पुणे जिल्हा – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Thu, 19 Sep 2024 17:04:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन – सुहास दिवसे https://maknews.live/archives/17160?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a5%25e0%25a4%25b3%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25af Thu, 19 Sep 2024 17:04:57 +0000 https://maknews.live/?p=17160

पुणे :

छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धेचे 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ६ वाजता फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे; या स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

याअनुषंगाने यूनेस्कोची समिती 27 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ल्यांना भेटी देणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित किल्ल्यांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

‘चला होऊ जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार’ मोहिमेअंतर्गत आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेला फर्ग्युसन महाविद्यालय येथे शुभारंभ होणार आहे. बीएमसीसी रस्ता- सेनापती बापट रस्ता- कुसाळकर रस्ता-दीप बंगला चौक- कॅनाल रस्ता – एफसी रस्ता मार्गे फर्ग्युसन महाविद्यालय येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘क्यूआरकोड’द्वारे ऑनलाईनपद्धतीने विनामूल्य नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

]]>
क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टीने कामे करावीत- अजित पवार https://maknews.live/archives/17127?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%2595%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be Sun, 15 Sep 2024 17:03:06 +0000 https://maknews.live/?p=17127

बारामती :

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली; क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळतील यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

पवार यांनी कन्हेरी वन विभाग, जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत, फळे व भाजी हाताळणी केंद्र, मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच क्रीडा संकुल नूतन इमारत, रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र, गरुडबाग येथील कॅनॉलचे सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे आदी उपस्थित होते.

क्रीडा संकुलात मॅट फिनिशिंग असलेल्या फरशा बसवा. भिंतीच्या रंगानुसार कक्ष, कक्षातील सोफा, शौचालय आदी बाबींचा विचार करुन इलेक्ट्रिकल उपकरणे वापरावीत. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन कामे करा.

जळोची उपबाजार येथील फळे व भाजी हाताळणी केंद्राच्या परिसरात सरळ वाढणारी, सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा. कृषी उत्पन्न बाजार समिती नुतन इमारतीच्या परिसरातील रस्त्याचा विचार करुन पुरेशा उंचीच्या संरक्षक भिंती उभाराव्यात. परिसरात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करावी.

कन्हेरी वनविभागात विविध प्रजातींचे वृक्षारोपण करा. यापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन झाले पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. परिसरात फिरतांना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाच्या फांद्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच गरुडबाग येथील कॅनॉलचे सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क येथील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम करतांना समोरील मुख्य रस्त्यापेक्षा उंच जोत्याचे बांधकाम करावे.

परिसरातील विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्या. कोणतीही कामं प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार आदी उपस्थित होते.

]]>
पुणे-कोल्हापूर, पुणे-हुबळी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू https://maknews.live/archives/17124?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2581%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25b3 Sun, 15 Sep 2024 16:58:58 +0000 https://maknews.live/?p=17124

पुणे :

मध्य रेल्वे कडून पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही गाड्या आठवड्यातून तीन दिवस असणार आहेत.

*पुणे-कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)*

गाडी क्रमांक 20674 पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) 18 सप्टेंबर पासून प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पुण्याहून दुपारी 02.15 वाजता निघेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 07.40 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक 20673 कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) 19 सप्टेंबर पासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी कोल्हापूरहून सकाळी 08.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पुण्यात दुपारी 01.30 वाजता पोहोचेल

ही गाडी सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज या स्थानकावर थांबेल. आठ डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस असेल.

*पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)*

गाडी क्रमांक 20670 पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस (त्रि-साप्ताहिक) 19 सप्टेंबर पासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी दुपारी 02.15 वाजता पुण्याहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री 10.45 वाजता हुबळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक 20669 हुबळी – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (त्रि-साप्ताहिक) 18 सप्टेंबर पासून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे 05.00 वाजता हुबळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी पुण्याला दुपारी 01.30 वाजता पोहोचेल.

ही गाडी सातारा, सांगली, मिरज, बेळगावी आणि धारवाड या स्थानकावर थांबेल. आठ डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस असेल.

]]>
पुण्यात आत्तापर्यंत 5 जणांचा झिकामुळे मृत्यू https://maknews.live/archives/17118?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4-5-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be Sat, 14 Sep 2024 17:25:39 +0000 https://maknews.live/?p=17118

पुणे :

शहरात झिकाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून,एकूण रुग्णांची संख्या आता शंभरवर पोहोचली आहे. रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक असून, शहरात आतापर्यंत झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झिकाचे सर्वाधिक 20 रुग्ण आहेत. त्या खालोखाल एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयात 16 रुग्ण आहेत. खराडी 13, घोले रस्ता व पाषाण प्रत्येकी 9, सुखसागरनगर व मुंढवा प्रत्येकी 7, वानवडी 5, कळस 4, कोरेगाव पार्क व आंबेगाव बुद्रुक प्रत्येकी 3, लोहगाव 2, विश्रामबागवाडा आणि धनकवडी प्रत्येकी 1 अशी रुग्णसंख्या आहे. शहरातील एकूण 100 रुग्णांपैकी 45 गर्भवती आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.

शहरात झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात खराडीतील 72 वर्षीय पुरुष, पाषाणमधील 95 वर्षीय स्त्री, बाणेरमधील 78 वर्षीय पुरुष, कोथरूडमधील 68 वर्षीय पुरुष आणि कर्वेनगरमधील 76 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व जण ज्येष्ठ नागरिक असून, त्यांना सहव्याधी होत्या.

शहरातील झिकाचा प्रादुर्भाव

एकूण रुग्णसंख्या – 100

गर्भवती रुग्ण – 45

]]>
मायक्रोसॉफ्ट कंपनी हिंजवडीत करणार 519 कोटींची गुंतवणूक https://maknews.live/archives/17099?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2589%25e0%25a4%25ab%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f-%25e0%25a4%2595%25e0%25a4%2582%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b5 Thu, 12 Sep 2024 17:15:20 +0000 https://maknews.live/?p=17099

पुणे :

सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने आयटी हब असलेल्या हिंजवडीत 519.72 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे भविष्यात मायक्रोसॉफ्ट कडून हिंजवडी मध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत.

मायक्रोसॉफ्टची भारतीय शाखा, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे 66 हजार 414.5 चौरस मीटर (16.4 एकर) जमीन खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यात ही खरेदी झाली असून या व्यवहारात इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपी कडून जमीन खरेदी केली गेली आहे.

सन 2022 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने पिंपरी चिंचवड शहरात 25 एकर भूखंड खरेदी केला. मायक्रोसॉफ्टकडून पिंपरी चिंचवड शहरात डेटा सेंटर सुरू केले जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. पिंपरी चिंचवड पाठोपाठ मायक्रोसॉफ्ट ने हैदराबाद मध्ये देखील 48 एकर जमीन खरेदी केली. पिंपरी चिंचवड शहरासह मुंबई आणि चेन्नई येथे देखील कंपनीकडून डेटा सेंटर तयार केले जातील.

मायक्रोसॉफ्टच्या बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या पाच शहरांमध्ये असलेल्या कार्यालयांमध्ये सुमारे 23 हजार कर्मचारी काम करत आहेत. मायक्रोसॉफ्टने सन 2024 च्या सुरुवातीला एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये सन 2025 पर्यंत 20 लाख लोकांना एआय आणि डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज केले जाणार आहे. ‘स्किल्स फॉर जॉब्स’ या उपक्रमांतर्गत कंपनीकडून कौशल्याधारित मनुष्यबळ विकसित केले जाणार आहे.

]]>
समृद्धी महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://maknews.live/archives/17074?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2583%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%2597-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25bf Mon, 09 Sep 2024 16:28:53 +0000 https://maknews.live/?p=17074

पुणे :

समृद्धी महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडला जाणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडला जाणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे – शिरूर – अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. केसनंद गावातून या मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे.

केसनंद गावातून सुरू होणारा हा उड्डाण मार्ग 53 किलोमीटरचा असेल. हा मार्ग शिरूरपर्यंत जाईल. तिथून पुढे अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. त्यासाठी आणखी 2 हजार 50 कोटी रुपये खर्च येणार असून एकूण खर्च 9 हजार 565 रुपये इतका येणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर इतकी असेल.

]]>
लोकशाही दिनामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करा; विभागीय आयुक्तांचे निर्देश https://maknews.live/archives/17071?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2582%25e0%25a4%259a%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a Mon, 09 Sep 2024 16:25:38 +0000 https://maknews.live/?p=17071

पुणे :

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक व्हावी या हेतूने विविध पातळीवर लोकशाही दिन आयोजित करण्यात येऊन नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यात येतात. विभागीय लोकशाही दिनामधे दाखल प्रकरणांवर सुनावणी घेऊन दिलेल्या आदेशाचे प्रशासनाने काटेकोरपणे व त्वरित पालन करुन तक्रारी तातडीने सोडवाव्या अन्यथा त्याची गंभीर दखल घेण्यात येईल असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात विभागीय स्तरावरील लोकशाही दिनातील प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, नगर पालिका प्रशासन उपायुक्त पूनम मेहता, करमणूक कर उपायुक्त निलीमा धायगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक मुख्य अभियंता आर. वाय. पाटील यावेळी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या तीन प्रकरणांवर यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. अर्जदारांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या समस्यांसाठी नागरिकांना विभागीय लोकशाही दिनात यावे लागते हे योग्य नसून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि संबधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या तक्रारी सोडवाव्यात, असे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

]]>
पुण्यातून सुटणाऱ्या एक्स्प्रेसबाबत महत्त्वाचा निर्णय; पुणेकरांच्या मागणीची दखल ! https://maknews.live/archives/17026?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%259f%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%258f%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b8 Tue, 03 Sep 2024 16:58:39 +0000 https://maknews.live/?p=17026

पुणे :

पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजहून थेट बिकानेरला जाता येणार आहे. पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आलाय. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर येथील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी याबाबत माहिती दिली.

रेल्वेकडून बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस मिरजपर्यंत सुरू केली होती. मात्र ही गाडी मिरजेतून पुण्यापर्यंत बिकानेरपर्यंत वेगवेगळ्या क्रमांकानं धावत होती. त्यामुळे वेगवेगळे तिकीट काढावे लागत होते. म्हणूनच ही गाडी एकाच क्रमांकानं सोडण्याची मागणी पुण्यातून मोठ्या प्रमाणात झाली. पुणेकरांनी रेल्वे समितीच्या बैठकीतदेखील यावर आपलं म्हणणं मांडलं होतं. अखेर या मागणीची दखल रेल्वेनं घेतली आहे.

आता 20475 आणि 20476 या क्रमांकाची गाडी मिरज-बिकानेर एक्स्प्रेस म्हणून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक्स्प्रेस बिकानेरहून सोमवारी सकाळी साडेसहा वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी पावणे 2 वाजता मिरजला पोहोचेल. त्यानंतर मिरजहून दुपारी सव्वा 2 वाजता निघून एक्स्प्रेस बिकानेरला बुधवारी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.

या एक्स्प्रेसला कराडसह सातारा, लोणंद थांबादेखील देण्यात आला आहे. मंगळवारी लोणंदला सकाळी साडेनऊ, तर साताऱ्यात 10 वाजून 42 मिनिटांनी आणि कराडला 11 वाजून 50 मिनिटांनी गाडी पोहोचेल. त्यानंतर हीच गाडी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी मिरजेतून सुटेल, कराडला 3 वाजून 30 मिनिटांनी, साताऱ्याला 4 वाजून 30 मिनिटांनी, लोणंदला 5 वाजून 40 मिनिटांनी, पुण्याला रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी, कल्याणला 10 वाजून 10 मिनिटांनी, भिवंडीला रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी, सुरतला पहाटे 3 वाजून 23 मिनिटांनी, वडोदराला 5 वाजून 15 मिनिटांनी, अहमदाबादला सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी, अबू रोडला सकाळी साडेअकरा वाजता, पाळणा इथं 12 वाजून 25 मिनिटांनी, मारवाड जंक्शनला दुपारी 2 वाजता, जोधपूरला 3 वाजून 40 मिनिटांनी, मेडतारा रोडला साडेपाच वाजता आणि बिकानेरला रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची या एक्सप्रेसमुळे मोठी सोय होईल.

]]>
सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर जेजुरी परिसरातील वाहतुकीत बदल https://maknews.live/archives/17003?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258b%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b6%25e0%25a5%258d Thu, 29 Aug 2024 17:34:58 +0000 https://maknews.live/?p=17003

जेजुरी :

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सोमवारी (दि. 2 सप्टेंबर) श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुणे जेजुरी-बारामती महामार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणे अशी वळविण्यात येत आहे. जेजुरी बेलसर फाटा मार्गावर पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव मार्गे बारामती, फलटण व साताराकडे जातील.

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

सासवड पोलीस ठाण्याअंतर्गत पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परिंचे-वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध 2 सप्टेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शिथील राहतील.

]]>
उद्योगांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे https://maknews.live/archives/16978?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2589%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%258b%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2596%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af Thu, 22 Aug 2024 18:06:14 +0000 https://maknews.live/?p=16978

पुणे :

पुणे जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या मोठी असून या उद्योगांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेत मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासह नोकरी इच्छुक युवांना रोजगार देण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. यंत्रणांनी उद्योगांच्या पाणी, वीज, रस्ते, वाहतूक कोंडी आदी समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग अधिकारी वर्षा सोने, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदींसह विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, पुणे जिल्हा हा मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झालेला जिल्हा आहे. उद्योगवाढीसाठी मुबलक पाणी, चांगले रस्ते, कामगारांना कामाच्या ठिकाणी येण्यासाठी कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा आदी बाबी आवश्यक असतात. त्यादृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, पीएमपीएमएल, वाहतूक पोलीस, जिल्हा उद्योग केंद्र आदींनी समन्वयाने याबाबत काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

तत्पूर्वी सचिन जाधव यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवांना रोजगार तसेच उद्योगांना मनुष्यबळ उपलब्ध करुन घेता येईल. या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार असल्याने उद्योगांना त्यावर अधिकचा खर्च करण्याची गरज राहणार नाही, असे ते म्हणाले.

जिल्हा उद्योग पुरस्कार 2022 अंतर्गत प्रथम पुरस्कार प्राप्त पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीसचे प्रसाद कामठे आणि द्वितीय पुरस्कार घोषित झालेल्या एफिसिएन्ट इंजिनिअरिंगच्या शालिनी सौंदाडे यांना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या हस्ते पुरस्काराचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

]]>