महाराष्ट्र – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Thu, 19 Sep 2024 17:12:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 गणरायाला निरोप अन् पावसाचे आगमन; भारतीय हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट https://maknews.live/archives/17166?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2597%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%25aa-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be Thu, 19 Sep 2024 17:12:39 +0000 https://maknews.live/?p=17166

पुणे :

पावसाने गणरायाच्या विसर्जनात कोणताही अडथळा आणला नाही. त्यामुळे भाविकांनी गणरायाला उत्साहात, वाजतगाजत निरोप दिला. मात्र, आता पाऊस पुन्हा परतला आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा “अलर्ट” दिला आहे.

*पाऊस पुन्हा का परतला ?*

राज्यात संपूर्ण गणेशोत्सवात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या, पण कुठेही मुसळधार पाऊस झाला नाही. दरम्यान, आता झारखंड आणि छत्तीसगड परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

*पावसाचा जोर कुठे?*

संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहे.

*कोणत्या जिल्ह्यात अलर्ट*

शुक्रवार, २० सप्टेंबरला परभणी, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २१ सप्टेंबरला संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. २३ सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

*हवामान खात्याचा अंदाज काय ?*

पाऊस परतेल असे वाटत असतानाच राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतला आहे. कोकण, मध्य, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भासह बाकीच्या भागातही पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

इतर राज्यांची स्थिती काय? पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. गंगा डेल्टा आणि बांगलादेशाजवळील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पर्जन्यवृष्टीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे या प्रदेशांमध्ये अतिवृष्टी होत आहे.

]]>
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग थेट अटल सेतूला जोडणार; दोन शहरांचे अंतर होणार कमी https://maknews.live/archives/17157?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%2588-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a4%25e0%25a4%2597%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d Thu, 19 Sep 2024 17:00:33 +0000 https://maknews.live/?p=17157

पुणे :

अवघ्या दोन तासांमध्ये मुंबईवरून पुणे गाठता येणार आहे. मुंबई-पुणे प्रवासासाठी सध्या साडेतीन तासांचा वेळे लागतो. अटल सेतूवरून जेएनपीटी मार्गे पुण्याला पोहोचता येणार आहे. या नव्या महामार्गामुळे पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरूला जाणं अतिशय सोपं होणार आहे.

नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा कालावधी आणखी कमी होणार आहे. 130 किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग असणार आहे. हा महामार्ग थेट चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असणार आहे.या महामार्गावर वेगवान प्रवासासाठी 8 लेन असणार आहेत.

या रस्त्याच्या बांधणीसाठी अंदाजे 17 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च होईल. सध्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या नव्या महामार्गाची रुपरेषा तयार केली जात आहे.अटल सेतू आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. अटल सेतूवरून खाली उतरल्यानंतर 14 पदरी रस्ता तयार केला जाणार आहे.

हा महामार्ग थेट बंगळुरू आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणार आहे. यासोबत हा रस्ता पुणे रिंग रोडशी कनेक्ट केला जाणार आहे. या नव्या महामार्गामुळे सातारा आणि सोलापूरला जाणं देखील सोपं होणार आहे.

]]>
आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या – राज ठाकरे https://maknews.live/archives/17149?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595 Wed, 18 Sep 2024 17:46:03 +0000 https://maknews.live/?p=17149

मुंबई :

एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले, की बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो…

पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या.येत्या ऑक्टोबर 2024 मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन 4 वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे?

निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असेही राज ठाकरे म्हणाले.

]]>
कॅट परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ… https://maknews.live/archives/17143?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a5%2585%25e0%25a4%259f-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0 Wed, 18 Sep 2024 17:36:25 +0000 https://maknews.live/?p=17143

पुणे :

कॉमन ऍडमिशन टेस्ट (कॅट) परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. जे उमेदवार यापूर्वी अर्ज करू शकले नाहीत, त्यांना आता अर्ज भरता येणार आहे. 20 सप्टेंबर पर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर होती.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. राखीव आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांसाठी 45 टक्के गुण आवश्यक आहेत. ही परीक्षा 24 नोव्हेंबर 2024 रोजी देशभरातील 170 शहरांमध्ये विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.

देशातील 22 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएमएस) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अर्ज करू शकतात. यावर्षी कॅट परीक्षेच्या अर्जाच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन हजार 400 रुपये शुल्क होते. ते वाढवून यावर्षी दोन हजार 500 रुपये करण्यात आले आहे. आरक्षित आणि दिव्यांग श्रेणीसाठी एक हजार 200 रुपये शुल्क होते. ते आता एक हजार 250 रुपये करण्यात आले आहे.

]]>
क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टीने कामे करावीत- अजित पवार https://maknews.live/archives/17127?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%2595%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be Sun, 15 Sep 2024 17:03:06 +0000 https://maknews.live/?p=17127

बारामती :

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली; क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळतील यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

पवार यांनी कन्हेरी वन विभाग, जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत, फळे व भाजी हाताळणी केंद्र, मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच क्रीडा संकुल नूतन इमारत, रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र, गरुडबाग येथील कॅनॉलचे सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे आदी उपस्थित होते.

क्रीडा संकुलात मॅट फिनिशिंग असलेल्या फरशा बसवा. भिंतीच्या रंगानुसार कक्ष, कक्षातील सोफा, शौचालय आदी बाबींचा विचार करुन इलेक्ट्रिकल उपकरणे वापरावीत. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन कामे करा.

जळोची उपबाजार येथील फळे व भाजी हाताळणी केंद्राच्या परिसरात सरळ वाढणारी, सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा. कृषी उत्पन्न बाजार समिती नुतन इमारतीच्या परिसरातील रस्त्याचा विचार करुन पुरेशा उंचीच्या संरक्षक भिंती उभाराव्यात. परिसरात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करावी.

कन्हेरी वनविभागात विविध प्रजातींचे वृक्षारोपण करा. यापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन झाले पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. परिसरात फिरतांना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाच्या फांद्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच गरुडबाग येथील कॅनॉलचे सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क येथील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम करतांना समोरील मुख्य रस्त्यापेक्षा उंच जोत्याचे बांधकाम करावे.

परिसरातील विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्या. कोणतीही कामं प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार आदी उपस्थित होते.

]]>
पुणे-कोल्हापूर, पुणे-हुबळी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू https://maknews.live/archives/17124?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2581%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25b3 Sun, 15 Sep 2024 16:58:58 +0000 https://maknews.live/?p=17124

पुणे :

मध्य रेल्वे कडून पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही गाड्या आठवड्यातून तीन दिवस असणार आहेत.

*पुणे-कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)*

गाडी क्रमांक 20674 पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) 18 सप्टेंबर पासून प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पुण्याहून दुपारी 02.15 वाजता निघेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 07.40 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक 20673 कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) 19 सप्टेंबर पासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी कोल्हापूरहून सकाळी 08.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पुण्यात दुपारी 01.30 वाजता पोहोचेल

ही गाडी सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज या स्थानकावर थांबेल. आठ डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस असेल.

*पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)*

गाडी क्रमांक 20670 पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस (त्रि-साप्ताहिक) 19 सप्टेंबर पासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी दुपारी 02.15 वाजता पुण्याहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री 10.45 वाजता हुबळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक 20669 हुबळी – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (त्रि-साप्ताहिक) 18 सप्टेंबर पासून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे 05.00 वाजता हुबळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी पुण्याला दुपारी 01.30 वाजता पोहोचेल.

ही गाडी सातारा, सांगली, मिरज, बेळगावी आणि धारवाड या स्थानकावर थांबेल. आठ डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस असेल.

]]>
मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास 17 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ https://maknews.live/archives/17115?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2596%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af%25e0%25a5%258b%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2582%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2585 Sat, 14 Sep 2024 17:22:12 +0000 https://maknews.live/?p=17115

मुंबई :

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता 17 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत 1 लाख 66 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. 17 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

]]>
महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांकडून समर्पित हेल्पलाइन सुरू https://maknews.live/archives/17109?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7 Fri, 13 Sep 2024 18:07:12 +0000 https://maknews.live/?p=17109

मुंबई :

राज्यात घडणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी महिलांसाठी समर्पित हेल्पलाइन सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

बदलापूर येथील शाळेत कंत्राटाने नेमलेल्या कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्यासह राज्यात इतर भागात देखील महिला व बालकांवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणांची माहिती सुलभपणे व तात्काळ पोलीस यंत्रणांमार्फत पोहोचण्यासाठी समर्पित हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

*8976004111, 8850200600, 022-45161635* या क्रमांकावर महिलांनी मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी केले आहे.

]]>
राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान? https://maknews.live/archives/17090?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a2%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a5%25a8-%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b3 Thu, 12 Sep 2024 01:01:57 +0000 https://maknews.live/?p=17090

पुणे :

मुंबईमध्ये सप्टेंबर सुरू झाल्यापासून श्रावणसरींचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज होता, मात्र मुंबईत अजून तरी पावसाचा जोर फारसा वाढलेला नाही. आज, बुधवारी पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनावेळी तसेच उद्या, गुरुवारी गौरी-गणपती विसर्जनावेळीही महामुंबई विभागात पावसाचा जोर मोठा असण्याची शक्यता नाही.

कुलाबा येथे १ ते १० सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८.३० पर्यंत ४२.३ मिमी, तर सांताक्रूझ येथे ९२.२ मिमी एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. आज, बुधवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी मुंबईमध्ये मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गुरुवारी गौरी-गणपती विसर्जनाच्या वेळी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. महामुंबई परिसरातही पालघर आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी मध्यम, तर गुरुवारी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी मुसळधार पावसाचा अडथळा नसेल, असा अंदाज आहे.
मंगळवारी मुंबई आणि परिसरात एखाद-दुसरी जोरदार सर येऊन नंतर उन्हाचे चटके मुंबईकरांनी अनुभवले. दिवसभरात कुलाबा येथे पाच मिमी, तर सांताक्रूझ येथे तीन मिमी पावसाची नोंद झाली. पावसाच्या अनुपस्थितीमुळे दिवसभरात कमाल तापमान चढे होते. कुलाबा येथे ३२.५, तर सांताक्रूझ येथे ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.१ आणि १.१ अंशांनी अधिक होते. पाचव्या दिवसाच्या विसर्जनाच्या वेळीही कमाल आणि किमान तापमानाचा पारा चढा, म्हणजे अनुक्रमे ३२ आणि २७ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.

उत्तर कोकणात या काळात फारसा पाऊस नसला तरी दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी, पाचव्या दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. गौरी विसर्जनादिवशी, गुरुवारी मात्र हा जोर कमी होऊन मध्यम सरींचीच शक्यता अधिक आहे.

दक्षिण कोकणासोबतच नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरामध्ये बुधवारी, गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. पठारी भागामध्ये मध्यम सरींचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट अनुभवायला येऊ शकतो. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी भाविकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.

]]>
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार https://maknews.live/archives/17068?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2596%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%259d%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ac-2 Mon, 09 Sep 2024 01:28:49 +0000 https://maknews.live/?p=17068

मुंबई :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून याबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत सप्टेंबर 2024 मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-सीआरपी ( एनयूएम, एमएसआरएलएम व माविम), मदत कक्ष प्रमुख, सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा 11 प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.

आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्विकृतीबाबत देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे महिलांनी केवळ अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज सादर करावे, असे आवाहन रंधवे यांनी केले.

]]>