा अद्भुत सोहळा असतो.दत्त महाराज संत ज्ञानेश्वर,स्वामी समर्थ,श्री नृसिंह सरस्वती,साई बाबा,गजानन महाराज,मच्छिंद्रनाथ महाराज,समर्थ रामदास स्वामी,टेंबे स्वामी महाराज,श्री शंकर महाराज, श्रीपाद स्वामी, गगनगिरी महाराज आदी संत मंडळी आणि देवतांच्या पादुकांचे यात एकत्र दर्शन घेता येते. यावेळी महाप्रसाद आणि एका महाआरतीचे देखील आयोजन करण्यात येते. यावेळी हजारो भाविक या सोहळ्यात दर्शन घेण्यासाठी येतात.

महिला व पुरूष भजन स्पर्धेला ही लाभला उत्तम प्रतिसाद.

लहू बालवडकर सोशल वेलफेअरकडून महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धेचे  बाणेर बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीच्या तीन दिवस या स्पर्धेची  प्राथमिक फेरी मोठ्या उत्साहात पार पडली. त्यानंतर या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्यांची महाअंतिम फेरी “चैतन्य स्पर्श” या कार्यक्रमात पार पडली. यामध्ये प्रथम  क्रमांकाचे बक्षीस  “ताजुबाई” भजनी मंडळ,ताजे,मावळ आणि संगीतज्योती महिला भजनी मंडळ,हिंजवडी  यांना देण्यात आले. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस  “श्री.गणेश बाळ” भजनी मंडळ भोर  आणि संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ,शेटेवाडी तळेगाव दाभाडे यांना देण्यात आले, तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस  “श्री.हरी” भजनी मंडळ पिरंगुट आणि स्वरांजली भजनी मंडळ,मारुंजी यांना देण्यात आले .या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम सुप्रसिध्द तबला वादक डॉ. राजेंद्र दुरकर आणि सुप्रसिध्द संगीतकार अंगत गायकवाड यांनी पाहिले.

या महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धेवेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,आमदार महेश लांडगे, दादा वेदकजी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे मोहनबुबा रामदासी,किर्तनकार संतोष महाराज पायगुडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला आणि लहू बालवडकर यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशात अनंत काळापासून नांदत आलेल्या संस्कृतीतून व्यक्त होणार्‍या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमाणसात रुजलेले लोकाचार आणि लोकरुढी याला रंजकतेने नटवित ही लोकसंस्कृती उभी राहते.

पुढे बोलताना ते म्हणाले,  एकप्रकारे लोकजीवनाचे भावविश्व त्यात प्रतिबिंबित होते. भजन संस्कृती त्यातीलच एक भाग. या संस्कृतीचे आजही ग्रामीण भागात जतन आणि संवर्धनाचे सातत्याने काम होते. या संस्कृतीशी शहरी भागातील अनेकजण बांधिल आहेत. माझ्या कोथरूड मतदारसंघातील भाजपा नेते लहुजी बालवडकर यांनी या संस्कृतीचा लाभ व्हावा, यासाठी महिला पुरुष भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. आज या स्पर्धेस उपस्थिती राहून भजन सेवेचा आस्वाद घेतला. या स्पर्धेत हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालो.असं म्हणत त्यांनी बालवडकर यांचे कौतुक केले. दरम्यान, या सोहळ्याच्या निमित्ताने हजेरी लावणाऱ्या सर्व भाविकांचे लहू बालवडकर आभार मानले.

]]>
लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धा आणि ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन.. https://maknews.live/archives/11646?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a2%25e0%25a4%25a6 Mon, 26 Dec 2022 11:08:45 +0000 https://maknews.live/?p=11646

बालेवाडी :

भाजपा युवा नेते लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित बालेवाडी, बाणेर, औंध, सुस, महाळूंगे, पाषाण, सुतारवाडी, आणि सोमेश्वरवाडी परिसरात प्रथमच भव्य महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ३ जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असून बक्षीस वितरण सोहळा ६ जानेवारी रोजी ‘चैतन्यस्पर्श’ पादुका सोहळ्या मध्ये संपन्न होणार आहे.

विविध सामाजिक उपक्रमातुन सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांचा वाढदिवस सांप्रदायिक क्षेत्रांत भजनी मंडळांना चालना मिळावी या उद्देशाने लहू बालवडकर सोशल वेलफेअर वतीने भव्य व आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. परिसरातील जवळ पास १०० पेक्षा जास्त भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी  होतील.

युवा नेते लहू बालवडकर यांनी मॅक न्यूज ला या स्पर्धेची माहिती देत असताना सांगितले की, परिसरातील नागरिकांची सेवा विविध उपक्रमातून करत असताना आपला वाढदिवस या वेळी सांप्रदायिक क्षेत्रातील नागरीकांसाठी भजन स्पर्धा आयोजित करून साजरा करणार आहे. आपल्या परीसरात भजनी मंडळे मोठया प्रमाणात असून त्यांना चालना मिळावी उत्साह वाढावा व हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतुने नियोजन बद्ध भव्य स्वरूपात आगळी – वेगळी भजन स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी आयोजित केली आहे. जवळपास शंभर पेक्षा अधिक भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी होणार असून आपला परीसर टाळ मृदंगाच्या गजरात दमदमून जाईल.  प्रत्येक वर्षी सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. इतून पुढे देखील अशा वेगवेगळ्या स्पर्धा सुरू ठेवून एक हक्काचे व्यासपीठ स्पर्धकांना उपलब्ध करून देणार आहे. तसेच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  दरवर्षी प्रमाणे मोठया भव्य स्वरूपात होणाऱ्या भारतातील १२ शक्तिपीठांचा ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व पादुका दर्शन सोहळ्या दरम्यान होणार असुन या सोहळ्याला परिसरातील जवळपास १८००० हजार भाविक उपस्थित राहून दर्शनाचा व अन्न प्रसादाचा लाभ घेतील.

स्पर्धेची बक्षिसे आणि स्वरूप :

पहिले बक्षिस – ५१००० रूपये आणि सन्मानचिन्ह

दुसरे बक्षिस – ४१००० रूपये आणि सन्मानचिन्ह

तिसरे बक्षिस – ३१००० रूपये आणि सन्मानचिन्ह

चौथे बक्षिस – २१००० रूपये आणि सन्मानचिन्ह

पाचवे बक्षिस – ११००० रूपये आणि सन्मानचिन्ह

वैयक्तिक बक्षिसे :

उत्कृष्ट गायन – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह

उत्कृष्ट मृदंगवादन –  ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह

उत्कृष्ट हार्मोनियम –  ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह

इतर ५ आकर्षक बक्षिसे प्रत्येकी ५५५५ रुपये

सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळास आकर्षक भेटवस्तू आणि येण्या जाण्याचा खर्च दिला जाणार आहे.

स्पर्धेचे स्वरुप :

३/४/५ जानेवारी रोजी प्राथमिक फेरी होईल

स्थळ –  विठ्ठल रुक्मिणी मंदिर बालेवाडी .

महा अंतिम फेरी ६ जानेवारी रोजी

स्थळ : सर्व्हे नंबर १९/१/१ बाणेर – बालेवाडी रोड, कम्फर्ट झोन सोसायटी समोर, बालेवाडी पुणे – ४५

संपर्क : ८३८०९९००७७/९३७१९९००७७

]]>
लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित “सूरसंध्या” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. https://maknews.live/archives/10924?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25ab%25e0%25a5%2587%25e0%25a4%2585%25e0%25a4%25b0-2 Sat, 29 Oct 2022 09:30:12 +0000 https://maknews.live/?p=10924

बाणेर :

दिवाळी निमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने “सूरसंध्या” ह्या सुरेल मैफिलीचा कार्यक्रम रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, बंटारा भवन बाणेर, पुणे या ठिकाणी आयोजित केला होता. तसेच यावेळी बाणेर, बालेवाडी, औंध, सुस, महाळुंगे येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाज उपयोगी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार देण्यात आला.

यावेळी बोलताना युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, दिवाळीचे निमित्त साधून गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील परिसरातील नागरिकांना संगीतमय मेजवानी “सूरसंध्या” या विशेष कार्यक्रमाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील वर्षी खुल्या मैदानावरती भव्य स्वरूपात हा कार्यक्रम घेणार आहोत. कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून मनाला समाधान लाभते. तसेच यावर्षीच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या परिसरामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने आपण त्यांचा सन्मान करत आहोत. असाच प्रतिसाद आम्ही राबविलेल्या सामाजिक उपक्रमांना आपण सतत देत राहाल हि अपेक्षा व्यक्त करत आहे.

भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, नागरिकांची गरज ओळखून त्याची पूर्तता करत लहू बालवडकर यांनी आपले वेगळेपण जपलेले आहे. त्यांचे उपक्रम समाजाला उपयोगी ठरतात. त्यांच्यासारखा सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता आमच्या पक्षात आहे हि समाधान कारक बाब आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी युवा नेते लहू बालवडकर यांचे कौतुक करताना म्हटले की, समाजाशी वेगवेगळ्या उपक्रमातून कशा पद्धतीने जोडले जावे याचे उत्तम उदाहरण लहू बालवडकर यांच्या कार्यक्रमातून पाहायला मिळते.

“सूरसंध्या” ह्या सुरेल मैफिलीचा कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि गायिका आर्या आंबेकर सुंदर मधुर गीतांचा आस्वाद प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात घेतला. तसेच अभिनेता, निवेदक संकर्षण कऱ्हाडे उत्कृष्ट निवेदन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संघटन महामंत्री महाराष्ट्र रवी भुसारी, पुण्याचे भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे,भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्वेता शालिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या वेळी भाजपा कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, मा. नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, मा. नगरसेवक अमोल बालवडकर, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, मा. नगरसेविका स्वप्नाली सायकर, पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, दिलीप परब, प्रल्हाद सायकर, मा. महापौर दत्ता गायकवाड, उमा गाडगीळ, राहुल कोकाटे, नितीन रणवरे, सचिन दळवी, शुभम बालवडकर, शिवम सुतार, अर्जन शिंदे, अर्जुन ताम्हाणे, लक्ष्मण सायकर, बबन चाकणकर, अस्मिता करंदीकर, काळूराम गायकवाड, शरद भोते, राखी श्रीवास्तव आणि भारतीय जनता पक्षाचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी, नेते, मान्यवर उपस्थित होते.

]]>
लहू बालवडकर यांनी वारकऱ्यांसाठी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीम पाठवत वारकऱ्यांच्या सेवेतून घडवली आजीची वारी. https://maknews.live/archives/9720?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b1%25e0%25a5%258d Sat, 25 Jun 2022 18:11:16 +0000 https://maknews.live/?p=9720

बालेवाडी :

पंढरपूरची वारी म्हंटले की अवघा महाराष्ट्र विठू माऊलीच्या गजरामध्ये अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो. ‘ज्ञानबा तुकाराम’ जयघोषात अवघा महाराष्ट्र न्हाहुन निघतो. महाराष्ट्रातील अबाल वृद्ध वय विसरुन विठुनामाच्या गजरामध्ये तल्लीन होतो. बालेवाडी तील बहुसंख्य महिला पुरुष या वारीमध्ये सहभागी होत असतात. आपल्या ९५ वर्षाच्या आजीची वारीला जाण्याची इच्छा यावर्षी शारिरिक वृद्धपकाळाने पूर्ण होणार नाही हे पाहून भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी वारीला जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीम वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाठवत आपल्या आजीला वारीला न जाण्याची खंत दूर करण्यासाठी वारकऱ्यांच्या सेवेतून वारी घडवली आहे.

याची माहिती देताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर म्हणाले की, माझी आजी श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर गेली २५ वर्षे नित्य नियमाने वारी करून पांडुरंगाच्या भेटीस जात होती. परंतु यावर्षी शारिरिक वृद्धपकाळाने वारीमध्ये टाळ मृदुंगाचा नाद, आणि लाखो भक्तांच्या गर्दीत जावू शकणार नव्हती. वारीची चर्चा सुरू असताना आजी म्हणाली मी नाही जाऊ शकत यंदा वारीला पण ज्या लाखो माता, भगिनी जात आहेत त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का? कोरोनाचे सावट अजुन संपूर्ण नष्ट झाले नाही, थंडी, ताप, खोकल्याची साथ आहेच, पांडुरंगा संभाळ रे बाबा!! या वाक्याने तरी लाखो वारकरी माता भगिनींसाठी फुल न फुलाची पाकळी आपल्या सेवेरूपी अर्पण करण्याचा निश्चय केला.

तात्काळ माझे मित्र नवनाथ बोडके व त्यांच्या सहकार्यांशी संपर्क केला व एक रूग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक तयार करून वारीतील माता, भगिनी यांच्या सेवेसाठी पाठवण्याची व्यवस्था केली. सासवड ते पंढरपूर या संपुर्ण वारीमार्गावर ही रूग्णवहिका आणि डॉक्टरांचे पथक सर्वांना प्राथमिक आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी कार्यरत असेल.
आजीची वारी यंदा होणार नाही पण रूग्णसेवेची वारी मात्र सुरू झाली आहे. आजीच्या हस्ते ही रूग्णवाहिका सेवेसाठी अर्पण करित असताना तिच्या चेहर्यावर वारीच्या पुर्णत्वाचा, विठ्ठलाच्या भेटीचा आनंद होता!

अश्याच वेगळ्या पद्धतीने समाज सेवेसाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या लहू बालवडकर यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या कृतीतून जणू आपल्या आजीची वारीच पूर्णत्वास नेत आहे. जणू एक भक्त विठ्ठलाच्या भेटी शिवाय राहु शकेल पण विठ्ठल राहु शकेल का भक्ताच्या भेटीशिवाय? सासवड ते पंढरपूर या मार्गावर दररोज वारकऱ्यांच्या सेवेतून विठ्ठलाची भेट नक्की घडेल!

यावेळी कांतीलालशेठ बालवडकर, ह.भ.प.मच्छिंद्र बालवडकर, विठ्ठल मांगडे, ह.भ.प.संतोष बा.बालवडकर, गजानन बालवडकर, रंजना बालवडकर, विद्या बालवडकर, ताईबाई बालवडकर, ज्ञानेश्वर बालवडकर, नितीन रणवरे, नवनाथ बोडके, शरद मांगडे, राजेंद्र मांगडे, पै. योगेश बालवडकर, संतोष भ.बालवडकर, पै.किरण बालवडकर, दिनेश बालवडकर, पै. चेतन बालवडकर, विठ्ठल बालवडकर, रोहित बालवडकर पै योगेश मांगडे शाम बालवडकर जीवन बालवडकर, आकाश बालवडकर, सौरभ कवडे, संदिप कांबळे, सुरज मांगडे, श्रीकांत नायकोडे, किरण खंडागळे, अक्षय काळे, पवन जोध, पिराप्पा माकन आणि लहु बालवडकर सोशल वेल्फेअर चे सर्व सदस्य उपस्थित होते.

]]>
स्पर्धा परीक्षेला असणारे महत्त्व लक्षात घेऊन यशश्री स्पर्धा परीक्षा अभियान लहू बालवडकर यांच्या संकल्पनेने सुरू. https://maknews.live/archives/9044?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587 Sun, 08 May 2022 10:08:23 +0000 https://maknews.live/?p=9044

बालेवाडी :

लहू बालवडकर सोशल वेल्फेअर व राष्ट्रबांधव अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होणाऱ्या ‘यशश्री’ स्पर्धा परीक्षा संकल्प अभियानाच्या बोध चिन्हांचे अनावरण भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त टेस्ट सिरीज 365 दिवस मोफत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या अभियानाची माहिती देताना युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, माझे उद्दिष्ट असे आहे कि, स्पर्धा परिक्षा म्हणजे काय हेच सर्वसामान्य लोकांना माहीती नसते. हि पुर्ण माहीती देऊन, या मधे सर्वसामान्य वर्गातील कुटुंबातील मुला मुलींनी सहभाग घ्यावा शासकीय नोकरीत याची निवड व्हावी, युवकांना भावी जीवनामध्ये कर्तृत्व सिद्ध करता यावे, यासाठी त्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. म्हणून आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षेला असणारे महत्त्व लक्षात घेऊन ‘यशश्री’ स्पर्धा परीक्षा संकल्प अभियान सुरू करत आहे. परिसरातील मुले मुलींनी सक्षम आणि कणखर व्हावे, वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष होईल, त्यांनी आपल्या बुद्धी कौशल्याने वैयक्तिक जीवनात प्रगती करावी, यासाठी मी असे आव्हान करेल की, सर्वच पालकांनी आपल्या मुला-मुलींना या अभियानात सहभागी करावे. यातुन भविष्यात नक्कीच चांगला अनुभव किंवा निकाल आपल्या मुलाचा किंवा मुलीचा आपल्याला पाहिला मिळेल. स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने मोफत देणार आहे. सुस, महाळूंगे, बाणेर, बालेवाडी, औंध भागातील जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा फायदा घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आव्हान करत आहे.

लहू बालवडकर है आपल्या सामाजिक जीवनामध्ये नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून सेवा हेच संघटन याचे पालन करत आहे. त्यांनी राबवलेले अभियान युवकांना लाभदायी ठरेल असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

युवकांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या स्पर्धा परीक्षा साठी हे अभियान राबवून लहू बालवडकर एक चांगलं काम करत आहेत असे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री माननीय सि. टी. रवी यांच्याकडून ‘यशश्री’ स्पर्धा परीक्षा संकल्प अभियानाचे कौतुक करण्यात आले. त्यांनी लहू बालवडकर सोशल वेल्फेअर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार गिरीश बापट आणि प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

]]>
लहू बालवडकर यांच्या वतीने एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिर संपन्न https://maknews.live/archives/7923?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8 Fri, 11 Feb 2022 16:35:53 +0000 https://maknews.live/?p=7923

बालेवाडी :

भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांच्या वतीने दिनांक १० फेब्रुवारी रोजी बालेवाडी येथील लहु बालवडकर जनसंपर्क कार्यालय येथे एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरासाठी डॉ. प्रविण बढे सर (M.D. PHD, नॅचरोपॅथी सायन्स) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

शिबिराची माहिती देताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, आपले आरोग्य ठीक असेल तर जीवन सुरळीत होते. परिसरातील नागरिकांचे आरोग्यविषयक काळजी घेताना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सल्ला आरोग्याची मोफत तपासणी साठी विशेष शिबिर आयोजित केले होते त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. देखील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यादृष्टीने वेगवेगळ्या प्रकारे शिबिर आयोजित करण्यात येतील.

या एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. तसेच या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा बाणेर-बालेवाडी येथील साडेचारशे पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमास ह. भ. प. दिलीप नाना बालवडकर, मा. कांतीलाल शेठ बालवडकर, मधुकर बालवडकर, गजानन बालवडकर, ज्ञानेश्वर बालवडकर, राजेंद्र मांगडे, शरद बालवडकर, सचिन गायकवाड, संतोष बालवडकर, किरण बालवडकर, तानाजी माने, बाळासाहेब काळे, रोहित चोरगे, अमोल गायकवाड, संध्या नितनवरे यांच्यासोबत परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

]]>
लहू बालवडकर यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन https://maknews.live/archives/7447?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25a6 Mon, 10 Jan 2022 07:31:21 +0000 https://maknews.live/?p=7447

कोथरुड :

भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांच्यावतीने प्रभागातील नागरिकांसाठी नववर्षाच्या निमित्त तयार केलेली २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

दिनदर्शिकेच्या प्रकाशनाची माहिती देताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, आपल्या जीवनामध्ये दिनदर्शिके ला एक वेगळे महत्त्व आहे. दिनदर्शिकेमुळे सन, सणावळ, विविध तिथि आणि आवश्यक असणारी सर्व माहिती उपलब्ध होत असते. ही दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना उपयोगी पडेल अशी ही दिनदर्शिका सविस्तर माहितीसह उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. ही दिनदर्शिका प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल असा प्रयत्न करणार आहे.

दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना लहू बालवडकर यांच्या लोकोपयोगी कामाची प्रशंसा केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केली. भविष्यात देखील चांगलं काम करण्यासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील लहू बालवडकर यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय नेहमीच लहु बालवडकर हे समाज उपयोगी कार्यक्रमात अग्रेसर असतात म्हणून त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली. नियोजन बद्ध रीत्या बनविलेल्या दिनदर्शिकेचे कौतुक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील केले.

केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, संघटक सचिव राजेश पांडे, नगरसेवक दीपक पोटे, कोथरुड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, संदीप खर्डेकर, योगेश बालवडकर, विनोद बालवडकर, दिनेश बालवडकर, हर्णेश देवकर, किरण बालवडकर, संदिप तापकीर, श्रीकांत नायकोडे आदी उपस्थित होते.

]]>
आरोग्य तपासणी मुळे रोगाचे निदान होते, रोगाचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते : लहू बालवडकर. https://maknews.live/archives/6885?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a Sun, 05 Dec 2021 12:51:10 +0000 https://maknews.live/?p=6885

बालेवाडी :

बालेवाडी, बाणेर, सुस, म्हाळुंगे मधील सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी विशेष मोफत आरोग्य शिबिर ‘आरोग्यम धनसंपदा’ लहु बालवडकर सोशल वेलफेअर व कृष्णा डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिरास परिसरातील ३०० नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्या करिता भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांच्यावतीने नेहमीच आरोग्यदायी सामाजिक योजना राबविल्या जात आहे.

या शिबिराची माहिती देताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची माहिती मिळण्याकरता आवश्यक असणारे मोफत आरोग्य शिबिर राबविले आहे. नागरिकांनी मोठ्या उत्साहात आपल्या आरोग्याची काळजी घेणे करता या आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवून आपली तपासणी करून घेतली. आरोग्य तपासणी मुळे रोगाचे निदान होते, रोगाचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते यामुळे या आरोग्य शिबिराचे आयोजन महत्त्वाचे आहे. या पुढे देखील अश्याच प्रकारे सगळ्या पध्दतीचे छोटे छोटे शिबीरे नेहमीच घेणार आहोत.

या मोफत आरोग्य शिबिरामध्ये खालील प्रकारे तपासणी मोफत आणि सल्ला देण्यात आला.
१) हिमोग्लोबिन तपासणी
२) मधुमेह तपासणी
३) थायरॉईड तपासणी
४) बॉडी मास्क इंडेस्क तपासणी
५) मणक्याच्या विकारावर तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला (डॉ. राहुल चौधरी, MS Ortho ECFMG (USA))

]]>