रेल्वे – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Mon, 06 Mar 2023 01:10:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 रेल्वेच्या व्हॉईस-आधारित ई-तिकीट बुकिंग सुविधेमुळे ऑनलाइन आरक्षण तिकिट बुकिंग प्रक्रिया होणार सोपी.. https://maknews.live/archives/12429?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2589%25e0%25a4%2588%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a4 Mon, 06 Mar 2023 01:10:40 +0000 https://maknews.live/?p=12429

मुंबई :

ट्रेनमध्ये तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगिन करून संपूर्ण फॉर्म भरावा लागतो, ज्यामध्ये प्रवाशाचे नाव आणि प्रवासाच्या तपशीलाची लेखी माहिती दिली जाते.

या काळात तिकीट बुक करण्यासाठी बराच वेळ लागतो. अनेकदा असे होते की सीट असूनही वेटिंग तिकीट मिळते. पण आता फॉर्म भरण्याचा हा त्रास दूर होऊ शकतो, कारण आयआरसीटीसी आता असे ॲडवन्स व्हॉईस फीचर आणत आहे, ज्यात बोलून तिकीट बुक केले जाईल. तुम्ही गुगल व्हॉईस असिस्टंट आणि अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साची मदत घेत आहात आणि आता याच धर्तीवर तुम्ही आयआरसीटीसीच्या या नव्या फीचरचा लाभ घेऊ शकाल. प्रवाशांना ही सुविधा देण्यासाठी रेल्वेने पूर्ण तयारी केली आहे.

टेस्टिंगचे काम सुरू
आयआरसीटीसीच्या आगामी व्हॉईस-आधारित ई-तिकीट बुकिंग सुविधेमुळे ऑनलाइन आरक्षण तिकिट बुकिंग प्रक्रिया सोपी आणि वेगवान होईल. ईटी नाऊच्या वृत्तानुसार, सूत्रांनी दावा केला आहे की आयआरसीटीसी सध्या आपल्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्लॅटफॉर्मवर AskDisha मध्ये काही आवश्यक बदल करणार आहे.

रिपोर्टनुसार, चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. ही सुविधा सुरू करण्यापूर्वी आयआरसीटीसी लवकरच आणखी काही पावले उचलण्याची अपेक्षा आहे. आयआरसीटीसी येत्या तीन महिन्यांत ‘AskDisha’ ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर एआय-संचालित व्हॉईस-आधारित तिकीट बुकिंग सुविधा सुरू करण्याची अपेक्षा आहे.

AskDisha हे उत्तम कामाचे वैशिष्ट्य आहे
प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आयआरसीटीसीने ‘आस्कदिशा’ हा विशेष कार्यक्रम तयार केला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या आस्कदिशा ग्राहकांना ओटीपी व्हेरिफिकेशन लॉग-इनद्वारे तिकीट आणि इतर सेवा बुक करण्याची परवानगी देते.

हे फीचर वापरण्यासाठी युजर्सला आयआरसीटीसी युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करण्याची गरज नाही. एआय-संचालित ई-तिकीट वैशिष्ट्यामुळे आयआरसीटीसीच्या बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही वाढ होण्याची अपेक्षा आहे. या सुविधेमुळे आयआरसीटीसीची दररोज ऑनलाइन तिकीट बुकिंग क्षमताही वाढणार आहे.

]]>
देशातील तीन प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला केंद्रिय मंत्रिमंडळात मंजुरी https://maknews.live/archives/10809?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2596-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5 Thu, 29 Sep 2022 01:18:29 +0000 https://maknews.live/?p=10809

नवी दिल्ली :

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज तीन मोठे निर्णय घेतले. त्यात रेल्वे स्थानकांच्या पुनरुज्जीवनाचाही समावेश आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई या तीन प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिली.

या प्रकल्पात सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. याशिवाय देशातील १९९ प्लॅटफॉर्मच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू आहे.

रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकांच्या एकत्रीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १९९ रेल्वे स्थानकांच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची जागा विकसित करण्यात येणार आहे. स्थानकाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासाठी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

असे आहे सरकारचे नियोजन
केंद्र सरकार रेल्वे स्थानकांच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन प्रमुख रेल्वे स्थानकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये नवी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर बस, ऑटो आणि मेट्रो रेल्वे सेवांसोबत रेल्वे सेवा एकत्रित केल्या जातील. त्याच वेळी, अहमदाबाद रेल्वे स्थानकाची पुनर्रचना मोडेराच्या सूर्य मंदिरापासून प्रेरित आहे. मुंबईतील हेरिटेज इमारतीला हात लावला जाणार नसून, आजूबाजूच्या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे.

तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली की केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) योजना पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच केंद्राने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या ३८ टक्के महागाई भत्त्यामध्ये नवीनतम वाढ होईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. देशातील एकूण १९९ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून या दिशेने टप्प्या-टप्प्याने कार्य सुरु आहे. यातील ४७ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यासाठी निविदा मागविण्यात आल्याअसून ३२ रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास कार्य प्रगतीवर आहे.

रेल्वेस्थानक पुनर्विकास कार्यांतर्गत रेल्वे स्थानकावर खाद्य व वस्तू विक्रेत्यांसाठीची जागा, कॅफ्रेटेरिया, मनोरजंन सुविधांसह प्रवाशांना बसण्याची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. फुड कोर्ट, प्रतिक्षालय, मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक वस्तूंच्या खरेदीची जागा, सीटी सेंटर उभारणे आदी बाबींचा यात समावेश आहे.

https://twitter.com/PIB_India/status/1575056057365598208?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1575056057365598208%7Ctwgr%5E0947ae9d7cd7b5be1a02413edbe77abd1795fbf2%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

]]>
दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडले जाणार, सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश https://maknews.live/archives/7008?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258c%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a1-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2595-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa Fri, 10 Dec 2021 01:50:59 +0000 https://maknews.live/?p=7008

दिल्ली :

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीला अखेर यश आले असून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.

या निर्णयासाठी सुळे यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा करत होत्या. या रेल्वे मार्गामुळे दौंड ते पुणे असा रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे.

दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यालाच प्राधान्य देतात. शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे हा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडल्यास त्यांच्या अडचणी आणि प्रश्न तातडीने सुटणे सोपे होणार आहे.
दौंड रेल्वे स्थानक पुणे शहर आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. याठिकाणी येणाऱ्या अडचणी किंवा काही अनुषंगिक कामे करण्यासाठी पुण्यातील अधिकाऱ्यांना वेळेत पोहोचणे शक्य होते. त्यामुळे हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी त्या सातत्याने सरकारकडे करत होत्या. या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून दौंड स्थानक आता पुणे विभागीय रेल्वे स्थानकाला जोडण्यात आले आहे.

अशी असेल नवी रचना
रेल्वेच्या पुणे विभागात सध्या ५३१.१५ रेल्वेकिलोमीटर इतका रेल्वेमार्ग आहे. त्यात आता वाढ होऊन ७३९.४२ रेल्वेकिलोमीटर इतका होईल. तर सोलापूर विभागाचे ९८१.५३ रेल्वेकिलोमीटरचे ७७३.३६ रेल्वेकिलोमीटर इतके होतील. पुणे विभागात आतापर्यंत ७० रेल्वेस्थानकांचा समावेश होता. त्यात २४ ची भर पडून आता एकूण ९४ स्थानके होतील तर सोलापूर विभागातील ८५ स्थानकांची संख्या ६१ इतकी होईल, असे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आपल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या पुणे हे महाराष्ट्रातील महत्वाचे केंद्र असून कोल्हापूर, सांगली, नाशिक, नगर आणि सोलापूर या शहरांसाठी ते मध्यवर्ती ठरते. या दृष्टिकोने सुद्धा रेल्वेने उत्तर भारताला जोडणारे दौंड स्थानक पुण्याला जोडणे आवश्यक असल्याचे निरीक्षण रेल्वे मंत्रालयाने नोंदवले आहे.

]]>
प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भारतीय रेल्वेची 24 तास कार्यरत राहणार या आयटी सेल ची उभारणी. https://maknews.live/archives/6897?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be Sun, 05 Dec 2021 19:13:25 +0000 https://maknews.live/?p=6897

पुणे :

भारतीय रेल्वेने प्रवासाभिमुख होण्याचे धोरण स्वीकारले आहे. प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा करतानाच त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना आखण्यासाठी रेल्वेने चोवीस तास कार्यरत राहणाऱ्या आयटी सेलची उभारणी केली आहे.

मध्य रेल्वेत पहिल्यांदाच अशा प्रकारची यंत्रणा सुरू झाली असून ती पुण्यातल्या घोरपडी शेड येथून काम करणार आहे.

रेल्वे प्रवासात प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कधी डबे अस्वच्छ असतात. कधी शौचालयात असह्य दुर्गंधी असते. कधी डब्यात समाजविघातक प्रवृत्ती सहप्रवाशांना त्रास देतात. अशा कोणत्याही तक्रारींसंदर्भात ऑनलाइन तक्रार केल्यानंतर अर्ध्या तासात त्याचा निपटारा केला जात असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. आता या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. प्रवाशांचा प्रवास आनंददायी होण्यासाठी, त्यांच्या तक्रारींवर चोवीस तास काम केले जाणार आहे. याचा डेटा तयार करून उपाययोजना आखण्याचे काम आयटी सेल करणार आहे. पुणे विभागातील वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयकुमार दडस यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

घोरपडी डिझेल शेडमध्ये उभारण्यात आलेल्या या आयटी सेलचे उद्घाटन मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नुकतेच केले. पुण्यातील आयटी सेलमधूनच मुंबई, सोलापूर, भुसावळ, नागपूर व पुणे विभागातून धावणाऱ्या गाड्यांचे कोचसंदर्भात तक्रारीचे स्वरूप जाणून घेतले जाईल. यासाठी प्रत्येक विभागात लवकरच स्वतंत्र यंत्रणा उभारली जात आहे.

पुण्यातून रोज सरासरी ६ तक्रारी

पुणे विभागातून धावणाऱ्या गाड्यातून रोज सुमारे ६ तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे येतात. डब्यांत पाणी नसणे, शौचालय तुंबणे, डब्यांत अस्वछता, पाण्याच्या टाकीतून पाणी गळणे, खिडक्या नादुरुस्त, विद्युत उपकरणे बंद अशा स्वरुपाच्या या तक्रारी प्रामुख्याने आहेत.

डब्यांची देखभाल दुरुस्ती

दर सोळा महिन्यांनी डबे आयओएच (इंटर मीडिएट ओव्हरऑयलिंग) साठी पाठवले जातात. यात डब्यांची दुरुस्ती केली जाते. याचे देखील रेकॉर्ड आयटी सेल ठेवणार आहे. धावत्या रेल्वेतील एखादा डबा अचानक नादुरुस्त झाल्यास त्याच्या कारणांचा येथे अभ्यास केला जाणार आहे.

‘पुण्यात मध्य रेल्वेचा पहिला आयटी सेल सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांच्या तक्रारी, अडचणींचा शोध घेऊन त्याचा अभ्यास करणे यात अपेक्षित आहे. वारंवार उद्भवणाऱ्या अडचणींवर कायमस्वरुपी उपाय शोधण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे असे मध्य रेल्वे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले आहे.’

]]>
पुणे शहरात आता तिसरे रेल्वे स्टेशन सूरू करण्याचा मध्ये रेल्वेचा निर्णय https://maknews.live/archives/4261?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d Sat, 03 Jul 2021 19:27:35 +0000 https://maknews.live/?p=4261

हडपसर :

पुणे शहराचे तिसरे रेल्वे स्टेशन आणि गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे हडपसर रेल्वे स्टेशन. आत्ता या हडपसर रेल्वे स्टेशनमधून स्वतंत्र वाहतूक सुरू होईल. 8 जुलै रोजी या स्टेशनमध्ये स्वतंत्र ट्रेन पोहोचेल आणि 9 जुलैला हैदराबादला रवाना होईल. अलीकडेच या स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेने या स्टेशनमधून रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधीच पुणे शहरात शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्टेशन हे दोन स्टेशन आहे. पुणे स्टेशनमधून स्वतंत्र गाड्या सोडण्यात आल्या आहेत. पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर स्टेशनच्या आसपास रहिवासी लोकसंख्येचे प्रमाण बरेच आहे. जागेच्या अडचणीमुळे या स्टेशनचा विस्तार करता येणार नाही. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय म्हणून हडपसर रेल्वे स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन वर्षांपासून हडपसर रेल्वे स्टेशनचे काम सुरू झाले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्व गाड्या या स्टेशनमधून सोडण्याचे नियोजन बनविले आहे. अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मोठे फ्लेटफॉर्म, वेटिंग रूम, एक्सलेटर, अत्याधुनिक तिकीट व्यवस्था, कॅटरिंग सेवा, पोलिस, पार्किंग इत्यादी सुविधा येत्या काळात टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील. पीएमपी, कॅब आणि रिक्षाने हडपसरहून पुण्याला जाता येते.

पूर्वी हड़पसर स्टेशन वर 16 डब्ब्यांच्या ट्रेन्स थांबत होत्या. प्लॅटफॉर्मच्या लांबीमुळे लांब ट्रेन येथे थांबत नव्हत्या. परंतु आता येथून 22 डब्यांच्या गाड्या या स्टेशनवर थांबतील. तसेच पुढच्या वर्षी गाड्यांचे 24 डबे येथून सुरू होतील. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

हैदराबादहून (07014) ही ट्रेन 8 जुलै पासून दर सोमवारी, गुरुवार आणि शनिवारी रात्री 08:30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 10:30 वाजता हडपसरला पोहोचेल. हडपसरहून (07013) ही गाडी 9 जुलै पासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी 03:30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 03:30 वाजता पोहोचेल. ही ट्रेन दौंड, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, लिंगमपल्ली आणि बेगमपेठ इत्यादी स्थानकांवर थांबेल.

]]>
लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळेस चार्जिंग पॉईंट बंद राहणार. https://maknews.live/archives/2754?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2587 Mon, 29 Mar 2021 17:59:45 +0000 https://maknews.live/?p=2754

दिल्ली :

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करताना प्रवासी सीटजवळी चार्जिंग पॉइंट आहे का हे आधी पाहतात. दरम्यान अनेक प्रवासी मोबाईल फोन, लॅपटॉप तासंतास चार्जिंग झोपा काढतात. यामुळे रेल्वेत अनेकदा आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळेस चार्जिंग पॉईंट बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्ऱॉनिक वस्तू चार्ज करता येणार नाही.

१३ मार्चला दिल्ली- देहराडून शताब्दी एक्सप्रेसमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासादरम्यान धुम्रपान करणाऱ्यांवरही कडक कारवाई होणार आहे. रेल्वेच्या १७७ कायद्यानुसार रेल्वेत धुम्रपान करणाऱ्यांना १०० रुपये दंड अशी शिक्षेची तरतुद आहे, परंतु या शिक्षेतही वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांना आता चार्जिंग पाईंट बंद करण्यास जबाबदार धरत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कठोर शिक्षा, दंड आणि अटक करण्यासंबंधी योजना तयार करत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबतची अधिक माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. याविषयी ठाकूर म्हणाले की, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत रेल्वेतील चार्जिंग पाईंट बंद ठेवण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप जास्तीत जास्त वेळ चार्ज केल्यामुळे आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेत चार्जिंग पाईंट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

परंतु या निर्णयाला प्रवासी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. रेल्वेतीव चार्जिंग पाईंट वापरण्यावर निर्बंध आणणे चुकीचे आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकाधिक सेवा देण्याऐवजी सुविधा कमी करत आहेत त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

]]>
मुंबई सेन्ट्रल टर्मिनस चे बदलणार नाव ! https://maknews.live/archives/999?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%2588-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%259f%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%259a Thu, 07 Jan 2021 00:56:10 +0000 https://maknews.live/?p=999

मुंबई :

आर्थिकदृष्ट्या विकसित असलेल्या मुंबईचा पाया एका मराठी माणसाने, नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांनी रचला.

मुंबईः महाराष्ट्रात सध्या नामांतराच्या मुद्द्यांवरुन राजकारण तापले आहे. त्यातच आता मुंबईतील स्थानकांच्या नामांतराचा मुद्दाही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनस’चे ‘नाना शंकरशेट टर्मिनस’ असे नामकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. तसंच, याबाबत सकारात्मक पत्रदेखील गृहराज्यमंत्र्यांनी अरविंद सावंत यांना लिहलं आहे.

भारतातील पहिल्या रेल्वेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी नाना शंकरशेठ यांनी अथक प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या विकसित असलेल्या मुंबईचा पाया एका मराठी माणसाने, नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांनी रचला. प्रसंगी स्वतःचा वाडा रेल्वे कार्यालयासाठी देऊ केला होता. त्यामुळे तत्कालीन इंग्रज सरकारने त्यांचा यथोचित सन्मान करुन रेल्वेचा सोन्याचा पास दिला. तसंच, मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातील दर्शनी भिंतीवर नानांचा पुतळा बसविला आहे.

]]>
जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन भारतात ! https://maknews.live/archives/954?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259c%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2589%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25bf%25e0%25a4%259f%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d Mon, 04 Jan 2021 17:57:12 +0000 https://maknews.live/?p=954

मुंबई :

भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’ बनवली आहे. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या एक्स्प्रेसचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. आता भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे. अशी ट्रेन अद्यापही जगात कुठेही सुरू केलेली नाही.

ही ट्रेन एकूण ७ डब्ब्यांची आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चिकित्सकांची टीम तैनात आहे. या विशेष ट्रेनमध्ये आतापर्यंत १ लाख ४६ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये मोती बिंदू, कर्करोग अशा अनेक आजारांवर उपचार केले जातात. सर्वात प्रथम भारतानेच अशाप्रकारच्या हॉस्पीटल ट्रेनची उभारणी केली आहे.

या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत. विशेष म्हणजे, ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’मध्ये रुग्णांचा मोफत उपचार केला जाणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने याआधीच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचललं आहेत.‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे.

]]>
सातारा ते कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामांना वेग ! https://maknews.live/archives/918?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d Mon, 04 Jan 2021 00:38:34 +0000 https://maknews.live/?p=918

पुणे :

महाव्यवस्थापकासह मध्य रेल्वेच वरिष्ठ अधिकारी कराड, सांगली, मिरज व कोल्हापुरची पाहणी करणार आहेत. मध्य रेल्वेच्या सातारा-पुणे विभागाची वार्षिक तपासणी गतवर्षी जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्यासह मध्य रेल्वेच्या सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती.

त्यांनी सातारा, वाठारस्टेशन, लोणंद, निरा, वाल्हे, जेजुरी पुणे अशी पाहणी केली. पुणे येथे सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या.याच धर्तीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक जानेवारीमध्ये सातारा ते कोल्हापूर मार्गाची पाहणी करणार असल्याचे समजते. या मार्गावर मध्य रेल्वेकडून विविध कामे युध्दपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. शिवाय मध्य रेल्वेच्या सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीही या मार्गावर वाढल्या आहेत. पुणे-मिरजकोल्हापूर या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मध्य रेल्वेमार्फत युध्दपातळीवर सुरू आहे. कोल्हापूर ते मिरज या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

मध्य रेल्वेच्यावतीने सातारा ते कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी तसेच वार्षिक तपासणी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सातारा ते कोल्हापूर या ट्रॅकची पाहणी करण्यासाठी जानेवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. यानुसार मध्य रेल्वेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गाठी भेटी सातारा ते कोल्हापूर दरम्यान असणाऱ्या स्थानकांवर वाढल्या आहेत.

मिरज ते सातारा मार्गाचे तसेच रेल्वेच्या सिग्नल व टेलीकॉम डिपार्टमेंटचे काम सुरू आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर रेल सुरक्षा आयुक्त या मार्गाची तपासणी करून रेल्वे मंत्रालयाकडे अहवाल पाठवणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने सिग्नल दिल्यानंतर हा मार्ग रेल्वेसाठी सुरु होणारआहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाच्याविद्युतीकरणासाठी 513 कोटीचा निधी दिला आहे.

विभागीय रेल्वे आणि पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑल इंडियामध्ये करार झाल्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आला. त्यानंतर कोल्हापूर ते पुणे या 326 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

या रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी टेलिफोन विभागाचीही कामे रेल्वेने हाती घेतली आहेत. पुणे ते कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. सध्या कोल्हापूर ते मिरज 47 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

मिरज ते शेणोली 53 किलोमीटर व जेजुरी ते पुणे 32 किलोमीटर व फुरसुंगी ते पुणे 12 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.  सातारा 132 किलोमीटरचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सातारा रेल्वे स्थानक परिसरात विविध विभागाची कार्यालय व निवासस्थानांचीकामे सुरू आहेत.

]]>
राजधानीमुळे मुंबई ते नाशिक प्रवास अडीच तासात होणार.  https://maknews.live/archives/814?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%2588-%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6 Wed, 30 Dec 2020 18:59:24 +0000 https://maknews.live/?p=814

मुंबई :-

नववर्षाच्या मुहूर्तावर देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या प्रवाशांना मुंबई ते नाशिक हे अंतर केवळ एक थांबा घेऊन पूर्ण करता येणार आहे. बुधवार दि. ३० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून विशेष राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. राजधानीमुळे मुंबई ते नाशिक हे अंतर जवळपास अडीच तासांत पार करणे शक्य होणार आहे.

राजधानी विशेष गाडी (०१२२१ ) सीएसएमटीहून दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दुपारी ४.१० वाजता सुटेल. सायंकाळी ६. ४५ वाजता नाशिक रोडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दिल्लीला पोहचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भोपाळ, झांसी आणि आग्रा कॅन्टोन्मेंट या स्थानकांवर थांबेल. ही विशेष गाडी (०१२२२) दर मंगळवार, गुरूवार, शनिवार आण रविवारी दिल्लीहून दुपारी ४.५५ ला रवाना होईल आणि सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० ला पोहचेल.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता सीएसएमटी-नागरकोईल, एलटीटी-भुवनेश्वर, एलटीटी-पुरी, एलटीटी-विशाखापट्टणम, एलटीटी-हटीया, एलटीटी-गोरखपूर, सीएसएमटी-पटना या आणि अन्य मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.

या विशेष गाड्यांच्या वेळा आणि आरक्षणासाठी www.irctc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच आरक्षण केंद्रावरही या गाड्यांचे आरक्षण करता येईल.

]]>