पुणे शहर – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Thu, 19 Sep 2024 17:08:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 पीएमपीएमएलसाठी 100 इलेक्ट्रीक आणि 100 सीएनजी बस खरेदी करणार https://maknews.live/archives/17163?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580%25e0%25a4%258f%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580%25e0%25a4%258f%25e0%25a4%25ae%25e0%25a4%258f%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-100-%25e0%25a4%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d Thu, 19 Sep 2024 17:08:19 +0000 https://maknews.live/?p=17163

पिंपरी :

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील हवा शुद्ध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका यांच्यामार्फत पीएमपीएमएलसाठी 100 इलेक्ट्रीक बसेस आणि 100 सीएनजी बसेस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिका 60 टक्के आणि पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के हिस्सा भरणार आहे. त्यानुषंगाने खरेदी करावयाच्या 100 सीएनजी बसेस पैकी 40 बसेससाठी येणारा खर्च पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरणार आहे. या बसेसच्या खरेदीसाठी येणाऱ्या 27.20 कोटी रुपये रक्कम पीएमपीएमएल यांना अदा करण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करून त्यांच्यात पर्यावरण संवर्धन करण्याची आवड निर्माण करण्यासाठी तसेच महापालिकेच्या शाळांचे नावलौकिक करण्यासाठी महापालिकेच्या वतीने “अनौपचारिक पर्यावरण शिक्षण प्रकल्पातून पर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित करणे” हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर 2024 या 3 महिन्याच्या कालावधीत या प्रकल्पातील 3 उपक्रम महापालिकेच्या 100 शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहेत. हे कार्यक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक शिक्षणातील अनुभव, निसर्ग वाचन, सभोवतालचे पर्यावरण, पर्यावरणपूरक जीवन शैली याबाबत सजग करणारे आहेत. हा उपक्रम निसर्ग जागर प्रतिष्ठान,पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या उपक्रमच्या अनुषंगाने येणाऱ्या 9 लाख 60 हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.

*बैठकीत मजूर झालेले विविध विषय*

पिंपरी येथे प्रभाग क्र. 10 मध्ये सुविधा भूखंड विकसित करणे, लांडेवाडी येथे नव्याने होणाऱ्या संपवर पंपिंग मशिनरी बसवणे आणि अनुषंगिक यंत्रणेची कामे करणे, प्रभाग क्र. 25 ताथवडे येथील जीवननगर कडून मुंबई-बँगलोर कडे जाणाऱ्या 24 मी. रुंद डीपी रस्ता विकसित करणे आणि या कामाचा सिओइपी तांत्रिक विद्यापीठ (COEP TECHNOLOGICAL UNIVERSITY) मार्फत तपासणी करणे, शहरात विविध ठिकाणी सर्व्हेलन्सआ, स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंट, स्मार्ट सिक्युरिटी सोल्युशन, स्मार्ट टेलिफोनी, बिल्डींग मॅनेजमेंट, आदी कामांसाठी सल्लागार नेमणूक करणे, शहरातील विविध भागातील रस्ते व फुटपाथ आणि इतर स्थापत्य सुधारणा विषयक कामे करणे आदी विषयांना प्रशासक सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

]]>
पुणे मेट्रोचा प्रवासी संख्येचा पुन्हा उच्चांक; 18 तासात केली तब्बल तीन लाख 46 हजार प्रवाशांची वाहतूक https://maknews.live/archives/17146?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2587%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582 Wed, 18 Sep 2024 17:41:22 +0000 https://maknews.live/?p=17146

पुणे :

पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावला आहे. दिवसेंदिवस प्रवशांच्या संख्येत वाढ होत आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी, मंगळवारी (दि. 17) तब्बल तीन लाख 46 हजार 663 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. ही प्रवासी संख्या मेट्रोची आजवरची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. यातून मेट्रोला 54 लाख 92 हजार 412 रुपये उत्पन्न मिळाले.

गणेशोत्सव कालावधीत पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक आले. भाविक प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रो कडून अधिक फेऱ्या सोडल्या. सात सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर पर्यंत या फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या.

नियमित दिवशी मेट्रो सेवा रात्री दहा वाजता बंद होते. मात्र गणेशोत्सव कालावधीत ही सेवा वाढवली होती. सात ते नऊ सप्टेंबर या कालावधीत मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सुरू होती. तर 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत मेट्रो सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत 24 तास मेट्रो सुरू राहिली.

पिंपरी ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर प्रवाशांनी मंगळवारी प्रचंड प्रतिसाद दिला. मंगळवारी सकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तब्बल तीन लाख 46 हजार 633 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. हा आजवरच्या दैनिक प्रवासी संख्येचा उच्चांक ठरला.

यापूर्वी 14 सप्टेंबर 2024 रोजी दोन लाख 43 हजार 435 प्रवासी संख्येचा उच्चांक होता. गणेश भक्तांनी मेट्रोला पसंती देत यापूर्वीचा दैनिक प्रवासी संख्येचा उच्चांक मोडीत काढला आहे.

गणेश उत्सव काळात (7 ते 17 सप्टेंबर) पुणे मेट्रोने 20 लाख 44 हजार 342 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला तीन कोटी पाच लाख 81 हजार 59 रुपये उत्पन्न मिळाले.

*गणेश उत्सव काळात मेट्रोची प्रवासी संख्या आणि मिळालेले उत्पन्न*

प्रवसी संख्या उत्पन्न (रुपयांमध्ये)

7 सप्टेंबर – 117723 /1446150

8 सप्टेंबर – 148710 /1845220

9 सप्टेंबर – 150042 /2502552

10 सप्टेंबर – 149426/ 2470265

11 सप्टेंबर – 150685/ 2513825

12 सप्टेंबर – 168564 /2788832

13 सप्टेंबर – 176946/ 2943133

14 सप्टेंबर – 243435 /2973589

15 सप्टेंबर – 225644/ 2795432

16 सप्टेंबर – 166534 /2809649

17 सप्टेंबर – 346633 /5492412

]]>
ऑटोमोबाइल क्षेत्रात भारत जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे- नितीन गडकरी https://maknews.live/archives/17140?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2591%25e0%25a4%259f%25e0%25a5%258b%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%2587%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4 Mon, 16 Sep 2024 16:51:58 +0000 https://maknews.live/?p=17140

पुणे :

देशातील ऑटोमोबाइल क्षेत्राची अर्थव्यवस्था यापूर्वी सात लाख कोटींच्या घरात होती. त्यावेळी भारताचा क्रमांक सातवा होता. आता भारत जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे ‘सीओईपी अभिमान पुरस्कारां’चे वितरण गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, नियामक मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, मानद सचिव डॉ. सुजित परदेशी, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते उपस्थित होते.

यंदा ‘सीओईपीजीवनगौरव पुरस्कार’ अहमदाबाद येथील ज्येष्ठ उद्योजक पी. एन. भगवती यांना देण्यात आला, भगवती यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील ‘जे. पी. मॉर्गन चेस’च्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया, अमेरिकेतील ‘टेस्ला मोटर्स’चे वरिष्ठ संचालक हृषिकेश सागर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांना सीओईपी अभिमान पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.

जगात ऑटोमोबाइल क्षेत्रात अमेरिका , चीन,) आणि भारत ,येथील अर्थव्यवस्था अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहे. आपल्या देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) रूपाने देशाला आणि राज्याला सर्वाधिक कर प्राप्त करून देणारे हे क्षेत्र आहे. या क्षेत्राने साडेचार कोटी नागरिकांना रोजगार दिला आहे. येत्या पाच वर्षांत या क्षेत्राचा विस्तार दुप्पट होऊन अर्थव्यवस्था 55 लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट उद्योजकांना दिले आहे. लवकरच ऑटोमोबाइल क्षेत्रात आपण अमेरिकेलाही मागे टाकू,” असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

]]>
विसर्जन मिरवणुकीच्यावेळी या 13 ठिकाणी लावता येतील वाहने https://maknews.live/archives/17137?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2581%25e0%25a4%2595%25e0%25a5%2580%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b3 Mon, 16 Sep 2024 16:48:25 +0000 https://maknews.live/?p=17137

पुणे :

विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी 13 ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी पुणे शहर, जिल्हा, तसेच परगावाहून मोठ्या संख्येने नागरिक येतात. विसर्जन सोहळ्यानिमित्त 13 ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

*शिवाजी आखाडा वाहनतळ, मंगळवार पेठ (दुचाकी आणि चारचाकी)

*एसएसपीएमएस मैदान (दुचाकी आणि चारचाकी)

*स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता (दुचाकी आणि चारचाकी)

*पेशवे उद्यान, सारसबाग, (दुचाकी)

*पाटील प्लाझा, मित्रमंडळ(दुचाकी)

*दांडेकर पूल ते गणेश मळा(दुचाकी)

*नीलायम चित्रपटगृह (दुचाकी)

*संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी आणि चारचाकी)

*फर्ग्युसन महाविद्यालय मैदान (दुचाकी आणि चारचाकी)

*जैन हाॅस्टेल मैदान, बीएमसीसी रस्ता (दुचाकी आणि चारचाकी)

*मराठवाडा महाविद्यालय (दुचाकी)

*नदीपात्र ते भिडे पूल (दुचाकी आणि चारचाकी)

]]>
विसर्जन मिरवणुकीत सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त; मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार https://maknews.live/archives/17134?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2581%25e0%25a4%2595%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b9%25e0%25a4%259c Mon, 16 Sep 2024 16:44:57 +0000 https://maknews.live/?p=17134

पुणे :

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज मंगळवारी (दि. १७) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरून मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पाेलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर, तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर, तसेच उपनगरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत.

विसर्जन मिरवणूक सोहळ्यात घातक लेसर दिव्यांचा वापर, तसेच उच्च क्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. लेझर दिव्यांचा वापर न करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना वेळोवेळी आवाहन केले आहे. विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांकडून यंदाही ध्वनीवर्धक यंत्रणा आणि घातक लेसर दिव्यांचा वापर करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे, तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते, तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (दि. १७) रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. – जी. श्रीधर, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

]]>
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी 4 वाजता निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक https://maknews.live/archives/17130?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2597%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2580%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25af%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be Sun, 15 Sep 2024 17:10:24 +0000 https://maknews.live/?p=17130

पुणे :

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने उत्सवाच्या 132 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक यंदाही अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता थाटात निघणार आहे. मागील वर्षी दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा सहभागी झाले होते. यंदा देखील भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी 4 च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.

यंदा श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

यंदाची प्रतिकृती असलेल्या जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरु देखील आहे. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर हा तोललेला आहे, बाजूला 21 छोटे कळस लावण्यात आले आहेत. तर, रथावर 23 नंदींचे चेहरे बसविण्यात आले आहेत. तसेच रथावर तब्बल 18 क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येतील.

रथावर 8 खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले आहे. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 24 फूट इतकी आहे. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. तेथे मोराची डिझाईन देखील साकारण्यात आली आहे. युवा कलादिग्दर्शक विराज खटावकर यांनी हा रथ साकारला आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना माणिक चव्हाण म्हणाले, मिरवणुकीत रुग्णसेवा रथ अग्रभागी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

]]>
पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत- अजित पवार https://maknews.live/archives/17121?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ab%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2580 Sat, 14 Sep 2024 17:32:29 +0000 https://maknews.live/?p=17121

पुणे :

सुमधूर सनईवादन, सेतू-कथ्थक व भरतनाट्यमचा मिलाफ असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्याविष्कारातून गणेशवंदना, महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित संबळवादन, गुजराती लोकनृत्य डांग, डाकला या गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य, राष्ट्रीय एकात्मतेचा दर्शन घडविणारे ईशान्य भारतातील बांबू नृत्य, द ग्लोरी ऑफ सरहद, आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ नृत्याविष्कार, महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या लावणीच्या ‘ऱ्हिदम ऑफ लावणी’ श्री गणेश आरती….अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने 36 व्या पुणे फेस्टिव्हलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पुणे हा फेस्टिव्हल सर्वांचा कार्यक्रम असून त्याचे आकर्षण वाढले पाहिजे, फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासोबत पुण्याची सांस्कृतिक चळवळ अशीच बहरत राहण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे, याकरीता शासन पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भारत सरकारचा पर्यटन विभाग, राज्याचे पर्यटन संचालनालय, पुणे फेस्टिव्हल कमिटी आणि पुणेकर नागरिक संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, आमदार सतेज पाटील, रवींद्र धंगेकर, पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पर्यटन उपसंचालिका शमा पवार, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अभय छाजेड, उल्हास पवार, रमेश बागवे, डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मंगलमय, भक्तीमय वातावरणात अतिशय आनंदाने, उत्सवाने साजरा केला जातो. गणेशोत्सव ही पुण्याची एक ओळख असून ती जागतिक पातळीवर नेण्याचे काम पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून करण्यात आले आहे. येथे सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम कलावंत आपली कला सादर करीत असतात तसेच स्थानिक कलाकारांनादेखील आपली कला सादर करण्याचा संधी या फेस्टिवलमधून मिळते, समाजात उत्तमपणे काम केलेल्या व्यक्तींची नोंद घेऊन त्यांचा गौरव करण्याचे काम करण्यात येते, ही अभिनंदनीय व अभिमानास्पद बाब आहे.

सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्याकरीता प्रयत्न करावेत

लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली त्या हेतूला बाधा येता कामा नये, सार्वजनिक कार्यक्रम साजरा करताना सामाजिक ऐक्य टिकले पाहिजे, यादृष्टीने प्रबोधन झाले पाहिजे. सामाजिक भान ठेवून लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, समाजा-समाजात तेढ निर्माण होणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. समाजातील अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

*पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा*

राज्यातील विविध शहरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. जल, जमीन, वायू, ध्वनी, निसर्गाचे प्रदूषण टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात केले पाहिजे. पाण्यात विरघळणाऱ्या शाडूच्या मूर्तीचा वापर केला पाहिजे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजे व गुलालविरहित मिरवणूक काढावी. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर केला पाहिजे. गणपती विसर्जनावेळी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. निर्माल्यापासून खताची निर्मिती करावी, असे आवाहनही पवार यांनी केले.

खासदार प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव हा देशभरात गाजणारा उत्सव आहे. पुण्यात आयोजित होणारे विविध कार्यक्रम आपल्या जडणघडणीचा भाग होतात. पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध सांस्कृतिक, व्याखानमाला यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने पुण्याचा सांस्कृतिक वारसा उन्नत होत आहे, असेही प्रा. कुलकर्णी म्हणाल्या.

आमदार पाटील म्हणाले, पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमतातून गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम करण्यात आले आहे. यापुढेही ही पंरपरा कायम ठेवण्याकरीता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा फेस्टिव्हल जागतिक पातळीवर नेण्याचे काम करण्याची गरज आहे राज्यातही सामाजिक बांधिलकीचे संदेश देण्याकरीता याप्रमाणे उपक्रमाचे आयोजन करावे.

शमा पवार म्हणाल्या, पर्यटन विभागाच्यातीने जाहीर करण्यात आलेल्या पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने पुणे फेस्टिव्हलमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. तसेच आकृती ग्रुपच्यावतीने राज्यातील महत्वाची पर्यटन स्थळे ५० फुटी कॅनव्हासवर रेखाटण्यात आली असून त्याची नोंद जागतिक विक्रमात झाली आहे. या फेस्टिवलच्या आयोजनाकरीता पर्यटन विभागाच्यावतीने यापुढेही असेच सहकार्य करण्यात येईल.

कलमाडी यांचे स्वागतपर भाषण यावेळी वाचून दाखविण्यात आले. त्यात ते म्हणाले, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि पुण्याचे नाव देशात जावे या उद्देशाने पुणे फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली. या महोत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे कार्य केले आहे.

कार्यक्रमात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. पी.डी. पाटील यांना या वर्षीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ तसेच ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, ‘सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे देवराम गोर्डे यांना पुणे फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘जय गणेश पुरस्कार’गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांना प्रदान करण्यात आला. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त गोळाफेकपटू सचिन खिलारी यांचाही सन्मान करण्यात आला.

]]>
पुणेकरांनो, यंदाचे गणेश विसर्जन होणार दणक्यात! ढोलताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती https://maknews.live/archives/17112?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258b-%25e0%25a4%25af%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2597%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6-%25e0%25a4%25b5 Fri, 13 Sep 2024 18:11:26 +0000 https://maknews.live/?p=17112

पुणे :

ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक ढोल-ताशा-झांज पथकातील वादकांची संख्या ३० एवढीच मर्यादित ठेवण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. ढोल-ताशा हे पुण्याचे हृदय असून, पथकांना त्यांचे वादन करू द्या, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामुळे ‘एनजीटी’च्या आदेशामुळे ढोल-ताशांचा बसलेला ‘आव्वाज’ पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी ॲड. मैत्रेय घोरपडे यांनी ‘एनजीटी’त याचिका दाखल केली होती. ही याचिका ३० ऑगस्टला निकाली काढताना ‘एनजीटी’ने ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवर नियंत्रण आणले होते. विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक ढोल-ताशा-झांज पथकातील वादकांची संख्या तीसपेक्षा जास्त नसावी, या नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांनी ढोल-ताशा-झांज ही वाद्ये जप्त करावी, असे निर्देश ‘एनजीटी’ने दिले होते. त्याविरोधात पुण्यातील वंदे मातरम संघटनेच्या युवा वाद्य पथक ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. अनिश पाडेकर यांनी ॲड. अमित पै व ॲड. तेजस दंडगव्हाळ यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर दुपारी दोन वाजता या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. ‘पुण्यात ढोल-ताशा वादनाचे शंभर वर्षांहून अधिक काळापासून मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव जवळ आला असताना, ढोल-ताशा पथकांची कोणतीही बाजू ऐकून न घेता ‘एनजीटी’ने हा आदेश दिला असून, ढोल-ताशा-झांज वादन करणाऱ्या पथकांवर त्याचा गंभीर परिणाम होईल,’ अशी बाजू अॅड. अमित पै यांनी मांडली. त्यावर, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व पुणे प्रशासनाला नोटीस काढण्याचा आदेश दिला; तसेच, ढोल-ताशा-झांज पथकातील वादकांची संख्येवर मर्यादा आणणाऱ्या ‘एनजीटी’च्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. या प्रकरणी आता चार ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

वाजवायची अन् गाजवायची संधी’

‘सर्वोच्च न्यायालयाने ‘एनजीटी’च्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे ढोल-ताशा पथकांना यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजवायची अन् गाजवायची संधी मिळाली आहे. गणेशोत्सवात ढोल-ताशा वादनाची अनेक वर्षांची परंपरा असताना ‘एनजीटी’चा निकाल लागू करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयापुढे आमची बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे,’ असे ‘ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र’चे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले.

पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच एक नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार एका पथकात ४० ढोल आणि १० ताशांना परवानगी आहे. त्याची अंमलबजावणी काही वर्षांपासून होत असून, यंदा तीच नियमावली कायम असेल.

ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘एनजीटी’ने आपल्या आदेशात नऊ निर्देश दिले आहेत. त्यापैकी केवळ ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवर मर्यादा आणण्याच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. अन्य आठ निर्देशांचे पालन करावे लागेल.

ढोल-ताशा हा महाराष्ट्राचा खोलवर रुजलेला सांस्कृतिक वारसा असून, तो गणेशोत्सवाचा अविभाज्य घटक आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवात ‘एनजीटी’ने ढोल-ताशा पथके व गणेश मंडळांची बाजू न ऐकता, थेट वादकांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय दिला होता.

]]>
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना महाराष्ट्र विधानसभा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्रदान https://maknews.live/archives/17096?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258c%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae Thu, 12 Sep 2024 01:19:14 +0000 https://maknews.live/?p=17096

पुणे :

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. मुंबई येथील विधानभवनामधील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. राज्य सरकारच्या राष्ट्रकुल संसदिय मंडळाच्या वतीने 2021-22 या वर्षातील उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी शिरोळे यांची निवड करण्यात आली होती

राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील विविध प्रश्न मांडत असतांनाच राज्यातीलही अनेक विषय सभागृहात प्रभावीपणे मांडले होते. समस्या मांडत असतांनाच त्या सोडवण्यासाठीच्या सूचना करीत सभागृहात छाप पाडणार्या शिरोळे यांना उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्रदान करीत गौरवण्यात आले. सिद्धार्थ शिरोळे यांनी विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी, खडकी कॅन्टोनमेंटचा महापालिका हद्दीत समावेश, नदीतील जलपर्णी, मराठा आरक्षण, मतदार संघातील पूरग्रस्त वसाहती यांसोबतच इतर अनेक सभागृहात प्रभावी मांडणी केली.

]]>
पुणे शहरात आज संध्याकाळपासून आठवडाभर वाहतूक होणार ठप्प; ‘हे’ 14 रस्ते राहणार बंद https://maknews.live/archives/17087?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2586%25e0%25a4%259c-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a4%25aa Tue, 10 Sep 2024 18:02:20 +0000 https://maknews.live/?p=17087

पुणे :

गणेशोत्सवादरम्यान पुण्याच्या मध्यवर्ती भागात भाविक आणि पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. याचाच अंदाज घेऊन पुणे शहर पोलिसांनी 14 हून अधिक रस्ते आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून उत्सवापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे.

यावर्षी 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक भेटी देतात. उत्सवाच्या सुरुवातीच्या तीन-चार दिवसांनंतर, म्हणजेच गौरी पूजनानंतर भाविक गणेश मंडळात विशेषत: मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यासाठीच वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांनी मंगळवारी रस्ता बंद करण्याबाबत अधिसूचना जारी केली.

या आदेशात 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील 14 प्रमुख रस्ते गर्दी कमी होईपर्यंत दररोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. हे निर्बंध सरकारी वाहने आणि आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत असलेल्या वाहनांना लागू होणार नाहीत.

 *हे रस्ते बंद केले जातील:*

1) *लक्ष्मी रोड:* हमजे खान चौक ते टिळक चौक: दारूवाला ब्रिज, महाराणा प्रताप रोड, मिर्झा गालिब रोड जंक्शन मार्गे वळवणे

2) *शिवाजी रोड* : गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट; अलका चौक व कुंभारवेस चौक मार्गे वळवणे

3) *बाजीराव रोड* : पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक; केळकर रोड मार्गे वळवणे

4) *टिळक रोड:* महारत्ता चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक; बजाज पुतळा आणि पुरम चौक मार्गे वळवणे.

*अंतर्गत रस्ते जे बंद केले जातील:*

1) सिंहगड गॅरेज, घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक.

२) दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक

3) कै.अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता

४) सणस रोड गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक

5) पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी

6) गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक

7) गावकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी

8) कोहिनूर चौक ते बाबाजान चौक

९) जेधे प्रसाद रोड, सुभानशाह रोड, शास्त्री चौक

10) सुभान शाह दर्गा

]]>