अण्णा हजारे – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Sat, 28 Aug 2021 20:00:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली म्हणून सरकारकडून वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे : अण्णा हजारे https://maknews.live/archives/5225?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2595%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ad%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be Sat, 28 Aug 2021 20:00:34 +0000 https://maknews.live/?p=5225

अहमदनगर :

देशातील सद्यपरिस्थितीवर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनता कुंभकर्णासारखी झोपलीय, असं मत व्यक्त केलं.

‘आपण आंदोलने करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारकडून वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहे. अशात जनता कुंभकर्णासारखी झोपली असल्यामुळे हे शक्य आहे,’ असे मत हजारे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज देशातील राजकीय परिस्थिती, केल्या जात असलेल्या कायद्यावरून सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘सध्याचे देशातील सरकार बदलण्यासाठी आता जनतेने आवाज उठवून ताकद उभी केली पाहिजे. तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द करेल. या देशात सरकारकडून मागणी नसताना लादण्यात येत असलेल्या कायद्यांवर, सरकारी कंपन्या विकण्याच्या धोरणांवर हजारे यांनी खंत व्यक्त केली.

यावेळी जनतेबाबत बोलताना हजारे म्हणाले की, ‘देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. ही जनता जोपर्यंत जागी होत नाही आणि सरकार बदलण्याची ताकद उभी करत नाही, तोपर्यंत सरकार झुकणार नाही. असेच कायदे आणि निर्णय लादण्यात येतील, असे मत यावेळी हजारे यांनी व्यक्त केले आहे.

]]>
अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित.. https://maknews.live/archives/1667?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=1667 Fri, 29 Jan 2021 17:40:34 +0000 https://maknews.live/?p=1667

राळेगण सिद्धी :

अण्णा हजारेंनी केलेल्या मागणीनुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यांत अहवाल देणार आहे. अण्णा हजारेंनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे मांडले आहेत. अण्णा हजारेंनी शनिवारी ३० जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. परंतु भाजपाने अण्णांची मनधरणी केल्यामुळे हे उपोषण मागे घेतले आहे. अण्णांचे मुद्दे केंद्र सराकरपुढे मांडण्यात आले आहेत. त्यातील काही मुद्द्यांवर चर्चा करुन निर्णयही घेण्यात आला आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत गेले होते. केंद्रीय मंत्री अण्णा हजारेंसोबत केलेल्या सविस्तर चर्चेला यश आल्याचे दिसत आहे. अण्णा हजारेंनी आपले उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय मंत्री अण्णा हजारे मागच्या काळात उपोषणाला बसले होते. तेव्हा अण्णा हजारेंना काही अश्वासने देण्यात आली होती. अण्णांना दिलेल्या काही अश्वासनांची पुर्तता देखील करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीनुसारच राज्यात कोल्डस्टोरेज आणि भंडार उभारण्यावर ६ हजार कोटींचा खर्च केला होता. तसेच त्यांना अश्वासन दिल्यावरच केंद्रीय किसान निधी योजनेची सुरुवात केली अशाच अनेक योजना अण्णा हजारेंच्या मागणीनुसार पुर्ण केल्या असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अण्णा हजारेंनी सुचवलेले अनेक मुद्दे होते. या मुद्द्यांवर एक उच्चस्तरीय समिती गठित करण्यात येणार होती. या समतिच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येणार होता. परंतु दुर्दैवाने निवडणूका आणि त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे ती समिती स्थापन करता आली नाही. त्यामुळे अण्णांनी केंद्राला हे महत्त्वाचे मुद्दे असल्याचे सुचित केले. कृषीमूल्यसह १० ते १५ महत्त्वाच्या मुद्द्यावर हि समिती निर्णय देणार होती. परंतु समिती स्थापन करता आली नाही म्हणून आम्ही उच्चस्तरीय बैठक घेतली. दिल्लीत जाऊन कृषीमंत्र्यांशी चर्चा केली. यानंतर अण्णांचे मुद्दे केंद्र सरकारपुढे मांडले असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

गुरुवार २८ जानेवारीला पुन्हा अण्णांशी चर्चा केल्यावर अण्णा हजारेंनी अजून मुद्धे सांगितले ते मुद्देही त्यात घेतले. तसेच अण्णांनी सांगितलेल्या मुद्द्यांवरही चर्चा केली आहे. अण्णांनी समिती स्थापन करण्यसाठी सांगितले. कृषी राज्यमंत्री चौधरी यांनी स्वतः यामध्ये चर्चा केली आणि समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आहेत. तसेच निती आयोगचे तज्ञही या समितीमध्ये आहेत. अण्णा देतील ती नाव आणि केंद्र सरकारच्या वतीने ही समिती गठीत केली जाईल असे फडणवीस म्हणाले आहेत.

या समितीला ६ महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यांत ही समिती सगळ्या मुद्द्यांवर अहवाल देईल आणि कारवाई करेल. यापुर्वी अण्णांच्या मागणीनुसार लोकपालची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या लोकपालमध्ये काही सुधारणाही करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.

]]>
अण्णा आंदोलनावर ठाम : फडणवीसांची चर्चा निष्फळ https://maknews.live/archives/1541?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2585%25e0%25a4%25a3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae-%25e0%25a4%25ab%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25b5 Fri, 22 Jan 2021 17:27:57 +0000 https://maknews.live/?p=1541

नगर :

दिल्ली सीमेजवळ शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यासंबंधी केंद्र सरकारने काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. तर, सर्वोच्च न्यायालयाने देखील आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना केली असून कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला देखील स्थगिती दिली आहे.

शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. तर, आज केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात झालेल्या ११ व्या बैठकीत देखील तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी आपल्या आयुष्यतील शेवटचे आंदोलन पुकारले आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे.याला अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

दिल्लीत परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी घेतला आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी राज्य सरकारला कळविले असून भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अण्णांची समजूत काढण्यासाठी आज राळेगणसिद्धी येथे दाखल झाले होते. अण्णांनी हे आंदोलन करु नये यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी सुरु आहे. मात्र, या नेत्यांच्या समजुतीचा अण्णांवर परिणाम झालेला नसून ते आंदोलनावर ठाम असल्याचं समजत आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाच्या निर्णयावर मी ठाम आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांना दिली आहे. 30 जानेवारी रोजी अण्णा हजारे कृषी कायद्यांविरोधात उपोषणाला बसणार आहेत. 

]]>