प्रकाश बालवडकर – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Wed, 27 Oct 2021 18:01:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या द्विवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन.. https://maknews.live/archives/6293?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7-%25e0%25a4%259a%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d Wed, 27 Oct 2021 18:01:02 +0000 https://maknews.live/?p=6293

कोथरुड :

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गेल्या 45 वर्षातील सामजिक आणि राजकीय कार्याच्या कॉफी टेबल बुकचे आणि आमदारकीच्या व्दितीय वर्षपूर्ती निमित्त द्विवार्शिक कार्यअहवालाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी पुणे शहर भाजपा सहकार आघाडी चे प्रभारी प्रकाश बालवडकर सहकुटुंब व सहकारी कार्यकर्ते यांच्या सोबत आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. भविष्यातील कारकीर्द गाजविण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी माजी केंद्रिय मंत्री प्रकाशजी जावडेकर, खासदार गिरीशजी बापट, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरीताई मिसाळ, भिमराव तापकीर, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, बापूसाहेब पठारे, मंडल अध्यक्ष पूनित जोशी तसेच शहर पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

]]>
मुलींसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन : भाजपचे प्रकाश बालवडकर यांच्या वतीने. https://maknews.live/archives/6242?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580%25e0%25a4%2582%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ab-%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25ab%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b8 Sun, 24 Oct 2021 10:33:04 +0000 https://maknews.live/?p=6242

बालेवाडी :

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात नुकतीच एक भीषण घटना घडली. काही नराधमांनी एका निष्पाप अल्पवयीन मुलीचा निर्घृणपणे जीव घेतला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे महिला व मुलींमध्ये एक अनामिक दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीतून बाहेर पडून स्वतः च्या संरक्षणा साठी महिलेने सक्षम होयाला हवे.

महिलांनी सक्षम व्हावे आणि स्व रक्षणासाठी नेहमी सिद्ध राहावे म्हणून महिलांचा डळमळीत झालेला आत्मविश्वास पुन्हा मजबूत करण्यासाठी एक वेगळा उपक्रम भाजपा सहकार आघाडीचे प्रभारी प्रकाश बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला.

शौर्य मार्शल आर्ट्स, सेल्फ डिफेन्स यांच्या साहाय्याने महाळुंगे-बालेवाडी स्टेडियममध्ये राज्यस्तरीय ओपन किक बॉक्सिंग टुर्नामेंट व मुलींसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉक्सिंगच्या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने मुलामुलींनी सहभाग घेतला. तसेच अनेक मुलींनी स्वसंरक्षणाचे धडेही गिरवले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतला.

यावेळी बोलताना मयुरी प्रणव बालवडकर यांनी सांगितले की,”आज येथे सर्व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे गिरवताना आणि बॉक्सिंग करताना पाहून मला खूप अभिमान वाटतोय. यातून मुलींना आपल्या ताकदीची जाणीव होतेय. मुलींनी नेहमी असेच स्ट्राँग व सुरक्षित रहावे, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे.”

या वेळी प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, महिलांसाठी नेहमी काहीतरी चांगले करण्याची धडपड मयुरी करते. मयुरीने तिच्या वागण्यातून व कामातून अल्पावधीतच आमच्या कुटुंबात सुनेपेक्षाही एक मुलगी म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तिची सामजिक क्षेत्रात काम करण्याची आवड तिचे वेगळे स्थान निर्माण करत आहे.

यावेळी भाजपासहकार आघाडीचे प्रभारी प्रकाश बालवडकर, भाजपा सदस्या मयुरी प्रणव बालवडकर, उद्योजक संजय पाडाळे, काळूराम गायकवाड, भाजपा किसान विकास मोर्चा उपाध्याक्ष हनुमंत बालवडकर,
प्रकाश बालवडकर स्वाभिमानी शेतकरी संघटना बालाजी पाटील, आदी उपस्थित होते.

]]>
प्रकाश बालवडकर यांच्या सहकार्याने बालेवाडी येथे मोफत लसीकरण मोहीम https://maknews.live/archives/6094?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5-2 Sat, 16 Oct 2021 14:47:47 +0000 https://maknews.live/?p=6094

बालेवाडी :

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून पुर्ण पणे कोरोना संपलेला नाही म्हणुनच कोरोना विरूद्ध लढण्यासाठी लसीकरण करुण घेण्याशिवाय पर्याय नाही. परंतु अल्प उत्पन्न धारक नागरिकांना लसीकरण करून घेणे शक्य होत नाही. म्हणुनच प्रभागातील अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर प्रभारी प्रकाश बालवडकर आणि मयुरी प्रणव बालवडकर यांच्या सहकार्याने मोफत लसीकरण मोहीम राबवली आहे.

शाश्वत हॉस्पिटल, लोकविकास मंडळ, युनिटी वूमेन्स क्लब, मोरया फिटेनस, सेवा आरोग्य, बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक, पुणे वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान,सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे, पीपीसीआर या सर्व संस्थांच्या माध्यमातुन अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित केली आहे.

या बद्दल माहिती देताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, लसीकरणाची गरज लक्षात घेऊन अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबविली आहे. नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले याचे समाधान प्रकाश बालवडकर यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेवून लसीकरण करून लसवंत व्हावे असे आव्हान त्यांनी केले.

यावेळी मयुरी प्रणव बालवडकर यांनी लसीकरण करण्यास येणाऱ्या नागरिकांचे स्वागत केले. आणि प्रत्यकाच्या तब्येतीची विचारपूस केली.

 

]]>
प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचा वापर करावा : चंद्रकांत पाटील https://maknews.live/archives/5639?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d Mon, 20 Sep 2021 16:52:49 +0000 https://maknews.live/?p=5639

बालेवाडी:

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रकाश बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार महेश लांडगे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मयुरी प्रणव बालवडकर यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून प्रकाश बालवडकर नागरिकांची सेवा करत भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करत आहेत. येथून पुढे ही नागरिकांच्या अडीअडचणी प्रसंगी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही बांधील राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलेल्या सेव हेच संघटन या तत्त्वाचा अवलंब करून प्रकाश बालवडकर आणि मयुरी प्रणव बालवडकर यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याकरता जनसंपर्क कार्यालय उभे केले. नागरिकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी एक हक्काची जागा उपलब्ध केली आहे. त्यांनी आज पर्यंत चांगल्या पद्धतीने नागरिकांची सेवा केली आहे. ती अशीच पुढे चालू राहील अशी खात्री यावेळी त्यांनी व्यक्त केली.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देताना सांगितले की, या जनसंपर्क कार्यालयांमध्ये नागरिकांची सेवा घडो. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम प्रकाश बालवडकर यांच्या माध्यमातून घडेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. ‘राष्ट्र प्रथम’ ही पक्षाची शिकवण असल्यामुळे ‘जनसेवा हेच पक्षकार्य’ हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचे ब्रीद असते. त्यामुळे सामाजिक जीवनात मिळणारे प्रत्येक पद, प्रत्येक संधी केवळ जनतेच्या सेवेसाठीच खर्ची घालतोय. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधणे शक्य होणार आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे, औंध प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक अमोल बालवडकर, पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा ओबीसी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, शिवम बालवडकर, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेवक सागर गवळी, राहुल कोकाटे, प्रशांत हरसुले, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, पांडुरंग धावडे, नीलेश निम्हण, गोरख दगडे, काळुराम गायकवाड, अनुराधा एडके, राज तांबोळी, जगन्नाथ धनकुडे, व्यापारी संघटनेचे किरण तापकीर, प्रकाश तापकीर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

 

 

]]>
बालेवाडी येथे फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व रिक्षाचालकांचा विमा…! https://maknews.live/archives/4583?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ab%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582 Thu, 22 Jul 2021 14:07:13 +0000 https://maknews.live/?p=4583

बालेवाडी :

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पुणे शहराच्या वतीने ५१,००० वृक्ष लागवड करण्याचे अभियान आज शहरभर राबविण्यात येत आहे. भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर प्रभारी प्रकाश बालवडकर यांच्या माध्यमातून लक्ष्मीमातानगर (बालेवाडी) येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम वारकरी संप्रदायातील मान्यवर संत तुकाराम महाराजांचे १०वे वंशज पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प शिवाजी महाराज मोरे, पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त माधवीताई निगडे, यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सुस म्हाळुंगे बाणेर बालेवाडी या भागातील रिक्षावाले काका यांच्यासाठी मोफत अपघात विमा योजना चालू करण्यात आली. आज ५१ वृक्षरोपण व ५१ रिक्षावाले काका यांना विमा काढून देण्यात आला.

याची माहिती देताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, भाजपा पुणे शहर यांच्या वतीने 51 हजार वृक्ष लागवड करण्याचे अभियान हाती घेतले आहे. त्यास हातभार लागावा या हेतूने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे. यासाठी केवळ देशी झाडांची निवड केली असून आपल्या पुढच्या पिढीला आपली देशी झाडे माहिती व्हावी हा त्यामागचा हेतू आहे असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, प्रभागातील रिक्षाचालकांना बिकट आर्थिक परिस्थिती मधून जावे लागत आहे. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता मोफत दोन लाखाचा अपघाती विमा ही योजना आज सुरु करत आहे.

या वेळी पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प शिवाजी महाराज मोरे, भाजपा सदस्या मयुरी प्रणव बालवडकर, पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त माधवी निगडे, नगरसेविका ज्योती कळमकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत सदस्य राजेंद्रजी सारंगे यांच्या हस्ते सुभाष भोळ, शिवम बालवडकर, प्रशांत बालवडकर, बाळासाहेब बालवडकर, बजरंग टकले, राजेंद्र कविटकर, शिवराज बालवडकर, शाम बालवडकर, प्रतिक बालवडकर, विकास बालवडकर, बालाजी पाटील, शाम बालवडकर, सोमनाथ बालवडकर आदी बहुसंख्य भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून या अभियानाला सुरुवात झाली.

]]>
आयुष्यमान भारत योजनेचे नागरिकांनी लाभ घ्यावा : प्रकाश बालवडकर https://maknews.live/archives/4374?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%25af%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25af%25e0%25a5%258b%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25a8 Sat, 10 Jul 2021 15:33:09 +0000 https://maknews.live/?p=4374

बालेवाडी :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी 2018 साली ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना हे महत्वपूर्ण पाऊल टाकले. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला केंद्र शासनाकडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे पुणे शहर प्रभारी प्रकाश तात्या बालवडकर यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा सदस्य मयुरी प्रणव बालवडकर यांच्या माध्यमातून बाणेर – बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी या योजनेचे कार्ड मोफत काढून देण्याचा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सुरुवात झाली असुन नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोदी सरकारने नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजना त्यांच्या पर्यंत पोचविण्याचा उद्देश लक्षात घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे.

पात्र नागरिकांसाठी दि. १० जुलै ते १३ जुलै सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्रकाश बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश बालवडकर यांनी केले आहे.

]]>
प्रकाश बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन. https://maknews.live/archives/4317?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4 Wed, 07 Jul 2021 15:11:46 +0000 https://maknews.live/?p=4317

बालेवाडी :

बालेवाडी येथे पुणे सहकारआघाडीचे प्रकाश बालवडकर यांच्या वतीने एक थोर राष्ट्रीय नेते व भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह (मंत्री) अनिल माणकीकर यांचे अत्यंत उद्बोधक असे व्याख्यान संपन्न झाले.

त्यांनी आपल्या व्याख्यानात मंत्रमुग्ध करणाऱ्या वक्तृत्वातून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा अवघा जीवनपटच श्रोत्यांसमोर उभा केला. डॉ. मुखर्जी यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अमूल्य योगदानाची माहिती या निमित्ताने सर्वांना मिळाली. डॉ. मुखर्जी हे एक देशप्रेमाने भारावलेले व्यक्तीमत्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. मुखर्जींबद्दल अनिलजींनी मांडलेले विचार सर्वांनाच मार्ग दाखवणारे ठरतील.

यावेळी बोलताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, देशप्रेम कसे असावे, देशासाठी लढण्याची जिद्द असणारे व्यक्तिमत्त्व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांची आणि त्यांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम व्याख्याना द्वारे अनिल माणकीकर यांनी सर्वांना सांगितले. त्यांचे विचार निश्चितच जीवनामध्ये खूप प्रेरणादायी ठरणार आहे. एक उत्तम प्रकारे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांचे विविध पैलू आपणापर्यंत पोहोचविले त्याबद्दल त्यांचे आभार त्यांनी मानले.

या वेळी प्रभाग ९ बाणेर/ बालेवाडी मधील भाजप चे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

]]>
लॉकडाऊनमुळे आनंदाचे क्षण साजरे करु न शकलेल्या वंचित लेकींना ड्रेसचे वाटप : मयूरी बालवडकर.  https://maknews.live/archives/4166?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2589%25e0%25a4%2595%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25be%25e0%25a4%258a%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3 Sun, 27 Jun 2021 13:45:23 +0000 https://maknews.live/?p=4166

बालेवाडी :

गेल्या १ वर्षापासून अधिक काळापासून आपण कोरोना महामारीचा सामना करतोय. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. या संकटाच्या काळात सामाजिक जाणिवेतून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या प्रेरणेने आणि वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात म्हणून बालेवाडी येथील भीमनगर मध्ये १०० हून अधिक गरजू मुलींना ड्रेसचे वाटप करण्यात आले.

या मुलींना ड्रेसचे वाटप उद्योजिका स्मिता समीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक समीर पाटील, प्रकाश द बालवडकर, भाजपा सदस्या मयूरी प्रणव बालवडकर, वात्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा ऐडके, राज तांबोळी, चंद्रकांत पवार, संतोष लांडे, महेश पवळे, मोनिका कांबळे उपस्थित होते.ही अनोखी भेट या सर्व मुलींना आनंदाचा सुखद धक्का देणारी होती !

यावेळी भाजप सदस्या मयुरी प्रणव बालवडकर यांनी सांगीतले की, कोरोनाचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसला. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून त्यांना कोणत्याही प्रकारे सण-समारंभ साजरा करता आला नाही. परिणामी त्यांच्या मुलांनाही या आनंदाच्या क्षणापासून मुकावे लागले. या लहान मुलींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसावे या हेतूने बालेवाडी, भीमनगर येथील गरीब मुलींना देखील शिलाई खर्चा सहित ड्रेस मटेरियल देत आहोत.

यावेळी उद्योजिका स्मिता पाटील यांनी सांगितले की, निराधार महिलांना रोजगारा द्वारे आधार देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लहान मुलींना ड्रेस वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचे चांगले काम वात्सल्य फाउंडेशन करत आहेत असे त्यांनी सांगितले.

]]>
बालेवाडी येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन. https://maknews.live/archives/4112?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2589-%25e0%25a4%25b6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa Wed, 23 Jun 2021 16:16:51 +0000 https://maknews.live/?p=4112

बालेवाडी :

आज शिवराज्यभिषेक दिन व देशाच्या एकतेसाठी आयुष्य वेचणारे विचारवंत, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित राहण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचा संघर्ष आजही भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात प्रकाश बालवडकर, मयुरी प्रणव बालवडकर, उद्योजक समीर पाटील यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

या वेळी बोलताना सहकार आघाडी चे प्रभारी प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांनी देशाचा एकतेसाठी वेचलेल्या आयुष्य याचा विचार करता अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचे आचरण करत, सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न आम्हीं कार्यकर्ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बाणेर व बालेवाडी परिसरातील ५० रिक्षाचालकांना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून उद्योजक समीर पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी १००० रुपयांच्या CNG गॅस कूपनचे वाटप करण्यात आले.

या वेळी प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, संतोष लांडे, महेश पवळे, सुभाष भोळ, संदिप बोरगावकर, दिलीप बालवडकर, संदीप बालवडकर, विजय बालवडकर, राज तांबोळी, अनुराधा ऐडके आधी मान्यवर उपस्थित होते.

]]>
सफाई कामगारांना प्रकाश बालवडकर व मयुरी बालवडकर यांनी केलेली मदत महत्त्वाची : चंद्रकांत पाटील https://maknews.live/archives/3920?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ab%25e0%25a4%25be%25e0%25a4%2588-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6-%25e0%25a4%25ac Thu, 10 Jun 2021 10:46:42 +0000 https://maknews.live/?p=3920

बालेवाडी :

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाश बालवडकर व भाजपा सदस्य मयुरी प्रणव बालवडकर यांच्या वतीने आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बाणेर बालेवाडी प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, कोरोना पार्श्वभूमिवर देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छतेचे काम करणारे साफ सफाई कामगारांच्या कुटुंबाला आधार मिळावा या हेतूने प्रकाश बालवडकर आणि मयुरी बालवडकर या दोघांनी अन्य धान्य किट वाटपाचा काम केले आहे. या दोघांनी नेहमीच समाजाला काय उपयोगी पडेल याचा विचार करून गरजु लोकांपर्यत मदत पोहोचवली आहे. तसेच साफसफाई कामगारांनी दोन्ही लस घ्यावी म्हणजे आरोग्य सुरक्षित होईल होईल, असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

यावेळी मॅक न्यूज शी बोलताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी कामे करावी असे सुचविले होते. त्यांच्या सूचनेचे पालन करून मयुरी बालवडकर यांच्या संकल्पनेतून बाणेर बालेवाडी मधील दुर्लक्षित सफाई कामगारांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. करोना च्या अडचणीच्या काळात त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे बालवडकर यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, मयुरी प्रणव बालवडकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, गणेश कळमकर, समीर पाटील, चंद्रकांत पोटे, गणेश घोष, संदीप खर्डेकर, धनंजय जाधव, शिवम बालवडकर, प्रशांत हरसुळे, जयंत भावे, जगन्नाथ कुलकर्णी, शंतनू खिलारे, महेश पवळे, शंतनू नारके, उमा गाडगीळ, स्वरुपा शिर्के, सुशील मेंगडे आदि मान्यवर उपस्थित होते.

]]>