बाणेर आखाडा – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Thu, 05 May 2022 02:02:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 बाणेर येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला श्री भैरवनाथ मानाच्या गदेचा मानकरी.. https://maknews.live/archives/9003?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%25af Thu, 05 May 2022 02:02:55 +0000 https://maknews.live/?p=9003

बाणेर :

बाणेर येथील श्री भैरवनाथ देवस्थानच्या यात्रेच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी बाणेर गाव यांच्या वतीने आयोजित “भव्य राज्यस्तरीय कुस्तांच्या आखाड्याचे” आयोजन करण्यात आले होते.कुस्ती स्पर्धेचा बक्षिस वितरण सामारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे व चतुःऋगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघचौरे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये एकुण ४१८ पैलवानांनी सहभाग घेतला होता.

अंतिम सामना नाशिक जिल्ह्याच्या पै. हर्षवर्धन सदगीर आणि आणि मंगळवेढा चा पै. महेंद्र गायकवाड यांच्यात अतिशय चुरशीने खेळला गेला. यामध्ये गुणांच्या आधारे पै. हर्षवर्धन सदगीर विजय मिळवत श्री भैरवनाथ मानाच्या गदेचा मानकरी ठरला.

श्री भैरवनाथ मानाच्या गदेचा मानकरी ठरला नाशिकचा पै. हर्षवर्धन सदगीर याला गुलाबराव तापकिर यांस कडुन रोख रुपये १,७५,०००/- व कै.पै.मुकुंदा मुरकुटे यांच्या स्मरणार्थ जयसिंग मुरकुटे, संदेश मुरकुटे व अशोक मुरकुटे यांस कडुन मानाची चांदीची गदा देण्यात आली.

स्पर्धेत सुत्रसंचालन जीवन चाकणकर यांनी केले.

 

]]>