गुजरात – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Sat, 11 Sep 2021 22:22:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा https://maknews.live/archives/5489?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2597%25e0%25a5%2581%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2596%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%259c Sat, 11 Sep 2021 22:22:37 +0000 https://maknews.live/?p=5489

गुजरात :

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांना आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र त्यांनी अचानक दिलेल्या गुजरातच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भाजपाने मुख्यमंत्री पदाची संधी दिल्याबद्दल आपण भाजपा नेतृत्तवाचे आभारी आहोत. मात्र योग्यवेळी नेतृत्वात बदल करणे हा भाजपाचा स्थायीभाव आहे. पाच वर्षात भाजपाने आपल्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, याबद्दल आपण पक्षाचे आभारी आहोत, गुजरातला आता नवं नेतृत्व मिळेल, असे म्हणत विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर पुर्णवेळ संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तथापि विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण असतील, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीच्या नावांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या नावाचा समावेश आहे. जुलै महिन्यातच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मनसुख मांडविया यांना केंद्रीय आरोग्य मंत्री करण्यात आले आहे. तर दुसरे नाव सध्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे आहे. याशिवाय इतर दोन नावांमध्ये सी.आर पाटील आणि पुरुषोत्तम रूपाला यांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत भाजपने काही राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री यापूर्वी दोनदा बदलले गेले, तर अलीकडेच येडियुरप्पा यांना कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. उत्तराखंडमध्ये तिरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुष्कर सिंह धामी यांना नवे मुख्यमंत्री बनवले. पुढील वर्षी उत्तराखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर कर्नाटकात पक्षाने येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे.

]]>
गुजरातमध्ये कोरोनाने भयंकर रूप : अंत्यसंस्कारांसाठी मोठ्या मोठ्या रांगा https://maknews.live/archives/3431?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2597%25e0%25a5%2581%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25af%25e0%25a4%2582 Fri, 14 May 2021 20:41:30 +0000 https://maknews.live/?p=3431

गांधीनगर :

महिन्याभरापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनना व्हायरस परिस्थितीवरून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं निदर्शनास आल्याने आणि राज्य “आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीकडे” जात असल्याचं मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केल्याने न्यायालयाने देखील दखल घेतली होती. या याचिकेवर (१२ एप्रिल) सुनावणी पार पडली होती.

यावेळी कोर्टाने विविध मुद्दे उपस्थित करत सरकारकडे उत्तरं मागितली होती. विशेष म्हणजे गुजरातच्या इस्पितळांबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या असून त्यांना जागाच उपलब्ध होतं नाही. यावरून न्यायालयाने ‘गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत’ अशी धक्कादायक टिपणी केल्याने गुजरात सरकारची चांगलीच पोलखोल झाल्याचं म्हटलं गेलं होतं.

आता सुद्धा गुजरातमधून धक्कादायक माहिती समोर येणं सुरूच आहे. गुजरातमध्ये कोरोनाने भयंकर रूप घेतलं असून राज्यातील अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. या प्रमुख शहरांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी मोठ्या मोठ्या रांगा लागल्या असून तेथे वेटिंग लिस्ट देखील मोठी आहे.

दुसरीकडे, मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असताना संबंधित सरकारी खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने अनेक प्रश्न निर्माण केलं आहेत. एका रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये मागील 71 दिवसात तब्बल 1.23 लाख मृत्यू दाखले वितरित करण्यात आले आहेत. परंतु, कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 4218 इतकीच दाखवण्यात आली आहे. त्यामुळे लाखो मृत्यू होऊनही केवळ 4 हजार रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचं सांगणं वास्तवाला विसंगत असल्याचं म्हटलं जातंय.

गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेले मृत्यू आणि जारी करण्यात आलेले डेथ सर्टिफिकेटचे आकडे यांच्याशी तुलना करता, जे ताजे आकडे समोर आले आहेत ते दुप्पट आहेत. गुजरातमधील वृत्तपत्र दिव्य भास्करने 1 मार्च 2021 पासून 10 मे 2021 पर्यंतच्या मृत्यू दाखल्यांवरुन एक वृत्त छापलं आहे. त्यानुसार, गुजरातमधील 33 जिल्हे आणि 8 महानगरांमध्ये 71 दिवसात आतापर्यंत 1 लाख 23 हजार 871 मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत. यावर्षी मार्च महिन्यात राज्यात एकूण 26 हजार 026 इतके मृत्यू दाखले जारी करण्यात आले. एप्रिलमध्ये त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या 57,796 वर पोहोचली. तर मे महिन्याच्या 10 दिवसातील आकडा 40,051 इतका आहे.

]]>
कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर पोहचविले : देशात गुजरात मॉडेलची जोरदार चर्चा https://maknews.live/archives/2844?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%259a%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2582%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595 Tue, 06 Apr 2021 18:07:58 +0000 https://maknews.live/?p=2844

सूरत :

सध्या देशात गुजरात मॉडेलची जोरदार चर्चा सुरू असताना अशी एक घटना घडली की, याला आदर्श मॉडेल म्हणायचं का नाही असा विचार करायला लागणार आहे. कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर पोहचविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राजधानी सूरत महानगरपालिकेच्या कचरा गाडीतून हे व्हेंटिलेटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते, हे दृश्य पाहून नागरिकांनी डोक्याला हात लावला आणि त्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले.

सोमवारी गुजरातमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सलग दुसऱ्या दिवशी 2800 हून अधिक नवे रुग्ण पॉझीटिव्ह आले. त्यात 724 नव्या केसेस राजधानी सूरतमध्ये आढळल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला गुजरात सरकारने व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. वलसाडमधून 34 व्हेंटिलेटर सूरतला नेत असतांना ही वाहतूक कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून केल्याची गंभीर बाब समोर आली. सूरत महापालिकेने हे व्हेंटिलेटर आणण्यासाठी कचऱ्याचे ट्रक पाठवले होते. ट्रक कचऱ्याचे आहे हे दिसत असतांनाही वलसाड प्रशासनाने त्याच ट्रकमध्ये व्हेंटिलेटर भरून पाठवले. कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून व्हेंटिलेटर नेण्यात आल्याचा प्रकार समजल्यानंतर वलसाडचे जिल्हाधिकारी आर.आर.रावल यांनी त्वरीत चौकशीचे आदेश दिले.

दरम्यान, गुजरामध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्येने सोमवारी दिवसभरात तीन हजाराचा आकडा पार केला आहे. 24 तासात 3160 रुग्ण पॉझीटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या आता 3 लाख 21 हजार 598 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4581 जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला आहे.

]]>