राजकिय – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Sun, 03 Jan 2021 07:50:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 सुतारवाडी पाषाण भागातील युवकांचे शिवसेनेत प्रवेश.  https://maknews.live/archives/912?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2 Sun, 03 Jan 2021 07:50:23 +0000 https://maknews.live/?p=912

पाषाण :

शिवसेना शहर प्रमुख संजयभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत आज हिंदुत्ववादी कार्यकर्ते कमलेश सुतार यांच्यासह सुतारवाडी, पाषाण भागातील युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

केंद्र सरकारच्या नविन क्रुषी विधेयकांविरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ देण्यासाठी साईचौक पाषाण येथे गेल्या २३ दिवसांपासून पुणेशहर शिवसेनेच्या वतीने उपशहरसंघटक आशुतोष आमले व शिवसैनिकांचे रस्त्यावर तंबु ठोकुन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. ज्या प्रकारे शिवसैनिक रात्रंदिवस उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता चिकाटीने आंदोलनावर ठाम आहेत याने प्रेरीत होऊन सुतारवाडी येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते कमलेश काळुराम सुतार यांच्या सह समर्थकांनी आज शहरप्रमुखांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शहरप्रमुख मोरे यांनी शिवसेना खंबीर पणे सर्वांच्या पाठिशी असुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ८० टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण या शिकवणी नुसार भागातील जनतेच्या कामांवर भर देऊन कामाला लागा असे सांगितले, आमले यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी उपशहरसंघटक आशुतोष आमले, शिवाजीनगर मतदारसंघाचे समन्वयक सुशिल लोणकर, अजयभाऊ शिंदे, विभागप्रमुख राहुल जेकटे, युवासेना विभाग अधिकारी सनी गवते, बाणेर नागरी पतसंस्थेचे दिलीपभाऊ मुरकुटे, शाखा प्रमुख सुनिल राजगुरू, भरत दहिभाते, उपशाखाप्रमुख अविनाश राठोड, सामाजिक कार्यकर्ते अजय ढावरे, शिवनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष तोंडे अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

]]>
पुणे शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री https://maknews.live/archives/874?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587 Sat, 02 Jan 2021 13:04:59 +0000 https://maknews.live/?p=874

पुणे :

पुणे महानगरपालिका सभागृहात ऑनलाईन पदधतीने भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, आ.चंद्रकांत पाटील, आ. भीमराव तापकीर, आ.चेतन तुपे, आ.सुनील कांबळे, आ. सुनील टिंगरे, आ.मुक्ता टिळक, माजी आ. जगदीश मुळीक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, उपमहापौर सरस्वती शेंडगे उपस्थित होते.

यावेळी भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण करण्यात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक, नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

भामा आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पाण्याची अडचण दूर होणार आहे. राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने राज्य शासन कायम प्रयत्नशील आहे. भामा- आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पूर्व भागातील पाण्याची अडचण दूर होणार आहे. नदी सुधार प्रकल्प, जायका प्रकल्प महत्त्वाचे असून ज्या शहरात पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळते ती शहरे झपाट्याने वाढतात, त्यामुळे पाणी व्यवस्थेसोबतच शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगतानाच शहराचा विकास करताना प्रत्येक घटकाचा विचार केला जाईल त्यांचेही प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वांनी एकत्रित येऊन लोककल्याणाची कामे करायची असतात. या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुणेकरांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागतो आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया यावर मोठा भर देण्यात आला. तो याहीपुढे कायम ठेवला पाहिजे. त्यातून सिंचनाच्या पाण्यावर ताण येणार नाही. पुण्यातील प्रदूषण कमी करायचे असेल तर वाहतुकीच्या विविध साधनांकडे अगत्यपूर्वक लक्ष द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

]]>
चंद्रकांत दादांचे रश्मी वहिनींना पत्र ! https://maknews.live/archives/902?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=902 Sat, 02 Jan 2021 00:05:55 +0000 https://maknews.live/?p=902

पुणे :

शिवसेनेनं भाजपशी असलेली मैत्री तोडून वैचारिक भिन्नता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा संसार सुरु केला. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवून मोठा पक्ष बनलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. सद्या जुने मित्र असलेल्या शिवसेना व भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दात टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. सामनातून बी जे पी नेत्यांवर कडवट व गलिच्छ शब्दात टीका केली जाते. या सामनातील टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी व सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्याकडे या आक्षेपार्ह भाषेसंदर्भात तक्रार केली आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांना रीतसर पत्र लिहिलं आहे.

 

]]>
उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्या समोरच बीजेपी व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ https://maknews.live/archives/853?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2589%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2596%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa Fri, 01 Jan 2021 13:58:13 +0000 https://maknews.live/?p=853

पुणे:

भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत भामा आसखेड पाणी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी व हुल्लडबाजी करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

अजित पवार व फडणवीस यांच्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात सत्तेसाठी झालेली औटघटकेची मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने तिथे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यामुळेच हे दोन नेते आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात या दोन नेत्यांची भाषणं दूरच राहिली आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळानेच कार्यक्रम चर्चेत आला. करोनामुळे नियमांचे बंधन असले तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातूनच गोंधळाला सुरुवात झाली.

भामा आसखेड पाणी प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘एकच वादा अजित दादा’ विरुद्ध ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’, अशा घोषणा देत कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. यात काही प्रमाणात हुल्लडबाजीही पाहायला मिळाली. या घोषणा सुरू केल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू, पोलिसांनी मध्यस्थी करुन कार्यकर्त्यांना शांत केले. श्रेय घेण्यावरून आम्ही विरोध करत आहोत असे भाषण करते म्हणत होते पर्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार अक्षरवेल अजित पवारांच्या प्रयत्नांनीच हा प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगितले.भाजप कार्यकर्ते देत असलेल्या घोषणा गिरीश बापट यांच्या नावाने असल्याने भाजपच्या अंतर्गत गटबाजी असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला आहे. पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झाले. दरम्यान, हा कार्यक्रम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकां भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणबाजी करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बऱ्याच दिवसानंतर एकत्र आले. निमित्त, पुणे महापालिकेच्या भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.

]]>