अपघात – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Thu, 20 Jan 2022 08:52:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 काल आनंद आज शोककळा… अपहरण झालेला मुलगा सुखरूप पोचल्यावर त्याला भेटायला येणाऱ्या आत्याचा अपघाती मृत्यू….! https://maknews.live/archives/7613?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6-%25e0%25a4%2586%25e0%25a4%259c-%25e0%25a4%25b6%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b3%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%259d Thu, 20 Jan 2022 08:49:48 +0000 https://maknews.live/?p=7613

बाणेर :

बाणेर येथील अपहरण झालेल्या मुलगा स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेड वरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्या चा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

सौ. सुनीता संतोष राठोड चव्हाण वय 36 यांचा अपघातामध्ये नगर महामार्गावर चार चाकी अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची दोन मुले व पती गंभीर जखमी झाले आहेत. एक मुलगा जुपिटर हॉस्पिटल ला उपचार घेत असून दुसरा प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे.

समर राठोड वय 14 अमन राठोड वय ६ अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहे. तर त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. एक मुलगा जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दुसरा मुलगा प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे.

कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

]]>
नवले ब्रीज जवळ पुन्हा अपघात, तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू. https://maknews.live/archives/7282?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ac%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%259c-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b3-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25aa%25e0%25a4%2598 Tue, 28 Dec 2021 15:47:50 +0000 https://maknews.live/?p=7282

पुणे :

नवले पुलावर होणारी अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजुन देखील दिसत नाहीत. आज मंगळवारी सकाळी परत एकदा अपघात झाला असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. उतारावर कंटेनर मागे सरकल्याने पाठिमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले होते. त्यानंतर उतारावरून कंटेनर मागे आला असल्याने मागून येत असणाऱ्या तीन ते चार वाहनांना धडक दिली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे

या अपघातामुळे सिंहगड रोडवर पूर्णपणे ट्राफीक जाम झाले होते. घटनेची दखल घेण्यासाठी सिंहगड पोलीस स्टेशनचे विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार हे घटनास्थळी पोहोचले. मृतांची नावे अद्यापही काळली नसून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेले अनेक दिवसांपासून नवले पूल हा मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. परंतु प्रशासन मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामूळे अशा अपघातांना जबाबदार कोण, याचे मात्र उत्तर गुलदस्त्यातच आहे.

]]>
माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू. https://maknews.live/archives/6982?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2596-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25bf-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a1 Thu, 09 Dec 2021 02:23:33 +0000 https://maknews.live/?p=6982

नवी दिल्ली:

भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत (Bipin Rawat ) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला.

या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे अधिकारी

सीडीएस बिपीन रावत
मधुलिका रावत
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
गुरुसेवक सिंग
जितेंद्र कुमार
विवेक कुमार
बी. साई तेजा
हवालदार सतपाल

आगाची भडका उडाला अन् झाडांनी पेट घेतला

बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होतं.

कोण आहेत बिपीन रावत?

डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतलं. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही पूर्ण केला.

https://twitter.com/IAF_MCC/status/1468559350914453509?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1468559350914453509%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

]]>
नवले पुलावर भीषण अपघात दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू https://maknews.live/archives/6190?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ad%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25aa%25e0%25a4%2598%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258b Thu, 21 Oct 2021 15:24:59 +0000 https://maknews.live/?p=6190

कात्रज :

नवले पुलावर आज संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा अपघात झालाय. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका पिकअप टेम्पोला कंटेनरने धडक दिली. यानंतर पिकअप टेम्पो शेजारून जाणाऱ्या दोन बुलेट आणि एक्टिवा गाड्यांना पाठीमागून धडकली. या विचित्र अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर कात्रजच्या नवीन बोगद्याकडून येणाऱ्या एका कंटेनरने पुढे चाललेल्या पिकअप टेम्पोला धडक दिली. यामध्ये पिकप टेम्पो मध्ये असलेले बांधकाम साहित्य संपूर्ण रस्त्यावर पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

नवले पुलाजवळ आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा कडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका कंटेनरने पिकप टेम्पोला धडक दिली. त्यानंतर ही पिकप तीन दुचाकींना पाठीमागून जाऊन धडकली. पुढे जाऊन पिकअप उलटली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

]]>
पुणे जिल्ह्यातील २ कबड्डीपटूंचे अपघाती निधन https://maknews.live/archives/2570?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a5%25a8-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a1 Wed, 17 Mar 2021 17:49:53 +0000 https://maknews.live/?p=2570

हुबळी :

क्रीडाक्षेत्राला धक्का देणारी घटना बुधवारी(१७ मार्च) पहाटेच्या सुमारास घडली आहे. पुणे जिल्ह्यातील कबड्डीपटू प्रवास करत असलेल्या तवेरा गाडीचा आणि कंटेनरची धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात २ कबड्डीपटूंना आपला जीव गमवावा लागला आहे तर २ खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त समोर येत आहे.

बुधवारी पहाटे कळंब येथील कबड्डीपटू कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौरंगी कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होते. यावेळी हुबळीच्या दिशेने जात असताना विजापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर पहाटेच्या सुमारात तवेरा आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात सोहेल सय्यद (वय २२ वर्षे) आणि महादेव आवटे (वय २०) या दोन युवा कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर दोन कबड्डीपटू गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे.

तसेच या अपघातात जखमी झालेल्या कबड्डीपटूंना विजापूरजवळीत बंजारा हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. हे खेळाडू महाराणा कबड्डी संघातील कबड्डीपटू होते.

कबड्डी स्पर्धेसाठी निघालेल्या इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या भरधाव तवेरा गाडीने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. तर 7 जण गंभीर जखमी झाले. विजापूर रस्त्यावर बुधवारी (दि. 17) सकाळी पावणे सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. जखमींना विजापूर मधील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान महाराणा कबड्डी संघातील महादेव आवटे हा खेळाडू दोन वेळचा राष्ट्रीय चॅम्पियन होता व कबड्डीपटूंना प्रशिक्षण देत होता. त्याला पोलीस बनायचे होते मात्र त्याचे हे स्वप्न अधुरे राहिले. त्याच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्देवी घटनेमुळे पुणे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

]]>
अमेरिकेत विचित्र अपघातात 100 वाहनांची धडक.  https://maknews.live/archives/1955?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2585%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%259a%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25aa%25e0%25a4%2598%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4 Fri, 12 Feb 2021 18:07:41 +0000 https://maknews.live/?p=1955

अमेरिका :

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या एका विचित्र अपघातात १०० वाहनांची धडक झाली. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे म्हटले जाते. या अपघातात सहाजण ठार झाले असून अनेकजण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सातत्याने पाऊस कोसळत असल्यामुळे रस्ता निसरडा झाला आणि त्यातून हा अपघात झाला असल्याचे म्हटले जाते.

हा अपघात गुरुवारी सकाळी फोर्ट वर्थमधील इंटरस्टेट ३५ वेस्टमध्ये झाला. या भागात सातत्याने पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्ते निसरडे झाले होते. फोर्ट वर्थ अग्निशमन दलाने या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती दिली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनाही जखमींना मदत करणे कठीण जात होते. रस्ते निसरडे झाल्यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. मदत आणि बचावकार्यासाठी हा महामार्ग बंद ठेवण्यात आला आणि वाहतूक इतरत्र वळवण्यात आली. या भागातील तापमानाचा पाराही घसरला होता. त्यामुळे वाहनांमध्ये अडकलेल्यांना तातडीने बाहेर काढणे आवश्यक होते.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसारे, जवळपास १०० वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एक डझनहून सेमी-ट्रॅक्टर ट्रेलर होते. अपघाताचे काही छायाचित्र मन हादरवून सोडणारे होते. अनेक वाहनांची जोरात धडक झाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण जात आहे. वाहने समोरा-समोर धडकली असल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्ता इतका निसरडा होता की वाहने पूर्ण फिरली असावीत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनास्थळापासून जवळपास ८ मैल अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला. अपघाताच्या वेळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, तापमान अतिशय कमी असल्याने आद्रताही अधिक होती. त्यामुळे रस्ता अधिक निसरडा आणि धोकादायक झाला होता.

]]>
पीएमपीएलच्या ऑइल गळतीमुळे बालाजी चौक सुस रोड येथे दुचाकी घसरून अपघात. https://maknews.live/archives/909?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580%25e0%25a4%258f%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580%25e0%25a4%258f%25e0%25a4%25b2%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2591%25e0%25a4%2587%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b3%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b3 Sun, 03 Jan 2021 07:48:16 +0000 https://maknews.live/?p=909

पाषाण :

पाषाण-सूस रोड रस्त्यावर पीएमीएमएलच्या बसमधून होणाऱ्या ऑईल गळती मुळे बारा तेरा दुचाकीस्वार घसरून पडले. नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी पीएमपीएल ने नागरिकांना त्रास दिला. सुदैवाने दुचाकीवरून पडलेल्या ना जास्त दुखापत झाली नाही.

ही घटना सामाजिक कार्यकर्ते अशोक दळवी यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला फोन केला. अग्निशामक दल आल्यावर त्यांच्या मदतीने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने अशोक दळवी व सिकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी विश्वकर्मा सोसायटी ते वाकेश्वर मंदिर पुलापर्यंत ऑईल सांडलेल्या रस्त्यावर तत्काळ उपाययोजना करून माती टाकली.

या वेळी बालाजी रिक्षा स्टँड सभासदांनी व शौकत शेख यांनी खूप मेहनत घेतली. यामध्ये सचिन पाषाणकर आणि अशोक दळवी यांनी स्वतः या कामात सहभाग घेवुन संभाव्य धोका टाळला.

यावर प्रतिक्रीया देताना अशोक दळवी यांनी सांगीतले की, पीएमीएमएलच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पीएमपीमएल बसेस व्यवस्थित दुरुस्त कशा होतिल हे पाहायला हवे. तसेच नागरिकांनी देखील अशा घटना दिसताच त्यावर उपाय योजना केल्या तर संभाव्य धोके टळतील.

तसेच स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी सांगीतले, की ज्या पद्धतीने नागरिकांनी तत्परता दाखविली त्यामूळे पुढील धोका टळला असला, तरी पीएमीएमएलच्या ताफ्यातील बसेस कडे अधिकाऱ्यांनी वेळीच ऑईल गळती मुळे होणारे मोठे अपघात टाळावे म्हणून दक्ष राहायला हवे.

]]>