नगरसेवक बाबुराव चांदेरे – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Wed, 15 Sep 2021 14:09:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे मध्ये राष्ट्रवादी च्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा उत्साहात पार. https://maknews.live/archives/5551?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3 Wed, 15 Sep 2021 14:09:06 +0000 https://maknews.live/?p=5551

बाणेर :

बाणेर-बालेवाडी ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , प्रभाग क्र .९ च्या वतीने सन २००६ साला पासून प्रभागातील महिला भगिनींसाठी आयोजित करत असलेली “ गौरी सजावट स्पर्धा ” यंदा पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच उत्साहाने कोरोनाचे नियम पाळून घेण्यात आली. धार्मिक सणांच्या निमित्ताने महिलांमध्ये असलेल्या कल्पकतेला वाव देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतोय, हे या स्पर्धेचं मोठे यश आहे.

या ” गौरी सजावट स्पर्धेचा ” उपक्रम बाणेर – बालेवाडी या परिसरातील नागरिकांसाठी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सुरू केला आहे आणि हा उपक्रम आज तागायत अखंड पणे चालू ठेवण्यात आलेला आहे, ही स्पर्धा गेल्या वर्षी कोरोनाचे वर्ष वगळता दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडते. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धा होऊ शकली नाही. म्हणून यंदा तो उत्साह अधिक दिसून आला. त्यामुळे महिला-भगिनींनी गौराईपुढं मोठ्या प्रमाणात आकर्षक सजावट केली होती.

त्या अनुषंगाने बाणेर-बालेवाडी आणि नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे या दोन्हीं गावामध्ये सुद्धा गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गौरी सजावट स्पर्धेसाठी जवळपास ९०० महिलां भगिनींनी सहभाग नोंदविला होता.

 

अत्यंत कमी वेळेत या स्पर्धे करिता प्रत्यक्षात २२ कॅमेरामन शूटिंग घेण्यासाठी ठेवण्यात आलेले होते आणि जवळपास ७० ते ८० कार्यकर्ते आणि परीक्षक ह्या सर्व जणांनी मिळून जवळपास ८२६ महिलांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन गौरी सजावटीचे परीक्षण केले .परंतु आम्ही ज्या भगिनी पर्यंत पोहचू शकलो नाही आशा काही गौरी सजावटीचे फोटो आम्हाला प्राप्त झाले आहेत .या स्पर्धेसाठी महिला भगिनींनी प्रचंड उत्कृष्ट असा प्रतिसाद या स्पर्धेकरिता दिलेला आहे .

या स्पर्धेचे सुस भागात संगिता बाळासाहेब भोते, म्हाळुंगे मध्ये समृध्दी विवेक खैरे, बालेवाडी भागात दिप्ती राजेश बालवडकर, बाणेर मध्ये पोर्णिमा तानाजी मांडेकर, विधाते-मुरकुटे वस्ती या परिसरात वासंती रेणुसे यांनी स्पर्धेचे औपचारिक उदघाटन केले. उदघाटन प्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक आणि या कार्यक्रमाचे आयोजक बाबुराव चांदेरे, नितीन कळमकर, डॉ.सागर बालवडकर, चेतन बालवडकर, रुपाली सागर बालवडकर, पुनम विशाल विधाते, सुषमा ताम्हाणे, कविता बोरावके, राखी श्रीराव, डॉ .मीना विधाळे, माधुरी इंगळे, प्राची सिद्दकी, वैशाली कलमानी, जान्हवी मनोज बालवडकर, अश्विनी समिर चांदेरे, पुजा किरण चांदेरे, प्राजक्ता ताम्हाणे आदी महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर या गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २ ऑक्टोबर रोजी ,सायंकाळी ४ वाजता बाणेर येथील बंटारा भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे .

]]>
विध्यार्थी हे देशाचा नविन इतिहास घडवणारी नविन पिढी – अनुराधा ओक https://maknews.live/archives/5433?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf Wed, 08 Sep 2021 13:41:51 +0000 https://maknews.live/?p=5433

बाणेर :

कोरोना काळात शिक्षकांण शिवाय यश संपादन करणारे विद्यार्थी हे देशाचा नवीन इतिहास घडवणारी नवीन पिढी म्हणावे लागेल. गेले दीड वर्षापासून संपूर्ण जग हे कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्याचा पर्याय सर्वांना स्वीकारावा लागला. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांण शिवाय विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले, आणि यामध्ये सर्वांनीच भरभरून यश संपादन केले, असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,पुणे विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी व्यक्त केले.

या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक व शिक्षण मंडळाचे सदस्य बाबुराव चांदेरे यांनी यावेळी सांगितले की, पुणे महानगरपालिकेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी मध्ये 80 टक्के च्या पुढे गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती मिळते आणि बाणेर बालेवाडी या परिसरातील सर्वात अधिक विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवितात याचा खरंच मला अभिमान आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे गावातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा देखील गौरव करताना आज मला खूप मोठा अभिमान वाटत आहे असे मत चांदेरे यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमात बाणेर – बालेवाडी- सुस- म्हाळुंगे या परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी तील सुमारे ७५९ गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रदीप पाडाळे, युवराज कोळेकर, निलेश पाडाळे, पांडुरंग पाडाळे, सागर चिव्हे, अजिंक्य निकाळजे, समीर कोळेकर, कविता बोरावके, युवा कार्यकर्ते समीर चांदेरे, चेतन बालवडकर, अर्जुन शिंदे, अर्जुन ननावरे, मनोज बालवडकर, चंद्रकांत काळभोर, संजय ताम्हाणे, सुषमा ताम्हाणे, वैशाली कलमानी, माधुरी इंगळे, रोहिणी सुतार, डॉ. मीनाताई विधाळे, डॉ. वाघचौरे , राखी श्रीराव , प्राची सिद्धकी, शेखर सायकर, प्रणव कळमकर, सुशील मुरकुटे, ओंकार रणपिसे, प्राजक्ता ताम्हाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक, पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य बाबुराव चांदेरे व डॉ. सागर बालवडकर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुनम विधाते आणि सूत्रसंचालन नितीन कळमकर यांनी केले.

]]>
पीएमआरडी अधिकाऱ्यांसमोर सुस ग्रामस्थांनी मांडल्या आराखड्यातील हरकती..!  https://maknews.live/archives/5222?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580%25e0%25a4%258f%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b0 Sat, 28 Aug 2021 15:48:16 +0000 https://maknews.live/?p=5222

सुस :

नुकताच पीएमआरडी ने पुणे जिल्ह्यातील त्यांच्या अधिकारातील गावांमधील प्रारूप आराखडा जाहीर केला, यामध्ये महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या सुस- म्हाळुंगे गावासह इतर २१ गावांचा देखील समावेश आहे . नागरीकांचा समन्वय साधण्यासाठी आराखड्यात दर्शविलेल्या आरक्षणा बाबत सविस्तर मार्गदर्शन पीएमआरडी चे रचनाकार शामराव चव्हाण , नगर रचनाकार भाग्यश्री ढवळसंक , प्लॅनर आकाश म्हेत्रे यांनी सुस ग्रामस्थांची भैरवनाथ मंदिरामध्ये ज्यांच्या जागेवर आरक्षण दर्शविण्यात आलेले आहे अश्या नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी साहेबराव चांदेरे यांनी गोरगरीब नागरिकांच्या वतीने सर्व्हे नं . ६५ , ६३ , ५३ यामधून जाणारा १८ मीटरच्या रस्त्या ऐवजी १५ मीटर रस्ता आखण्यात यावा, यामुळे गोरगरीब नागरिकांची घरे वाचविण्यासाठी फार मोठी मदत होईल. त्याचप्रमाणे नंदू साळुंके यांनी सर्व्हे नं. १७९, १८८ रिंग रोड, डीपी रोड जुन्या आर पी प्रमाणे ठेवण्यात यावा अशी सूचना केली.

अमित भांगरे यांनी सुस गावातील गृह प्रकल्पाच्या नागरिकांच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी म्हणून सुस गावातून जाणारा ६० मीटर डीपी रोड वर पीएमआरडीने बांधकाम व्यवसायिकांना गृह प्रकल्प मंजूर केलेली आहेत, सदर जागेचा एफएसआय बांधकाम व्यवसायिकांनी वापरलेला आहे. परंतु पीएमआरडी ने प्रसिद्ध प्रारूप आराखड्यामध्ये सदरचा रस्ता ३० मीटरने दर्शविलेला आहे. त्यामुळे गृह प्रकल्पाच्या समोर जी जागा शिल्लक राहील ती जागा ती संबंधित गृह प्रकल्पाच्या नावाने व्हावी असे मत मांडले.

यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी असे सूचित केले की, समाविष्ट गावातील प्रतिनिधित्व १५ वर्षापासून करत असताना बाणेर- बालेवाडी या गावांचा सन १९९७ साली पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला. परंतु तब्बल १३ वर्षांनी आमचा पार्ट डीपी मंजूर झाला. तदनंतर २ वर्षांनी आमच्या गावातील डीपीला मान्यता मिळाली. ही वेळ नवीन समाविष्ट गावांवर येऊ नये म्हणूनच राज्य सरकारच्या संमतीने पीएमआरडी ने जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्याचे मी मनापासून स्वागत करतो.

पुढे बोलताना नगरसेवक चांदेरे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणून देतो की, सुस व म्हाळुंगे या दोन गावातील सार्वजनिक हिताची उदा. स्मशानभूमी, पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या टाक्या, घनकचरा प्रकल्प, जल शुद्धीकरण केंद्र, मैला शुद्धीकरण केंद्र किंवा एसटीपी प्लॅन असे महत्त्वाचे आरक्षणे आपण पुणे महानगरपालिके मार्फत सर्व्हे करून पुणे महानगरपालिकेच्या वतीने पीएमआरडी ला सूचना कराव्यात.

यावेळी पीएमआरडी चे नगररचनाकार श्यामराव चव्हाण यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मला आज ही मिटिंग पाहून आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून समाधान वाटले. नागरिकांनी वैयक्तिक तक्रारी पेक्षा सार्वजनिक हिताच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर केल्या आणि यामध्ये नागरिकांनी सुचविलेल्या बहुतांशी कामामध्ये थोडाफार आदल – बदल होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना त्यांनी आव्हान केले की दि. ३० ऑगस्ट पर्यंत आप – आपल्या सुचना – हरकती नोंदवाव्या. या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीएमआरडी चे आयुक्त सुहास दिवसे सुचना केली की नागरिकांना सुचना – हरकती देण्याचा कालावधी खुप कमी आहे. त्यामुळे त्यांना कालावधी वाढविण्यात यावा. संबंधित मुदतवाढ मिळवण्यासाठी नगर विकास विभागाला कळविले आहे अशी माहिती शामराव चव्हाण यांनी दिली.

सदर बैठकीला पीएमआरडी चे नगर रचनाकार शामराव चव्हाण, नगर रचनाकार भाग्यश्री ढवळसंक, प्लॅनर आकाश म्हेत्रे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुनील चांदेरे, रामदास ससार, सुहास भोते, नितीन चांदेरे, गोवर्धन बांदल, गणेश सुतार, गणपत चांदेरे, सचिन चांदेरे, दशरथ साळुंखे, पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे, लक्ष्मण चांदेरे, युवराज चांदेरे, नामदेव चांदेरे, रोहिदास भोते, दत्तात्रय चांदेरे, सुखदेव चांदेरे, गोपीनाथ चांदेरे, कृष्णाजी चांदेरे, सोमनाथ चांदेरे, बाळासाहेब निकाळजे, संदीप राम चांदेरे, साहेबराव चांदेरे, अमित भांबरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

]]>
“तू माझा सांगाती” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा सरला चांदेरे यांच्या हस्ते संपन्न. https://maknews.live/archives/5022?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%259d%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8 Mon, 16 Aug 2021 18:19:44 +0000 https://maknews.live/?p=5022

बाणेर :

ज्ञानमुद्रा पब्लिकेशन प्रस्तुत प्रसिद्ध कवियत्री वैशाली कलमानी यांच्या “तू माझा सांगाती” या कवितासंग्रहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा गुरुवार दि . १२ ऑगस्ट रोजी बाणेर येथील कै. हिराबाई मारुतराव धनकुडे महिला बहु उद्देशीय भवन येथे सरला बाबुराव चांदेरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. “तू माझा सांगाती” हा काव्यसंग्रह विविधांगी व सकारात्मक विचाराचा असून माणसांना जीवनात प्रेरणा देणारी ही आहे. अत्यंत सहज आणि सुलभतेने या पुस्तकात काव्यरचना उमललेली आहे. उपस्थित मान्यवर आणि सर्व रसिकांनी या काव्यरचनेचे भरभरून कौतुक केले

कवियत्री वैशाली कलमानी यांनी यापूर्वी ” हे बंध रेशमाचे ( फक्त तुझ्यासाठी ) ” या कविता संग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले होते आणि या पुस्तकाला कवी रसिकांनी प्रचंड उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला होता त्याच प्रमाणे वैशाली कलमानी यांनी अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये सहभागी होऊन अनेक सन्मानपत्र पटकाविले आहेत .

या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रसिद्ध लेखिका सौ. पूजा सामंत, ज्ञानमुद्रा पब्लिकेशनच्या संचालिका डॉ.माधुरी वर्तुले व शितल देशमुख, कवी – सतीश गोरे , नितिन कळमकर , माणिक गांधिले, विशाल विधाते, शेखर सायकर, पुनमताई विधाते, सुषमाताई ताम्हाणे, राखीताई श्रीराव, माधुरी इंगळे, रोहिनीताई सुतार, प्राजक्ता ताम्हाणे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी डॉ. सतीश पाडोळकर यांनी केले.

]]>
बाणेर बिटवाईज चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आली सिग्नल यंत्रणा https://maknews.live/archives/4592?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25bf%25e0%25a4%259f%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%2588%25e0%25a4%259c-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258c%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be Thu, 22 Jul 2021 19:28:38 +0000 https://maknews.live/?p=4592

बाणेर :

नगरसेवक बाबूराव चांदेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २ ते ३ महिने स्वतः उभे राहून बाणेर येथील बीटवाइज चौक सुशोभीकरण करून घेतले. या बीटवाइज चौकात वाहतूक कोंडी होत होती. यामुळे नागरिकांनी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी केली होती. या नागरिकांच्या मागणीचा विचार करून नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी पाठपुरावा करू या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवून घेतली.

नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी संबंधित खात्यास पत्र व्यवहार करून , ट्राफीक सिग्नल मंजूर करून घेतला . २२जुलै २०२१ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिग्नल चे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक मासळकर, नितीन कळमकर, विशाल विधाते, अर्जुन ननावरे, प्रणव कळमकर, सुषमा ताम्हाणे, राखी श्रीराव, पुनम विधाते, डॉ मीना विधले, माधुरी इंगळे, मारुती नरके आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बोलताना सांगितले की, बिटवाईज चौक सुशोभिकरण केल्यानंतर या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी ही समस्या नागरिकांनी मांडली. ही समस्या सोडवण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवणे आवश्यक होते. या सिग्नल यंत्रणेमुळे या ठिकाणावरून वाहतूक कोंडी सुटणार असून याचा फायदा येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना होणार आहे.

]]>
महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस – म्हाळुंगे ग्रामस्थांची नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी घेतली बैठक. https://maknews.live/archives/4286?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ae Mon, 05 Jul 2021 14:42:13 +0000 https://maknews.live/?p=4286

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुस व म्हाळुंगे या दोन गावांची पालकत्वाची जबाबदारी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडे रविवारी सोपविण्यात आली. त्या धर्तीवर चांदेरे यांनी लगेचच कामाला सुरूवात करून, सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावात जाऊन संबंधित गावातील ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या. नागरिकांच्या समस्या आणि महानगर पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांमधील असणारे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केला.

यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी नागरिक आणि महानगरपालिका यामध्ये समन्वय कसा राखला जाईल त्याची माहिती सविस्तर सांगितली. महापालिकेकडून मिळणाऱ्या मूलभूत सुविधा ग्रामस्थांना कशा मिळवून देता येईल याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. घनकचरा, रस्ते, विद्युत, ड्रेनेज, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने गावांना प्राप्त होईल याची सविस्तर माहिती त्यांनी ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावता येईल याची संपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली.

समाविष्ट दोन्ही गावातील समस्या सोडविण्याकरिता नियोजनबद्ध विकास कसा करता येईल याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, या भागातील खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांच्याशी चर्चा करून परिसरातील विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.

दोन्ही गावातील ग्रामस्थांनी सांगितलेल्या अडचणी नगरसेवक चांदेरे यांनी घेतलेल्या बैठकीमुळे ग्रामस्थांच्या मनामध्ये असणारा संभ्रम बऱ्यापैकी दूर होण्यास मदत झाली.

]]>
राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 9 च्या वतीने डॉक्टर्स डे उत्साहात साजरा! लोकमत समूहाचे संपादक विजय बाविस्कर यांनी केले मार्गदर्शन. https://maknews.live/archives/4274?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2581%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d-2 Sun, 04 Jul 2021 19:05:02 +0000 https://maknews.live/?p=4274

बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 9 च्या वतीने डॉक्टर डे निमित्त साधून कोरोना काळात डॉक्टरांनी केलेल्या कार्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता लोकमत समुहाचे संपादक विजय बाविस्कर आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना लोकमत समूहाचे संपादक विजय बाविस्कर यांनी डॉक्टरांच्या प्रति ऋण व्यक्त करताना सांगितले की, पत्रकार हे केवळ टीकात्मक लिहितात असा गैरसमज लोकांमध्ये असून पत्रकार हे चांगल्या कामाची स्तुती करण्यास मागे पुढे पाहत नाही. म्हणून डॉक्टरांनी केलेल्या चांगल्या कामाचा सन्मान करण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, डॉक्टर हा जीवदान देणारा, प्राणदान देणार आहे. डॉक्टरांकडे जादुई स्पर्श किमया असते. तसेच पैसा कमावणे सगळ्यांनी गरजेचे आहे परंतु डॉक्टरांनी बँक बॅलन्स कडे पाहू नये तुम्ही चांगले काम करत आहात, त्यामुळे पैसा आपोआप येणार आहे. रुग्णाची समाजाची सेवा करताना स्वतःची देखील काळजी घ्यावी, समाजाला निरोगी राहण्यासाठी आपली गरज आहे.

नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी बोलताना सांगितले, देशात कोरोना चे मोठे संकट आले त्यावेळी परिसरातील सर्व डॉक्टरांनी फार मोठी जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांच्याप्रती त्यांच्या कार्याची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम करण्यात येत आहे. बाणेर बालेवाडी या परिसरात डॉक्टर असोसिएशन चांगल्या प्रकारचे काम करत आहे. पण तेवढ्यावर न थांबता परिसरांमध्ये चांगला दवाखाना उपक्रम लोकांना सेवा देण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे काम आम्ही केले आहे. बाणेर मध्ये असणारे कोवीड हॉस्पिटल मध्ये चांगले काम डॉक्टरांनी केले आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांना सेवा दिली त्याबद्दल डॉक्टरांचे चांदेरे यांनी आभार मानले.

यावेळी डॉक्टर राजेश देशपांडे यांनी सांगितले की, गेली सोळा वर्ष नगरसेवक चांदेरे डॉक्टर डे चा कार्यक्रम घेतात. नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे काम त्यांनी केला आहे. बाणेर बालेवाडी डॉक्टर यांच्या वतीने प्रत्येक पेशंटला चांगली सुविधा कशी मिळविली जाईल यासाठी नियमित प्रयत्न केला जातो.

याप्रसंगी लोकमत समूहाचे विजय बाविस्कर, लोकमतचे महाप्रबंधक मिलन दर्डा, नगरसेवक बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर, विशाल विधाते, नितीन कळमकर, समीर चांदेरे, किरण चांदेरे, अर्जुन रणवरे, माणिक गांधीले, प्रा. रूपाली बालवडकर, पुनम विधाते, सुषमा ताम्हाणे, प्राजक्ता ताम्हाणे आदी उपस्थित होते.

]]>
राष्ट्रवादीकडून सुस – म्हाळुंगे गावच्या पालकत्वाची जबाबदारी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडे https://maknews.live/archives/4270?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be Sun, 04 Jul 2021 13:50:23 +0000 https://maknews.live/?p=4270

पुणे :

पुणे शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारने ३० जून रोजी घेतला आहे. या गावांच्या महापालिकेत समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, या निर्णयामुळे या गावांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आले आहेत. म्हणजेच, या गावातील लोकप्रतिनिधी आता नव्याने पुणे महानगरपालिकेतील सदस्य असणार आहेत. परंतु, महानगरपालिका निवडणुकीसाठी कालावधी असल्याने आणि विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने येथे प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वयासाठी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात येत आहे.

२३ गावांचा महानगरपालिकेत समावेश झाल्याने प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होणार आहे. दैनंदिन कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या संपर्काची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर आदरणीय खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या सभासदांना या २३ गावांच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. येथील प्रशासकीय यंत्रणा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या हे पदाधिकारी जाणून घेणार आहेत. तसेच, प्रशासकीय समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.

नव्याने महानगरपालिकेत समावेश झालेल्या या २३ गावांतील नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला असून, नागरिकांनी या पदाधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, गावांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी गावाला भेट देऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील.

बाणेर बालेवाडी लगत असणाऱ्या सुस – म्हाळुंगे गावचे पालकत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडे आहे. नागरिकांनी त्यांच्या अडचणी त्यांच्याकडे मांडाव्यात त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील असे राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने सांगण्यात आले.

१. मांजरी (बु.) – आमदार चेतन तुपे

२. वाघोली – आमदार सुनील टिंगरे

३. नांदेड – विरोधी पक्षनेत्या सौ. दीपालीताई धुमाळ

४. खडकवासला – नगरसेवक सचिन दोडके

५. म्हाळुंगे – नगरसेवक बाबुराव चांदेरे

६. सूस – नगरसेवक बाबुराव चांदेरे

७. बावधन (बुद्रुक) – नगरसेवक दीपक मानकर

८. किरकटवाडी – नगरसेविका सायलीताई वांजळे

९. पिसोळी- नगरसेविका नंदाताई लोणकर

१०. कोपरे – नगरसेवक सचिन दोडके

११. कोंढवे धावडे – नगरसेवक दिलीप बराटे

१२. नऱ्हे – नगरसेवक दत्तात्रय धनकवडे

१३. होळकरवाडी – नगरसेवक गणेश ढोरे

१४. औताडे-हांडेवाडी – नगरसेवक गणेश ढोरे

१५. वडाचीवाडी – नगरसेवक योगेश ससाणे

१६. शेवाळेवाडी – नगरसेविका वैशालीताई बनकर

१७. नांदोशी – नगरसेवक दिलीप बराटे

१८. सणसनगर – नगरसेवक सचिन दोडके

१९. मांगडेवाडी – नगरसेवक प्रकाश कदम

२०. भिलारेवाडी – नगरसेविका अमृता बाबर

२१. गुजर निंबाळकरवाडी – नगरसेवक विशाल तांबे

२२. जांभूळवाडी – नगरसेविका स्मिताताई कोंढरे

२३. कोळेवाडी – नगरसेवक युवराज बेलदरे

]]>
नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नाने ‘पावर्ड एअर प्युरीफयिंग रेस्पिरातर’ मशीनचे वाटप https://maknews.live/archives/4243?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%2595-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ac%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587 Fri, 02 Jul 2021 19:45:28 +0000 https://maknews.live/?p=4243

पुणे :
आज पुण्यातील विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रिएटर इंडिया स्विक्झॅर्लंड स्थित मल्टी नॅशनल कंपनी तर्फे “पावर्ड एयर प्युरीफयिंग रेस्पिरातर” अर्थात श्वास घेण्यासाठी 99% शुद्ध हवा पुरविणाऱ्या १४ मशीनचे वाटप केले. या मशीनींची एकुण किंमत २५ लाख रुपये इतकी आहे.

ह्या मशीन कोविड वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर व नर्सेस साठी खूप उपयुक्त आहे. इन्फेक्शन होण्यापासून बचाव करणे हे ह्या मशीनचे काम आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने हे मशीन प्राप्त झाले. हे मशिन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले .

याप्रसंगी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल, नगरसेवक बाबुराव चांदेरे, रिएटर कंपनी तर्फे अनिल कुडाळ, जॅार्ज शाहिद, शैलेंद्र कुलकर्णी व ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रमाचे आयोजन केले ते बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनचे खजिनदार चंद्रशेखर जगताप, समीर चांदेरे, चेतन बालवडकर, ओंकार रणपिसे, सचिन शिंदे इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

]]>
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांचा नियोजनबद्ध विकास करू : नगरसेवक बाबुराव चांदेरे https://maknews.live/archives/4210?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf Wed, 30 Jun 2021 14:57:01 +0000 https://maknews.live/?p=4210

पुणे :

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्यातील काही आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये काल एक बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महानगरपालिकेत २३ गावांचा समावेश करण्यात यावा यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या निर्णयानंतर पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारे महापालिका ठरणार आहे. तशी अधिसूचना नगरविकास खात्याने आज काढून २३ गाव महापालिकेत समाविष्ट करण्यावर अंतिम शिक्कमौर्तब आज केले.

२३ गावांच्या समावेश झाल्याने नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, पुणे महानगरपालिकेमध्ये हद्दीलगतची २३ गावे महानगरपालिकेत समाविष्ट केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळींचे मनापासून मी व माझ्या परिसरातील नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो, या पुढच्या कार्य काळामध्ये महाआघाडी म्हणून व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी म्हणून या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू असे बाबुराव चांदेरे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले सन १९९७ साली पुणे महानगरपालिकेमध्ये बाणेर – बालेवाडी या परिसराचा समाविष्ट झाला त्यानंतर आज पर्यंत बाणेर बालेवाडी चा नियोजनबद्ध विकास करण्यामध्ये आम्ही पूर्णपणे यशस्वी झालेलो आहे, यामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेब, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे मोठे पाठबळ असल्यामुळे आम्ही या परिसराचा विकास करू शकलो याच धर्तीवर सुस आणि म्हाळुंगे गावांचा नियोजनबद्ध विकास आम्ही निश्चितपणे करू असा विश्वास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केला.

महापालिकेत समाविष्ट गावे :

म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे.

]]>