देवेंद्र फडणवीस – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Fri, 05 Jan 2024 18:10:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 पुण्यात कोणतेही गँगवॉर होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा https://maknews.live/archives/15425?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2597%25e0%25a4%2581%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2589%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b9 Fri, 05 Jan 2024 18:07:33 +0000 https://maknews.live/?p=15425

पुणे :

पुण्यात कोणतेही गँगवॉर होणार नाही. कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या त्यांच्याच साथीदाराने केलेली आहे. कोणीही असो त्याचा बंदोबस्त या शासनामध्ये केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे गँगवॉर करण्याची कोणी हिंमत करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

पिंपरी महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित केलेल्या ‘अटल विनामुल्य महाआरोग्य शिबिरा’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भीमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य केवळ मुर्खपणाचे आहे. प्रसिध्दी मिळविण्याकरिता ‘बदनाम हुए तो क्या हुए नाम तो हुआ’ असे एक हिंदीतील वाक्य आहे. अशाप्रकारे जितेंद्र आव्हाड करत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे. खरे म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत. बहुजन, अभिजन, दलितांचे, आदिवासी असा कोण आहे या देशात ज्यांचे प्रभू श्रीराम नाहीत. उगाचच मग ते शाकाहारी, मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोहोचविले जाते. वारकरी, माळकरी, धारकरी, टाळकरी हे सगळे बहुजन समाजाचे आहेत. हे सगळे प्रभू श्रीराम यांना मानतात. यातील सर्व लोक शाकाहारी आहेत. लक्ष्मण जगताप असते तर त्यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा साजरा केला असता. रामराज्याचे आपले स्वप्न आहे. शोषित, पीडितांना सुविधा मिळणे म्हणजे रामराज्य आहे.

आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविली आहे. पिंपरी-चिंचवडच्या विकासात जगताप यांचा सहभाग राहिला. सामान्यांच्या गरजा ओळखून उपक्रम राबवत होते. त्यांच्या सारखे व्यक्तीमत्व नसणे याचे दुःख आहे. त्यांचा वारसा जपणे, पुढे चालविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

]]>
कोल्हापूर प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश.. https://maknews.live/archives/13615?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf Wed, 07 Jun 2023 19:26:52 +0000 https://maknews.live/?p=13615

मुंबई :

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनी एका व्यक्तीने औरंगजेबाचे स्टेट्स ठेवले. या पोस्टमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पण या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत. गृह मंत्रालयाने कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

गृहमंत्रालयाचे परिस्थितीवर लक्ष : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये आपण कोल्हापुरातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले होते. दरम्यान गृहमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आल्याचे सांगितले.

कोल्हापूर बंद ठेवण्याची हाक : महाराष्ट्रासह देशभरात 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. पण राज्यातील राज्याभिषेक सोहळ्याला गालबोट लागले. राज्याभिषेक दिनानिमित्त अनेक शिवभक्तांनी सोशल मीडियावर स्टेटसला फोटो, व्हिडिओ पोस्ट केले. याच दरम्यान एका व्यक्तीने औरंगजेबाचे स्टेट्स ठेवले. या पोस्टमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. यापार्श्वभूमीवर कोल्हापुरात तणावाचे वातावरण आहे.औरंगजेबचे स्टेट्स ठेवल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंद ठेवण्याची हाक हिंदुत्त्ववादी संघटनांनी दिली होती.

अहमदनगरमधील व्यक्तीने पोस्ट केला फोटो : यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अहमदनगरमध्ये एका व्यक्तीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोशल मीडियावर औरंगजेबाचा फोटो पोस्ट केला. या व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट अनेकांनी पाहिली आणि ती थोड्याच वेळात व्हायरल झाली. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी औरंगजेबाचा फोटो पोस्ट केल्याने अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. याचा निषेध म्हणून विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून पुणे, कोल्हापूर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूरमध्ये देखील निदर्शन करण्यासाठी मोर्चा आयोजित केला गेला होता. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केली.

म्हणून झाला लाठीचार्ज : पोलिसांनी जमाबंदी लागू केलेली असताना देखील कोल्हापुरात अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या निषेध मोर्चात सहभागी झालेले हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मागे हटत नव्हते. परिणामी पोलिसांना बाळाचा वापर करून लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी लाटीचार्ज केल्यामुळे कोल्हापूरमधील परिस्थिती चिघगळली आणि या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गृह विभागाने कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद केली आहे.

]]>
महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यात सुमारे 5,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://maknews.live/archives/13543?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25bf-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be Sat, 03 Jun 2023 18:56:41 +0000 https://maknews.live/?p=13543

पुणे :

राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रोजगार निर्मिती होत नाही, असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर सुरु होता. मात्र आता या सरकारने बजाज फिनसर्व्ह सोबत सामंजस्य करार केला आहे. बजाज फिनसर्व्ह 5,000 कोटी रुपये गुंतवणुक केली आहे. या गुंतवणुकीमुळे आयटी हब असलेल्या पुण्यात आता 40 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. राज्यातील आणि देशातील तरुणांसाठी ही गुंतवणूक फार महत्वाची ठरणार असून पुणे शहराला चालना मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यात सुमारे 5,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे आयटी हब असलेल्या पुण्यात आता 40 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज यांच्या उपस्थितीत हा करार झाला. त्यामुळे आता पुणे शहराची वित्तीय हब अशी ओळख निर्माण होणार आहे. या रोजगारामुळे पुणे शहराला चालनादेखील मिळणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. बजाज फिनसर्व कंपनी राज्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुणे शहरात होणार आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यात झालेली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असल्याचं फडणवीस म्हणाले आहे.

मागील काही महिन्यांपासून राज्यातील काही मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. या सगळ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. यावरुन राजकीय वातावरण तापलं होतं. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची होती आणि यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार होती मात्र हाच प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने अनेक तरुणांचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे, एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ, महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे चांगलं असल्यामुळे या प्रकल्पासाठी पुण्याजवळील तळेगावची निवड केली होती. मात्र हा प्रकल्प पुण्यात न होता तो गुजरातला गेला आणि गुजरातमध्ये रोजगार निर्मिती झाली. मात्र बजाज फिनसर्व यांच्या गुंतवणुकीमुळे पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

]]>
‘आपला दवाखाना’ सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम सुरू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://maknews.live/archives/13110?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%2596%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3 Tue, 02 May 2023 00:23:05 +0000 https://maknews.live/?p=13110

नागपूर :

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० च्या घरात आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, आज ३०० च्या घरात आपला दवाखानांचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याविषयी नागपुरातून बोलताना माहिती दिली. तसंच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा केलेल्या विस्ताराबाबत त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्त्वात आणखी एक चांगली योजना सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. महात्मा फुले यांच्या जनआरोग्य योजनेतून ५ लाखांपर्यंतचा इलाज मोफत केला आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत मिळत आहेत आणि आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत होत आहेत. यातून जवळपास ९०० ऑपरेशन्स आणि उपचार मोफत मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील १२ कोटींपैकी ८ कोटी लोकांना मोफत उपचार देणार आहोत.

तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी चार लाखांपेक्षा जास्त पैसे या योजनेतून देण्यात येतात. सामान्य माणसावर आरोग्याचा बोजा पडू नये याचा विचार आम्ही करत आहेत. या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवत आहोत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. आपलं दवाखानाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, “अतिशय उत्तम प्रकारची संकल्पना आहे ही. वेगवेगळ्या सेवा मोफत देण्यात येणार आहे. दवाखान्यात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मोफत देण्यात येणार आहे. सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम सुरू होतोय, असं फडणवीस म्हणाले.

]]>
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यायालयात हजर.. https://maknews.live/archives/12897?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2589%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2596%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582 Sun, 16 Apr 2023 02:20:53 +0000 https://maknews.live/?p=12897

नागपूर :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी त्यांच्या 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणे उघड न केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या अर्जासंदर्भात येथील न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी सर्व आरोप फेटाळले.

फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 313 च्या तरतुदीनुसार फडणवीस यांचे म्हणणे लेखी स्वरूपात नोंदवले गेले. या तरतुदीनुसार, कोर्ट आरोपीला खटल्यातील तक्रारदाराने दिलेल्या पुराव्यावर प्रश्न विचारते. फडणवीस दुपारी 12 वाजता दिवाणी न्यायाधीश व्ही.ए. देशमुख यांच्यासमोर त्यांच्या वकिलांसह हजर झाले, तेव्हा त्यांना 110 प्रश्नांसह 35 पृष्ठे देण्यात आली.

स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वकिलांशी चर्चा करून प्रत्येक प्रश्नाची उत्तरे लिहून घेतली. भाजप नेत्याने तक्रारीत केलेले सर्व वाद आणि आरोप नाकारले आणि सांगितले की त्यांनी “गुन्हा किंवा चुकीचे काम केलेले नाही”, त्यांच्या वकिलाने नंतर पत्रकारांना सांगितले. दीड तासानंतर फडणवीस न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडले. न्यायालयाने हे प्रकरण अंतिम युक्तिवादासाठी ६ मे रोजी ठेवले आहे.

1998-99 मध्ये देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर असताना त्यांनी महापौर असताना जमिनीच्या प्रकरणात काही निर्णय घेतले. याप्रकरणी त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या दोन्ही प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना जामीन मिळाला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणत्याही गुन्हेगारीचा उल्लेख केलेला नाही. त्यानंतर एड. सतीश उके यांनी या मुद्द्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली.त्यानंतर या प्रकरणाची उच्च न्यायालयात, नंतर सर्वोच्च न्यायालयात, त्यानंतर पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सतीश उके यांनी आरोप केला आहे की भाजप नेत्याने 2014 मध्ये खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि 1996 आणि 1998 मध्ये नोंदवलेले फसवणूक आणि बनावटीचे दोन गुन्हे लपविले.

विशेष म्हणजे फडणवीस यांच्यावर फौजदारी खटले लपवल्याचा आरोप करणारे वकील सतीश उके हे स्वतः तुरुंगात आहेत. उके यांना अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या वर्षी ३१ मार्च रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. उके हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. 2021 मध्ये समोर आलेले फोन टॅपिंग प्रकरण असो किंवा नितीन गडकरींवर दाखल केलेला खटला असो, दोन्ही प्रकरणांमध्ये सतीश उके हे नाना पटोले यांचा न्यायालयात बचाव करत होते.

]]>
भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://maknews.live/archives/12799?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2580-%25e0%25a4%259c%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595-%25e0%25a4%25b5 Fri, 07 Apr 2023 02:07:06 +0000 https://maknews.live/?p=12799

मुंबई :

भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचे सहकार्यही नक्कीच मोलाचे ठरेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हाॅटेल ताज महल पॅलेस येथे इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने (IFCCI) ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ परिषदेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ‘आयएफसीसीआय’चे अध्यक्ष सुमित आनंद, महासंचालक पायल कंवर, वाणिज्य दूत ज्यों मार्क सिरे-शार्ली, फ्रान्सचे व्यापारविषयक आयुक्त एरिक फॅजोल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन शर्मा, पश्चिम विभागीय संचालक श्वेता पहुजा, यांच्यासह फ्रान्स आणि भारतातील प्रमुख उद्योजक, बँकर्स, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

एकूण १४ फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात ₹ ५,७०० कोटी गुंतवणूक करणार असून यामुळे ५,३०० थेट रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात नवे उद्योग उभारणी, उद्योग विस्तारासाठी भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांदरम्यान सामंजस्य करार होत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. तसेच सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रही अग्रेसर आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्यात युवा शक्ती मोठी आहे. हे राज्याचे बलस्थान आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधांचा विकास करणे, एक्सप्रेस वे, मेट्रो, सागरी सेतू यांसारख्या विकासकामांत वेगाने काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी परिषद उपयुक्त

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य नेहमीच उद्योगस्नेही राहिले आहे. भविष्यातही ‘कॉस्ट ऑफ डूइंग बिझनेस’ आणि ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ या दोन्हीत महाराष्ट्र सर्वोत्तम असेल. सर्व उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूकदारांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी ही परिषद अतिशय उपयुक्त ठरेल. याव्दारे संबंध अधिक दृढ होतील. फ्रान्सबरोबर विविध क्षेत्रात सहकार्यपूर्ण संबंध प्रस्थापित झालेले आहेत.

महाराष्ट्रात उद्योग उभारण्यास पुढाकार घेणाऱ्या कंपन्यांना उद्योग उभारणीसंदर्भात सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. उद्योगांच्या अपेक्षांनुसार त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उद्योगांसाठी ख-या अर्थाने सिंगल विंडो सिस्टीम तयार करण्यात आली आहे. असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टार्ट अप्स व युनिकाॅर्नची राजधानी

महाराष्ट्र ही देशाची स्टार्ट-अप आणि फिनटेक, युनिकाॅर्नची राजधानी बनली आहे. देशाची 65 टक्के डाटा सेंटर क्षमता असणारा महाराष्ट्र आता देशाची डाटा सेंटर राजधानीही बनला आहे. पायाभूत सुविधा, नावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ असणारे मॉडेल सर्वसमावेशक असल्याने राज्यातील पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. प्रवासाचा वेग आणि डेटाचा वेग आता प्रगती ठरवेल. ‘स्पीड आॅफ ट्रॅव्हल’ आणि ‘स्पीड आॅफ डेटा’ यावर अधिक भर देण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

]]>
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसवणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://maknews.live/archives/12655?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259c%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%2588-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d Sat, 25 Mar 2023 02:33:07 +0000 https://maknews.live/?p=12655

मुंबई :

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सदस्य भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अत्याधुनिक आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येणार आहे जेणेकरून लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई करता येईल. मिसिंग लिंक देखील पूर्ण होणार आहे.तसेच आताही लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. तसेच मोटार वाहनांचा दंड वसुली करण्यासाठीही सर्व वाहनचालकांचे अद्ययावत मोबाईल क्रमांकाची माहिती करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

या प्रश्नाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री भाई जगताप, अनिकेत तटकरे, महादेव जानकर, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

]]>
जिंकलो किंवा हरलो तर त्याने काही फारसा फरक पडत नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://maknews.live/archives/12496?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259c%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258b-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258b-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be Sat, 11 Mar 2023 22:22:41 +0000 https://maknews.live/?p=12496

पुणे :

प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रथमच पुणे दौऱ्यावर आले होते.

या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, निवडणूक म्हणजे एकाची हार आणि एकाची जीत, हे अपेक्षितच असते. जिंकलो किंवा हरलो तर त्याने काही फारसा फरक पडत नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या विजय किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मूल्यमापन करतो. दुसर्‍या भाषेत सांगायचे झाल्यास आम्ही पोस्टमार्टेम करतो. आम्ही ते केले असून, यापुढे आम्ही काळजी घेऊ.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आज प्रथमच पुणे दौऱ्यावर आले होतो. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापा टाकण्यात आला. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला याबाबत काहीही माहिती नाही. माध्यम प्रतिनिधींकडूनच मला ही माहिती मिळाली आहे.

]]>
कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, चर्चेची तयारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://maknews.live/archives/12486?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be%25e0%25a4%258a Sat, 11 Mar 2023 02:47:46 +0000 https://maknews.live/?p=12486

मुंबई :

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संटनेने याबद्दल इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या 14 मार्चला 14 लाख कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, संप नको, सर्व कर्मचारी, संघटनांशी चर्चेला तयार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत म्हणाले आहेत. जुनी पेन्शन योजना घाईने नव्हे तर विचारपूर्वक घेण्याचा निर्णय आहे, असंदेखील फडणवीस म्हणाले आहेत.

“याबाबत मोठ्या प्रमाणात आपच चर्चा घडवली पाहिजे. मी पूर्ण दिवस, फक्त एक नाही, तर चार दिवस लागले तरी सर्व कर्मचारी युनियनसोबत बोलायला तयार आहे. मी कर्मचारी संघटनांना विनंती करणार आहे की, त्यांनी इगो इशू न करता यावर चर्चेच्या माध्यमातून काय टप्पे ठरु शकतात, काय मार्ग निघू शकतो यावर मार्ग काढूया. संपाची नोटीस दिलीय, आपण सगळ्यांनी विनंती केली पाहिजे की, संपावर जाऊ नका”, असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“जुन्या पेन्शन योजना हा घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही. हा विचारपूर्वक घेण्याचा निर्णय आहे. उद्याच्या काळात येणारी सरकारं किंवा जनता यांच्यात जेव्हा फिस्कल स्केल उरणार नाही त्यावेळी ते देश कुणाला देतील, राज्यांची अवस्था काय होईल, याचा विचार व्हायला हवा. आपण निर्णय घेऊ शकतो. पण राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार केला पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.

 

]]>
महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी शासनाकडून ‘मिशन’ राबविण्यात येणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://maknews.live/archives/12426?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4 Mon, 06 Mar 2023 01:05:39 +0000 https://maknews.live/?p=12426

अमरावती :

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली आहे.

हे लक्षात घेऊन महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी शासनाकडून ‘मिशन’ राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज येथे केले. कृषी विभाग व ‘आत्मा’तर्फे ‘माविम’ व ‘कारितास इंडिया’ यांच्या सहकार्याने आयोजितप्राकृतिक कृषी, मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात ते बोलत होते.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, तुषार भारतीय, निवेदिता चौधरी, जयंत डेहणकर, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, रासायनिक खतांच्या अतिरेकी वापराने जमिनीची हानी झाली व मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला. भरडधान्यासारख्या पारंपरिक आहाराऐवजी ग्लूटेनयुक्त पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले. जीवनशैलीत बदल झाले. आहार व जीवनशैलीतील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊन देशातील मधुमेह व कर्करोगाच्या रूग्णांची संख्या वाढली. त्यामुळे पुन्हा मिलेट्स आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज भासू लागली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सुचविल्यानुसार पौष्टिक तृणधान्य वर्ष यंदा सर्व जगात साजरे होत आहे. हे मिलेट्स वर्ष महत्त्वाचे ठरून भविष्यात श्रीअन्नाला ग्लॅमर व बाजारपेठ मिळून जगभरातून मागणी वाढणार आहे. त्यासाठी पौष्टिक तृणधान्याचे कोठार म्हणून महाराष्ट्र व भारत अव्वल ठरणार आहेत. नैसर्गिक शेतीमुळे गुंतवणूक खर्च कमी होतो व जमीनीचा कस कायम राहून उत्पादकताही वाढते. त्यामुळे महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी याबाबत मिशन राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी व बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हाती असावी यासाठी ॲग्रो बिझनेस कम्युनिटी उपक्रम राबविण्यात येईल. शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच, ट्रॅक्टर आदी साधने मिळून विकासात भर पडली. सततच्या पावसाने शेतीचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना भरपाई देण्याचा निर्णय आमच्या शासनाने घेतला. त्यासाठी सततच्या पावसाची व्याख्या करण्यात आली. त्यामुळे बहुसंख्य नुकसानग्रस्त शेतक-यांना लाभ मिळत आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून 37 लाख हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही महत्वाची योजनाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नांदगावपेठेत वस्त्रोद्योग पार्क सुरू करण्यात आला. आता केंद्र शासनाच्या ‘मित्रा’ योजनेतील टेक्स्टाईल पार्कही अमरावतीत आणण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

]]>