नगरसेवक अमोल बालवडकर – MakNews https://www.maknews.live See Original | Marathi News Online Mon, 08 May 2023 00:40:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 २४ x ७ पाणी पुरवठा योजने अंतर्गत बालेवाडी व बाणेर ला लवकरच मिळणार पाणी https://www.maknews.live/archives/13174?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a5%25a8%25e0%25a5%25aa-x-%25e0%25a5%25ad-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25af%25e0%25a5%258b%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2585%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4 Mon, 08 May 2023 00:40:40 +0000 https://maknews.live/?p=13174

बालेवाडी :

पालकमंत्री मा.चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार पाषाण-बावधन हद्दीलगत असणार्या रामनगर येथे (HEMRL जवळ) रामनदीवरील अत्यंत महत्वाच्या ट्रान्समिशन वॅाटर लाईन कॅरेजवे चे काम पुर्ण करण्यात आले. जवळ पास ९८% काम पुर्ण झाले असुन लवकरच बालेवाडी व बाणेर या भागाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, आता लवकरच पुढील काही दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यात बालेवाडी भागाला या योजने अंतर्गत समान पाणी पुरवठा सुरु होणार आहे. संपुर्ण पुणे शहरात २४ x ७ योजने अंतर्गत आपल्या बालेवाडी भागाला सर्वात प्रथम पाणी पुरवठा होत आहे याचा अभिमान वाटत आहे. पहिल्या फेज मध्ये बालेवाडी भागाला पाणी पुरवठा सुरु केला जाईल व दुसर्या फेज मध्ये बाणेर भागाला एक महिन्याच्या अंतरामध्ये पाणी पुरवठा सुरु केला जाईल.

पुढे बालवडकर म्हणाले की, २४ x ७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी प्रशासन देखील अथक मेहनत घेत आहे. तसेच हे काम कमी वेळेत पुर्ण करण्याकरीता कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर साहेब, जगताप साहेब, क्षिरसागर साहेब, बनकर साहेब, शिंदे साहेब हे सर्व अधिकारी कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या समवेत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट घेवून कामाची पाहणी केली.

बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील पाणी प्रश्न कायमचा मिटण्याकरीता तसेच बाणेर-बालेवाडी भाग टॅंकरमुक्त होण्या याकरीता या योजने अंतर्गत पाणी पुरवठा होणे अत्यंत महत्वाचे आहे. या योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्याकरीता पालकमंत्री मा.आ.चंद्रकांतदादा पाटील, पुणे मनपा आयुक्त, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांच्याकडे माझ्यासमवेत व माझ्या सहकारी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर व स्वप्नाली प्रल्हाद सायकर आणि मी वारंवार पाठपुरावा केला. याच पाठपुराव्याने हे काम आता अंतिम टप्प्यात असुन लवकरच माझ्या बाणेर-बालेवाडी-पाषाण भागाला समान पाणी पुरवठा होवुन या भागातील पाणी प्रश्न कायमचा मिटणार याचे समाधान आज मला होत आहे असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.

]]>
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, म्हाळुंगे ची २४x७ समान पाणी पुरवठा योजना आढावा बैठक संपन्न https://www.maknews.live/archives/12574?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a4 Sat, 18 Mar 2023 12:34:54 +0000 https://maknews.live/?p=12574

बालेवाडी :

२४×७ समान पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील आणि पुणे मनपाचे आयुक्त मा. श्री. विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

सफा बँक्वेट हॉल, लक्ष्मण नगर, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी जवळ, बालेवाडी हाय स्ट्रीट-२ येथे संपन्न झालेल्या या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख श्री. अनिरुद्ध पावसकर साहेबांनी सदरील २४x७ पाणी पुरवठा योजनेचा आढावा व बाणेर-बालेवाडी येथे विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यावरील उपाय योजना बाबत सादरीकरण केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

*पहा बालेवाडी येथे 24×7 समान पाणी पुरवठा आढावा बैठक संपन्न…*

_Link 🔗 click करून subscribe करा_

२४x७ अंतर्गत असणाऱ्या या प्रकल्पाचे ट्रान्समिशन लाईन्स चे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होऊन, वारजे येथील पंपांचे काम मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होऊन सर्वांना २४ तास ७ दिवस पाणी पुरवठा मिळेल असे मनपा आयुक्त मा. श्री. विक्रमजी कुमार यांनी आश्वस्त केले.

२४ x ७ समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांबाबत वारंवार आढावा घेत असुन पुढील दोन महिन्यांमध्ये हे काम पुर्ण करण्यात येईल तसेच तो पर्यंत ज्या सोसायट्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे त्यांना माझ्या स्वःखर्चातुन टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठीची उपाय योजना करण्यात येईल असे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील यांनी सोसायटी नागरिकांनी तसेच बालेवाडी फेडरेशन ने सांगितलेल्या अडचणींना उत्तर देताना सागितले.

यावेळी २४ x ७ हा भाजपाचा पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सुरुवातीपासुनच हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मधल्या कोरोना काळामुळे या कामास विलंब झाला असुन आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. तसेच सुस म्हाळुंगे येथेल नवीन पाण्याच्या ट्रान्समिशनचे लाईन व टाकीच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसात होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल असे मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.

याप्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, कोथरुड वि. भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, लहु बालवडकर, सचिन दळवी, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, उमाताई गाडगिळ, मा.सरपंच नारायण चांदेरे, मोरेश्वर बालवडकर, मा.सरपंच काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे, अस्मिता करंदिकर, सुभाष भोळ, मंदार राराविकर, रोहित पाटील, मीना पारगावकर तसेच पुणे मनपा पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, परिसरातील सोसायटींचे सभासद व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

 

]]>
भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी अमोल बालवडकर यांचा कसबा मतदारसंघात प्रचार: स्थलांतरित मतदारांसाठी तयार केली लिंक https://www.maknews.live/archives/12202?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2589%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2587%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25a8 Wed, 15 Feb 2023 17:22:03 +0000 https://maknews.live/?p=12202

बाणेर :

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. दिवसेंदिवस कसबा मतदार संघात प्रचार  शिंगेला पोचला असुन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार करण्यासाठी बाणेर बालेवाडी येथील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी देखिल घरोघरी जाऊन प्रचारात सहभाग घेतला आहे. या पोट निवणुकित एक एक मतदार महत्वाचा आहे.

याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मतदार बंधु भगिनींना आव्हान केले आहे की, दिनांक २६ फेब्रुवारी ’23* रोजी कसबा मतदार संघात विधानसभा पोट निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने सध्या बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सुस, महाळुंगे येथे वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना आम्ही विनंती करीत आहोत की, जर आपले नाव कसबा मतदार यादीत समाविष्ट असेल तर कृपया आम्ही सोबत एक लिंक पाठवत आहोत, ती ओपन करून त्या मध्ये आपली सर्व माहिती भरून त्वरीत सबमीट करावी ही विनंती.

Link:-https://forms.gle/Pf4C7GEJkp6GcjHz8

]]>
बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचा अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून जोश-२०२२ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.. https://www.maknews.live/archives/11569?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%259c-%25e0%25a4%2585 Mon, 19 Dec 2022 13:35:04 +0000 https://maknews.live/?p=11569

बाणेर :

काल बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचा जोश-२०२२ (JOSH-2022) हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली ६ वर्षे सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनच्या सर्व सभासदांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये डान्स, फॅशन शो, लहान मुलांसाठीच्या स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या दरम्यान डॉ. जे. एस. महाजन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच जनहितासाठी कायदेशिर कामगिरी बजावत असलेल्या ॲड.सत्येन्द्र मुळे यांचा देखिल विशेष सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आइस स्केटिंग चॅम्पियन प्रियांशू साळवे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच वैद्यकीय क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल डॉ. केदार साठे व डॉ. अर्चना डांगरे यांना असोसिएशनच्या वतीने बीएमए गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनच्या व बाणेर बालेवाडी भागातील प्रत्येक वैद्यकीय संस्था व डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. तसेच त्यांच्या हातून होणारे सामाजिक कार्य आणि रुग्णांप्रती असणारी आपुलकीची भावना याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली होती तसेच मा.नगरसेविका ज्योती कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. बबन साळवे, डॉ. सागर सुपेकर, डॉ. प्रिया देशपांडे, डॉ. दीपाली झंवर, डॉ. रितू लोखंडे, डॉ. सुषमा जाधव, डॉ. सुवर्णा साळवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

]]>
बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..! https://www.maknews.live/archives/11380?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3-4 Wed, 07 Dec 2022 10:04:47 +0000 https://maknews.live/?p=11380

बाणेर :

आज मा.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे येथील कृत्रिम पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी व समस्या जाणुन घेण्यासाठी बालेवाडी येथे मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या मागणी नुसार प्रत्यक्ष पाहणी करुन नागरीकांशी व महापालिका पाणी पुरवठा अधिकार्यांशी चर्चा केली.

यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अत्यंत गंभिर असलेल्या पाणी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी नागरीकांनी चार चार दिवस मनपा कडुन कोणत्याच प्रकारचा पाणी पुरवठा बाणेर-बालेवाडी भागाला होत नसल्याने धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा असुन देखिल येथील नागरीकांना पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे असे आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. यावर तातडीने उपाय योजना करुन वारजे येथुन पाणी पुरवठा वाढविण्याचे तसेच बाणेर व बालेवाडी येथे तातडीने वाढीव पंप बसविण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना दिले. तसेच बालेवाडी येथील अंडर ग्राऊंड टाकीमध्ये पंप बसवुन बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले.

तसेच २४x७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असुन येत्या १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उर्वरीत पाईप लाईनचे काम पुर्ण करणे, नविन टाक्यांना पंप बसवुन टाक्या कार्यरत कराव्या व त्यातुन या भागाला पाणी पुरवठा करण्याचे आदेश देखिल मा. आयुक्तांनी अधिकार्यांना दिले.

यावेळी “बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे भागाला त्यांच्या हक्काचा मुबलक पाणी पुरवठा करुन येथील नागरीकांना व माता-भगिनींना लवकरात लवकर या कृत्रिम टंचाईतुन मुक्तता करावी” अशी मागणी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली. तसेच या भागातील सर्व वॅाल्व्हची पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना योग्यरित्या हताळण्याची आवश्यकता असल्याचे देखिल सांगितले.

यावेळी “या भागाला निर्माण झालेली पाणी समस्या हि पुर्णपणे कृत्रिम असुन या भागातील सर्व वॅाल्वमन ला सक्तिची ताकिद देवुन सर्व वॅाल्व पुर्वरत करत या भागाला लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करण्याची मागणी” यावेळी गणेशजी कळमकर यांनी केली.

यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, युवा नेते गणेश कळमकर, युवा नेते लहु बालवडकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, शशिकांत बालवडकर, संदिप बालवडकर, अस्मिता करंदिकर व परिसरातील सोसायटींचे नागरीक, ग्रामस्थ व पुणे मनपा पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

]]>
बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत पालिका अधिकारी निष्क्रिय, भाजपा पदाधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन… https://www.maknews.live/archives/11351?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2597%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ad%25e0%25a5%2580 Tue, 06 Dec 2022 01:31:01 +0000 https://maknews.live/?p=11351

बाणेर :

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील पाणी समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून यावर प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर यांनी नागरिकांसोबत ठिय्या आंदोलन केले. यावेळी या तिघांनी पाण्याचा वॉल फिरवून बाणेर बालेवाडी कडे जाणारे पाणी सोडले. पालिका अधिकारी आंदोलन स्थळी आले असता चर्चेत वास्तविक मागील काही काळापासून पाणी सोडण्याचे तास कमी करण्यात आले आहे हे निदर्शनास आले. लोकसंख्या वाढण्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले पण लोकसंख्या वाढल्याने पाण्याचे तास वाढण्या पेक्षा कमीच झाले.

या आंदोलना बद्दल बोलताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, बाणेर बालेवाडी परिसरात अनियोजित पाणीपुरवठा सुरू आहे. वारंवार अधिकाऱ्यांना सांगून देखील काहीच कारवाई होत नाही. अधिकारी नुसतीच हो, पाहतो, करतो, टाकीत पाणी नाही अशी उत्तरे देत आहेत. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर जोपर्यंत पाणी सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तसे आंदोलन सुरू होते, परंतु पालिका अधिकारी यांनी येऊन नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करू असे सांगितले.

भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, जाणुन बुजून केवळ नागरिकांना त्रास व्हावा या यातूनही कृत्रिम प्राणी टंचाई निर्माण केली जात आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, महाळुंगे या सर्वच परिसरात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असून ही समस्या सोडविणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हि कृत्रिम पाणी टंचाई थांबवुन लोकांना मुबलक पाणी देउन हा प्रश्न संपविला पाहिजे.

या आंदोलनात प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, त्याचबरोबर निष्क्रिय अधिकाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा व नंदीबैल आणून या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला.

याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शशिकांत बालवडकर, अनिल ससार, सचिन मानवतकर, शिवम बालवडकर आदी उपस्थित होते.

यावेळी चांदणी चौक येथील पाण्याचे टाकीवर महापालिका अधिकारी प्रसन्ना जोशी, योगिता भांबरे, श्रीधर कामत यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु या चर्चेच्या वेळी असे निदर्शनास आले की पालिकेच्या अधिकाऱ्यांना बाणेर बालेवाडी परिसरातील पाणी प्रश्नाची जाणीवच नाही. प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीच उत्तरे व्यवस्थित देता आली नाही. पाण्याची टाकी, पाण्याचे वॉल, पंप, पाणी किती सोडायला पाहिजे याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ जाणवला. एवढा गंभीर असणारा पाणी प्रश्न का उभा राहतो वारंवार लोक का समस्या मांडतात याची गंभीरता ह्या अधिकाऱ्यांना नसल्याने त्यांनी त्या मागचे अडचण निवारण करण्यासाठी कोणते प्रयत्न केलेले दिसून येत नाही. तरी देखील बऱ्याच वेळानंतर त्यांनी आंदोलन कर्त्यांच्या समस्या जाणून उद्यापासून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करून काय समस्या आहे याबाबत सोडवणूक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. जवळपास चार ते पाच तास हे आंदोलन सुरू होते.

]]>
… तर लोकसहभागातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी प्रश्न सोडवू! : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील https://www.maknews.live/archives/10142?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be Sun, 31 Jul 2022 12:25:22 +0000 https://maknews.live/?p=10142

बालेवाडी :

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेला हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळ लागणार असेल, तर लोकसहभागातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यासाठी महापालिकेने आवश्यक परवानगी आणि पायाभूत सुविधा निर्माण करुन द्याव्यात असे आवाहन आ.‌पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना केले.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस भागातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाणेर येथे बैठक झाली. या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर, स्थानिक माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, लहू बालवडकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, पिडीसिसी बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, नगरसेविका रोहिणी चिमटे, प्रभाग क्रमांक १२ च्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ, ॲड. मधूकर मुसळे, मंदार रारावीकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, जीवन चाकणकर, सुर्यकांत भुंडे, दिपक दगडे, योगेश सुतार, डॉ सागर बालवडकर तसेच परिसरातील सोसायट्यांचे चेअमन आणि नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत आयुक्त डॉ. विक्रम कुमार म्हणाले की, सूस, म्हाळूंगे ही गावे महापालिकेत नुकतीच नव्याने समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सध्या पायाभूत सुविधा महापालिकेकडे नाहीत. त्या उभ्या करण्यासाठी काही वेळेची गरज आहे. पण बाणेर, बालेवाडी, पाषाण मध्ये तशी स्थिती नाही. बाणेर बालेवाडी पाषाण मध्ये पायाभूत सुविधा आहेत.

ते पुढे म्हणाले की, बाणेर बालेवाडीची पाण्याची समस्या महापालिका तीन टप्प्यांत सोडवू शकते. त्यात प्रामुख्याने पम्पिंग स्टेशनचा आढावा घेऊन, आवश्यकतेनुसार वाढवणे. त्यासोबतच एकसमान पाणी वाटपासाठी मीटरची संख्या वाढवणे. त्याशिवाय मागणीनुसार सोसायट्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करणे, आदी उपाययोजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी यावेळी दिली.

 

]]>
अमोल बालवडकर फाऊंडेशन च्या माध्यमातून “शाळा परिसर ट्रॅफिक फ्री अभियान” ला सुरुवात. https://www.maknews.live/archives/9865?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2585%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ab%25e0%25a4%25be%25e0%25a4%258a%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d Thu, 07 Jul 2022 14:00:39 +0000 https://maknews.live/?p=9865

बालेवाडी :

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-औंध शालेय परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळकर साहेब यांना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पत्र दिले. तसेच या परिसरातील सर्व शाळांनाही ट्रॅफिक समस्येवर पत्रव्यवहार केलेला आहे. वाहतूक कोंडी मुळे शालेय वाहतूक वेळेवर पोचत नाही. त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. म्हणून अमोल बालवडकर फाऊंडेशन च्या माध्यमातून “शाळा परिसर ट्रॅफिक फ्री अभियान” राबविण्यात येत आहे. आज त्यांनी बाणेर येथील ऑर्किड स्कूल येथे वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांना घेवुन भेट देवून स्कूल मुख्याध्यापक व व्यवस्थापनाशी वाहतूक नियोजन संबंधित चर्चा केली.

याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व नागरिकांनी यासंदर्भात वारंवार तक्रार केली असून ही दैनंदिन होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने योग्य ती उपाययोजना करून विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास हा सुखकर करावा अशी विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना केली आहे. तसेच यावेळी सदरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपणास अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने देखील सहकार्य केले जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळकर यांना दिले.

तसेच आज बाणेर येथील ऑर्किड स्कूलला भेट देऊन यावेळी शाळा परिसरात स्कुल बस व पालकांच्या गाड्यामुळे होणार्या वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्याकरीता सविस्तर चर्चा केली. यावेळी शाळेच्या परिसरातील ड्राईव्ह वे चा वापर पालकांनी मुलांना शाळेत सोडवताना व नेताना करुन मुख्य रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्यास मदत करावी अशी विनंती केली.

यावेळी शक्य होईल तितक्या अधिकाधिक पालकांनी आपली मुले शालेय प्रशासनाच्या स्कुल मधुनच शाळेत पाठवावी अशी संकल्पना देखिल शाळेकडुन राबविण्यात येत आहे. ॲार्किड स्कुल प्रशासनाकडुन हि वाहतुक कोंडी सोडविण्याकरीता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे व्यवस्थापकांनी सांगितले.

अमोल बालवडकर पुढे म्हणाले की, बाणेर बालेवाडी भागातील विबग्योर हायस्कूल, भारती विद्यापीठ हायस्कूल, एसकेपी कॅम्पस, मिटकॉन या स्कूल व्यवस्थापनाला भेटून शालेय वाहतुक योजना बाबत चर्चा करून परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरता “शाळा परिसर ट्रॅफिक फ्री” अभियानांतर्गत प्रयत्न करणार आहे.

यावेळी माझ्यासमवेत शाळेच्या मुख्याद्यापिका सौ.संगिता कपुर मॅडम, व्यवस्थापिक सौ.कुमार मॅडम, श्री.सुनिल काळे सर, वाहतुक शाखेचे काकडे साहेब, धानेवाड साहेब, अनिल प्रधान उपस्थित होते.

]]>
अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित मोफत पंढरपुर यात्रेच्या माध्यमातुन ६०० भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन..! https://www.maknews.live/archives/9762?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2585%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ab%25e0%25a4%25be%25e0%25a4%258a%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25af Tue, 28 Jun 2022 09:42:18 +0000 https://maknews.live/?p=9762

बालेवाडी :

दरवर्षीप्रमाणे संजय बाजीराव बालवडकर (अध्यक्ष विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्ट बालेवाडी) व अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने बालेवाडी ते पंढरपुर मोफत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा यात्रेचे २८ वे वर्ष असुन ज्ञानोबा-माऊलींच्या मोठ्या जयघोषात या यात्रेची सुरुवात करण्यात आली.

पंढरपूर यात्रेची माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मॅकन्यूज शी बोलताना सांगितले की, दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने परिसरातील नागरीकांना पंढरीत जाऊन विठुरायाचे दर्शन घडावे या उद्देशाने या परिसरातील शेकडो भाविक या एकदिवसीय यात्रेत सहभागी होत असतात. यात्रेदरम्यान सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखिल यावेळी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. कोरोनाच्या सावटानंतर तब्बल दोन वर्षांनी भाविकांना पंढरीत जाऊन विठुरायाचे चरणस्पर्श करुन दर्शन घेता आले याबद्दल सर्व भाविकांनी अतिशय आनंद व समाधान व्यक्त केले. आपला परिसर बहुतांशी नागरिक सांप्रदायिक क्षेत्रात असुन त्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडविल्याने त्यांच्या चेहऱ्यावर ती निर्माण होणारे आनंदी भाव पाहून मनाला समाधान लाभते.

यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या समवेत संजय बा.बालवडकर(अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट बालेवाडी), सौ.आशाताई बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, मा.नगरसेवक सनी निम्हण, युवा नेते लहुशेठ बालवडकर, बाळासाहेब रानवडे, नारायण चांदेरे, नितिन रनवरे, अस्मिता करंदिकर, अनिलबाप्पु ससार, अनिल बालवडकर, शशिकांत बालवडकर, सचिन मानवतकर, सुभाष भोळ, बालेवाडी भजनी मंडळ व बालेवाडी-औंध-बाणेर-सुस-म्हाळुंगे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

]]>
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने योगा दिन उत्साहात पार. https://www.maknews.live/archives/9666?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%259b%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%2595%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b2 Tue, 21 Jun 2022 13:16:20 +0000 https://maknews.live/?p=9666

बालेवाडी-म्हाळुंगे :

आज क्रीडा व युवक संचलनालय व अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी म्हाळुंगे येथे पुण्यातील सर्वात मोठा योग दिवस आयोजित करण्यात आला होता.

या योग शिबिरात परिसरातील जवळपास अडीच ते तीन हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी योगदिनाचे औचित्य साधून जगप्रख्यात योग शिक्षिका डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्तम पद्धतीने योगासने केली.

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हा योग दिवस २१ जून रोजी जगभरात साजरा होतो. याच आधारावरती हा योग दिवस २०१४ सालापासून दरवर्षी बाणेर-बालेवाडी, सुस-म्हाळुंगे परिसरात आयोजित केला जातो. मात्र, कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठीण काळात हे शिबीर आयोजित करता आले नव्हते. परंतु यावर्षी नागरिकांनी अत्यंत उत्साहाने या योग शिबिरात सहभाग नोंदविला.

यावेळी दिल्ली येथे आयोजित १७ व्या राष्ट्रीय आईस स्केटींग स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा तसेच सर्व सहभागी संघांचा व मनपा सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.

योग साधनेसोबतच हास्य योगा, झुंबा, आर्टिस्टिक योगा, रिदमिक योगा अशा विविध योगासनांचे आयोजन अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. या योगासनांसाठी परिसरातील नवचैतन्य हास्य योग परिवार, बाणेर-बालेवाडी मेडीकोस असो., बालेवाडी-बाणेर रनर्स ग्रुप, वसुंधरा अभियान, पेडल बस्टर्स आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान पावसाने हजेरी लावली. तरीही सर्वांनी भरपावसात योगासने करून योग दिन साजरा केला याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!

याप्रसंगी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या समवेत संचालक सुहास पाटील, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, मा. नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, भाजपा नेते लहु बालवडकर, गणेश कळमकर, मंदार रारावीकर, अनिल ससार, काळुराम गायकवाड, सुभाष भोळ, डॉ. राजेश देशपांडे, वसुंधरा अभियानचे भुजबळ सर, हास्य योगचे संस्थापक मकरंद टिल्लु, हरिषजी पाठक, माशळकर, रनर्स ग्रुपचे विवेक साळवे, शशिकांत बालवडकर, श्री.सचिनजी मानवतकर, क्रिडा व युवक संचलनालयाचे सर्व पदाधिकारी, खेळाडू व अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

]]>