बाणेर-बालेवाडी-पाषाण – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Fri, 13 Sep 2024 18:02:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 बाणेर येथे डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला माजी कृषिमंत्री शिवसेना उपनेते शशिकांत सुतार यांची सदिच्छा भेट https://maknews.live/archives/17105?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2589-%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580%25e0%25a4%25aa-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a5%2581-2 Fri, 13 Sep 2024 18:01:08 +0000 https://maknews.live/?p=17105

बाणेर :

महारष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री शिवसेना उपनेते शशिकांत सुतार यांनी ज्येष्ट शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी शिवसैनिक दिलीप मुरकुटे यांनी स्वागत करताना सांगितले की, जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून शशिकांत भाऊंनी नेहमी समाजासाठी काम केले. कोथरुड चा कायापालट करण्यात भाऊंचा मोठा हात होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज सुतार हे आमदार म्हणुन निवडून येतील याची खात्री आहे. आम्ही शिवसैनिक म्हणुन त्यांच्या सोबत असणार आहे

यावेळी माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी सांगितले की, सर्वसामान्य कार्यकर्त्याला शशिकांत भाऊंनी नेहमी ताकत दिली. मंत्री म्हणून भाऊंनी कोथरुडचा विकास केला. आज त्यांच्या चिरंजीव राजकारणात भाऊंचा आदर्श समोर ठेऊन काम करत आहे. महाविकास आघाडीचा भक्कम उमेदवार म्हणून ते विजयी होतील.

माझा राजकीय जन्म शिवसैनिक म्हणुन झाला व अंत देखील शिवसेनेत होईल. शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिले. कोथरुड परिसराची विकासमय दिशा ठरवत विकासाच्या बाबतीत कोथरुड चे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. पुढे देखील चिरंजीव पृथ्वीराज उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचे काम करत आहे. समाजाचे केलेले काम आणि पक्षाची केलेली बांधणी पाहता मिळालेल्या संधीचे सोने होईल याची खात्री : शशिकांत सुतार (माजी कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य)

यावेळी पाषाणचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण, अंकुश तिडके माजी नगरसेवक, राम गायकवाड, रखमाजी पाडाळे, दर्शने मामा, संतोष भोसले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

]]>
 ‘झोपेचे सोंग’ घेणाऱ्या प्रशासनाला अमोल बालवडकर यांनी केले जागे… चक्क धुरीकरण मशीन घेऊन अमोल बालवडकर महापालिकेत.  https://maknews.live/archives/17080?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259d%25e0%25a5%258b%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258b%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597-%25e0%25a4%2598%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d Mon, 09 Sep 2024 16:44:17 +0000 https://maknews.live/?p=17080

कोथरूड :

पुणे शहरात डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरियाची साथ सुरू आहे. कोथरूड भागामध्ये या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पुणे पालिकेकडून या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य प्रकारे काळजी घेत घेतली जात नसल्यामुळे ‘झोपेचे सोंग’ घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर सोमवारी चक्क महापालिकेत धुरीकरण मशीन घेऊन आले. महापालिका परिसरात धुरीकरण करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आता तरी प्रशासन जागे होऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेईल अशा संतापजनक भावना अमोल बालवडकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

कोथरूड परिसरात डेंगू, मलेरिया, झिका,चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याभरापासून वाढला आहे. याबाबत पालिकेकडून योग्य उपाय योजना केल्या जात नसल्यामुळे सोमवार ( दि.9) महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोऱ्हाडे यांची अमोल बालवडकर यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी रुग्णांना आरोग्य सेवेमध्ये होत असलेल्या गैरसोयीबाबत चर्चा केली. त्यापूर्वी त्यांनी महापालिका परिसरात धुरीकरण करून पालिकेच्या निष्काळजी कारभाराचा निषेध देखील केला.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती घेतली जाते . मात्र त्यानंतर या आजारांना आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. यामुळे सोसायटी, बैठी घरे, गृहसंकुल यामध्ये या रोगांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तपासणी मोहीम करणे, नागरिकांना नोटिसा बजावणे. एवढेच सोपस्कार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पार पाडले जातात. मात्र त्यानंतर या नागरिकांना आरोग्य उपचार वेळेत मिळतात का ? याबद्दल कोणतीही उपाययोजना महापालिकेकडे नाही.

कोथरूड, पाषाण,बाणेर या परिसरामध्ये घरटी एक रुग्ण आढळून येत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्येष्ठ रुग्ण, लहान मुले यांना हे आजार झाल्यामुळे कुटुंबांना दवाखान्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. मात्र वेळेत उपचार मिळत नाही. कोथरूड परिसरात पालिकेचे एकही रुग्णालय नसल्यामुळे येथे नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात, ज्याचा खर्च परवडण्यासारखा नाही. याबाबत वारंवार प्रशासनाला सांगून देखील बांधून पूर्ण असलेले पालिकेचे रुग्णालय अद्यापही सुरू करता आलेले नाही. प्रशासनाला ही विदारक परिस्थिती लक्षात आणून देण्यासाठी आज फॉगिंग मशीन घेऊन पालिका परिसराचे धुरीकरण केले. जेणेकरून नागरिकांच्या संतप्त भावना प्रशासनापर्यंत पोहोचतील असे अमोल बालवडकर म्हणाले. यावेळी अमोल बालवडकर फाउंडेशनचे सदस्य तसेच कोथरूड परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोथरूड परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात डेंगू, मलेरिया ,झीका, चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक रुग्ण उपचार मिळत नसल्यामुळे तक्रारी करतात. यासाठी स्वखर्चाने गेल्या पंधरा दिवसापासून कोथरूड परिसरातील अनेक सोसायटी,बैठी घरे, व्यावसायिक आस्थापना यांच्या परिसरात धुरीकरण सुरू केले आहे. दिवसभरात अनेकांचे कॉल या धुरीकरणासाठी येतात. रुग्णांची संख्या, त्यांना मिळत नसलेले उपचार त्यामुळे होणारी नागरिकांची फरपट प्रशासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे. अमोल बालवडकर माजी नगरसेवक भाजपा कार्यकर्ता अध्यक्ष, अमोल बालवडकर फाउंडेशन, कोथरूड.

]]>
बाणेर येथील ऐतिहासिक बाणेश्वर मंदिरात पुणे महापालिका आयुक्तांनी घेतले दर्शन.. https://maknews.live/archives/17022?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2590%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3 Mon, 02 Sep 2024 13:15:37 +0000 https://maknews.live/?p=17022

बाणेर :

पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी बाणेर येथील बाणेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शन घेऊन मंदिर परिसराची माहिती घेतली.

यावेळी मंदिराच्या विश्वस्तांकडून महापालिका आयुक्त यांना मंदिराची ऐतिहासिक माहिती सांगण्यात आली. पांडवकालीन असलेली हे मंदिर शहरा लगत असल्याचे माहित नव्हते. त्याच्या दर्शनाचा लाभ आज भेटला अशी प्रतिक्रिया भोसले यांनी यावेळी दिली.

मंदिरात सुरू असलेल्या कामांची यावेळी आयुक्तांना माहिती देण्यात आली. बानेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आयुक्तांनी टेकडीवर असलेल्या तुकाई मातेचे मंदिरात जाऊन आवर्जून दर्शन घेतले. तूकाई टेकडीवरून पूर्ण बाणेर निहाळण्याचा आनंद घेत विविध भागाची माहिती ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारली.

आज सोमवती अमावस्या व शेवटचा सोमवार असल्याने बाणेश्वर मंदिराच्या पिंडीला नंदी स्वरूपात शृंगार करण्यात आला होता. याप्रसंगी बाणेश्वर देवस्थान ट्रस्टचे संदीप वाडकर, सुधीर कळमकर, गणेश तापकीर आदी उपस्थित होते.

]]>
बाणेर श्री विठ्ठल रुक्मिणी देवता वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार.. https://maknews.live/archives/17000?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2581%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25bf Thu, 29 Aug 2024 17:27:13 +0000 https://maknews.live/?p=17000

बाणेर :

बाणेर श्री विठ्ठल रुक्मिणी देवता वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह अतिशय आनंदात पार पडला. भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवलाल धनकुडे. यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 24 वर्ष चालत आलेली सेवा यावर्षी उत्साहात पार पाडण्यात आली.

सप्ताह मध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे प्रसिद्ध महाराज यांचे किर्तन सेवा आयोजित केली होती. आजचे किर्तन सेवा बढे महाराज आळंदी यांचे अतिशय सुंदर असे किर्तन झाले. या उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदर्श माता हा पुरस्कार देऊन महिलांना गौरविण्यात आले.

आदर्श माता पुरस्कार :

1.सौ.अरूणाताई गायकवाड                                2.श्रीमती शकुंतलाताई जगदाळे.                        3.श्रीमती प्रमिलाताई पुंडलिक मुरकुटे.                           4 सौ. प्रमिलाताई दिलीप बालवडकर.                  5.श्रीमती जयश्रीताई शरद जाधव .

यांना आदर्श माता पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
अशा प्रकारे समाज उपयोगी कार्यक्रम करून आनंद मिळतो व समाधान मिळते अशी भावना शिवलाल धनकुडे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रम प्रसंगी आवर्जून उपस्थित नीलप्रसाद चव्हाण (उपजिल्हाधिकारी तथा जमावबंदी अधिकारी पुणे),
अंकुर कावळे (कार्यकारी अभियंता एम एस बी पुणे), प्रमोदजी भोसले(सिनीअर ऑडिटर महाराष्ट्र परिवहन महामंडळ), ॲड दिलीपजी शेलार, ॲड. संग्रामजी कोल्हटकर, ॲड.निखिलदादा गायकवाड, प्रकाश पवार माजी सभापती वेल्हा, सिद्धार्थ रणवरे माजी सरपंच,  जगन्नाथ नाटक पाटील, आप्पा रेणुसे, मोहनशेठ जगदाळे,  शामराव जगदाळे, महादेव मारणे, मोहनशेठ घोलप, तानाजी वाडकर, संजय बापू बालवडकर, सुखदेव चौधरी (चेअरमन अमृतेश्वर सोसायटी), चंद्रकांतआण्णा मरगळे,  पै.दत्तामामा शिंदे, प्रकाश भाऊ गायकवाड, लहुशेठ भोरेकर,  सचिनशेठ वाडकर, आयुष तारी, स्वप्नील बांडे,  नामदेव चौधरी(उपाध्यक्ष रा.मुळशी), परकाळे गुरुजी, राजेंद्र महराज पातळे, समीर तरवडे सरपंच गराडे, बंटी जगदाळे डॉ.रमेश पांगारे,  राजेश साबळे, अविनाश जगदाळे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजक हनुमंत मुरकुटे, संजय नाना मुरकुटे, जयेश मुरकुटे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन विराज धनकुडे आणि राहुल धनकुडे यांनी केले होते. संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा (नानी) धनकुडे, सीईओ सुषमा भोसले, मुख्याध्यापिका रेखा काळे, मुख्याध्यापिका कोमल शिंदे (ज्युनिअर कॉलेज), मुख्याध्यापिका करुणा यादव (सुस ब्रांच), माधुरी शेवाळे (प्री स्कूल ) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  शंकर चंद्रकांत मरगळे याने केला.

]]>
भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुला मुलींनी मारली बॅडमिंटन खेळत बाजी… https://maknews.live/archives/16925?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a5%2588%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a5-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d-2 Sat, 17 Aug 2024 13:47:27 +0000 https://maknews.live/?p=16925

बाणेर :

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्यच्या मुला मुलींनी सुवर्ण व कांस्यपदक पटकावले.

दिनांक 16 ऑगस्ट रोजी झालेल्या बॅडमिंटन खेळामध्ये फर्ग्युसन कॉलेज पुणे विरुद्ध खेळताना आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या खेळामध्ये आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींच्या 19 वयोगटाच्या विद्यार्थिनींनी बॅडमिंटन या खेळात जिंकून पारितोषिक पटकावले . कुमारी दिव्यांशा वहाळ, रिधिमा शेरावत, दनिका पलसुले, श्रेया चौधरी, मृणाल सोनार यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे विरोधात खेळताना २-० च्या बढतीने सुवर्ण पदक पटकावत बाजी मारली.

दिनांक 16 ऑगस्ट रोजी झालेल्या बॅडमिंटन खेळात डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल विरुद्ध खेळताना आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या खेळामध्ये आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुले 19 वयोगटाच्या विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन या खेळात जिंकून कांस्यपदक पटकावले . कु. सिद्धांत कोल्हाडे अल्हाड देशकर , पारितोष साकोरकर, अहान वायकर, यांनी डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल विरोधात खेळताना २-० च्या बढतीने कांस्य पदक पटकावत बाजी मारली.

]]>
म्हाळुंगे बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीत बदल… https://maknews.live/archives/16921?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%259b%25e0%25a4%25a4 Fri, 16 Aug 2024 16:40:06 +0000 https://maknews.live/?p=16921

पुणे :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शनिवारी (दि. 17) राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-बेंगलोर महामार्गावर जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच औंध, बाणेर, बालेवाडी, चांदणी चौक परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि अति महत्वाच्या व्यक्ती तसेच खासगी वाहने व सुमारे 900 बस मधून मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमाला येणार आहेत. मुंबई-बेंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत जड-अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई-बेंगलोर महामार्गावरून चांदणी चौक ते उर्से टोल नका दरम्यान येण्यास-जाण्यास जड अवजड वाहनांना बंदी असेल.चाकण येथून पिंपरी-चिंचवड मार्गे बेंगलोर महामार्गावरून येणाऱ्या जड-अवजड वाहनांना बंदी असेल.

पुण्याकडून मुंबईकडे मुंबई-बेंगलोर महामार्गावरून येणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.

तळेगाव, देहूरोड मार्गे मुंबई बेंगलोर महामार्गावर येण्यास जड-अवजड वाहनांना बंदी असेल. यातून अत्यावश्यक सेवेतील वाहने व कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश असेल.

*पुणे पोलिसांनी बाणेर रोडवरील वाहतूक वळवली*

विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळण घेऊन किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.

मुंबई-बेंगलोर बायपास वरून बाणेर रोडवर जाणाऱ्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळून हायस्ट्रीट मार्गे गणराज चौकातून जावे.

पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोड मार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौक मार्गे जावे. किंवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोडमार्गे जावे.

पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक-पाषाण रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक-बाणेर रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल-औंध रोडवर शनिवारी पहाटे बारा ते मध्यरात्री बारा पर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.

]]>
अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन ला कोथरूडकरांचा उदंड प्रतिसाद… https://maknews.live/archives/16917?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2585%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2587%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2587%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2587%25e0%25a4%2582%25e0%25a4%25b8 Fri, 16 Aug 2024 15:01:42 +0000 https://maknews.live/?p=16917

कोथरूड  :

कोथरूडकरांचा स्वातंत्र्य दिन आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने अमोल बालवडकर फाउंडेशनने गुरुवारी मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कोथरूडकर धावले. कोथरुड मतदार संघाबरोबरच पुणे शहरातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, महिला, मुलांनी हजारोंच्या संख्येने यात सहभाग घेतला.

कोथरुड येथील पंडीत फार्म येथे १५ ॲागस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फाऊंडेशन व ॲटेनेक्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानाने कोथरुड मतदार संघातील नागरीकांकरीता “अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन 2.0” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोथरुड मतदार संघातील तसेच पुणे शहरातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, महिला, मुलांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या मॅरेथॅानमध्ये 3 किमी, 5 किमी व 10 किमीचे टप्पे ठेवण्यात आले होते.

विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरीकांकरीता आयोजित केलेल्या “वॅाकेथॅान”ला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात आयोजित स्पर्धांना ज्येष्ठांनी आपला भरभरून प्रतिसाद दिला. सर्व सहभागी खेळाडुंना मेडल्स देवुन तसेच विजेत्यांना विविध बक्षिसे देवुन गौरवण्यात आले.

मॅरेथॉनच्या निमित्ताने नागरिक एकत्र यावेत. त्यातून त्यांच्यात संवाद घडावा आणि त्याचबरोबर नागरिकांचे आरोग्यही जपले जावे असा उद्देश या “अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन”चा होता. याला कोथरूडकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे युवकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता. नागरिकांनी दिलेल्या या प्रतिसादाचे नक्कीच कौतुक आहे. आगामी काळातही अशाच विधायक उपक्रमांना आम्ही प्राधान्य देणार आहोत.

– अमोल बालवडकर माजी नगरसेवक तथा संस्थापक अमोल बालवडकर फाउंडेशन.

]]>
सुस रोड साई चौक येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिन निमित्त पुरोहितांचा सन्मान…  https://maknews.live/archives/16914?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a1-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2588-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258c%25e0%25a4%2595-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587-%25e0%25a5%25ad%25e0%25a5%25ae-%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af Fri, 16 Aug 2024 14:09:26 +0000 https://maknews.live/?p=16914

पाषाण :

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिननिमित्त पाषाण येथील साई चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पारपडला. पाषाण पंचकृषीचे पुरोहित प्रभाकर ढेरे गुरुजी यांचा शुभःस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर किशोर खडके गुरुजी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

पुरातन काळापासून पुरोहित मंदिरांमध्ये व घरोघरी जाऊन धर्म सेवा व धर्म जागरणाचे काम करत आहे. पारतंत्र्याचा काळात ही पुरोहित देशभीमान जागृत ठेवण्याचे कार्य करत होते. आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमा निमित्त पाषाण परिसरातील पुरोहितांचा राहुल कोकटे व भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांनी सन्मान केला त्या बद्दल धन्यवाद व्यक्त केले.

श्रीपाद कुलकर्णी, सुमित ढेरे, आप्पा कुलकर्णी, महेश सहस्रबुद्धे, मधुकर भाट, श्रीपाद कुलकर्णी, शिवकुमार पांडे आदि गुरुजींचा सन्मान करण्यात आला. तर विनोद पेंढारकर, रत्नाकर माणकर, हरिभाऊ कोकाटे, शीव पांडे यांनी सर्वांना सन्मानित केले. मयुरी कोकाटे व राहुल कोकाटे यांनी सर्वांचे आभार मानले तर गिरीश चोक व किशोरजी मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

]]>
विद्यांचल हायस्कुलमध्ये स्वातंत्र्यदिन संपन्न… https://maknews.live/archives/16893?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%2595%25e0%25a5%2583%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587 Thu, 15 Aug 2024 17:17:29 +0000 https://maknews.live/?p=16893

बाणेर :

विद्यांचल हायस्कूलच्या प्रांगणात ७८ वा स्वातंत्रदिन इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्थानी एकत्रीतपणे साजरा केला.

यावेळी प्रमुख पाहुणे सैनिक दीपक बर्मन , योगीराज
नागरी पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर तापकीर, रोटरी क्लब चे सदस्य राजेंद्र शेलार, सुखानंद जोशी, ए. सी. एम. ए. चे समुपदेशक सचिन मोरालवार, इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असलेले मेजर आकाश पवार तसेच अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अशोक मुरकुटे, संस्थेचे माननीय सदस्य भालचंद्र मुरकुटे , श्वेता मुरकुटे , योगिता बहिरट, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनीषा कुलकर्णी व मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका दिपाली महाजन, संगीता डेरे, सुनंदा धोत्रे तसेच उपमुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.

पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजगीत सादर करून , देशप्रेम व्यक्त करणाऱ्या घोषणा विद्यार्थ्थानी दिल्या, कारगील विजय दिवस व कारगिल युद्धातील जवानांची शौर्यगाथा’, यावर आधारित भाषणे व समूहगीत, विद्यार्थ्यांकडून सादर केले गेले. अशा विविध कार्यक्रमांचे अतिशय उत्साहात व जल्लोषात सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्वेता रणदिवे यांनी केले.

]]>
बाणेर येथील आदित्य इंग्लिश मिडियम स्कूल, 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा… https://maknews.live/archives/16887?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af-%25e0%25a4%2587%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b2-2 Thu, 15 Aug 2024 11:22:15 +0000 https://maknews.live/?p=16887

बाणेर :

बाणेर, पुणे येथील भैरवनाथ, शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मिडियम स्कूल, येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरूवात सकाळी 7:30 वाजता झाली. स्वातंत्र दिनानिमित्त कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  जयेश मुरकुटे यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी संस्थेचे संस्थापक शिवलाल धनकुडे, सेक्रेटरी विराज धनकुडे, खजिनदार राहुल धनकुडे,अध्यक्षा सुरेखा धनकुडे, सी.ई ओ. सुषमा भोसले, मुख्याध्यापिका रेखा काळे, कोमल शिंदे हे सर्वजण उपस्थित होते.

तसेच प्रणाली धनकुडे, कोमल धनकुडे, काळूराम सायकर,  वैजयंती मुरकुटे, हनुमंत मुरकुटे, प्रतिक मुरकुटे, माजी सरपंच सिद्धार्थ रणवरे, अॅड संकेत बुंदेले, अॅड उदय शेलार याबरोबरच संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पालक इत्यादिंनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

स्वातंत्र्यदिना निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आंनदाने सहभाग होऊन, विविध कार्यक्रम सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.  राहुल धनकुडे सर यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे तसेच उपस्थित असलेल्या सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाणिज्य शाखेच्या विद‌यार्थीनींनी केले.

]]>