देश विदेश – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Wed, 18 Sep 2024 17:50:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 वन नेशन-वन इलेक्शन’ प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजूरी https://maknews.live/archives/17154?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d Wed, 18 Sep 2024 17:50:08 +0000 https://maknews.live/?p=17154

दिल्ली :

वन नेशन-वन इलेक्शन’ या प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव संसदेत मांडण्यात येणार आहे. कोविंद समितीने याबाबत अहवाल दिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने मार्चमध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या शक्यतांबाबत अहवाल सादर केला होता. या अहवालात दिलेल्या सूचनांनुसार, पहिला टप्पा म्हणून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. या समितीने लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यापासून 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घ्याव्यात, अशी शिफारस केली आहे. याद्वारे संपूर्ण देशात सर्व स्तरावरील निवडणुका निश्चित कालावधीत घेता येतील. सध्या राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक दिवसांपासून वन नेशन वन इलेक्शनचे समर्थन करत आहेत. पीएम मोदी म्हणाले होते, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक हा संकल्प साध्य करण्यासाठी मी सर्वांना एकत्र येण्याची विनंती करतो, ही काळाची गरज आहे.’ सरकारच्या संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात निवडणुका होऊ नयेत. ते म्हणाले होते, ‘मी नेहमी म्हणतो की निवडणुका तीन-चार महिन्यांवरच घ्याव्यात. पूर्ण 5 वर्षे राजकारण होता कामा नये. त्यामुळे निवडणुकांच्या व्यवस्थापनावर होणारा खर्च कमी होईल.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने 62 राजकीय पक्षांशी संपर्क साधला होता. त्यापैकी 32 जणांनी एक देश, एक निवडणुकीला पाठिंबा दिला होता. तर 15 पक्ष विरोधात होते.

]]>
ऑटोमोबाइल क्षेत्रात भारत जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे- नितीन गडकरी https://maknews.live/archives/17140?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2591%25e0%25a4%259f%25e0%25a5%258b%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%2587%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4 Mon, 16 Sep 2024 16:51:58 +0000 https://maknews.live/?p=17140

पुणे :

देशातील ऑटोमोबाइल क्षेत्राची अर्थव्यवस्था यापूर्वी सात लाख कोटींच्या घरात होती. त्यावेळी भारताचा क्रमांक सातवा होता. आता भारत जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे ‘सीओईपी अभिमान पुरस्कारां’चे वितरण गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, नियामक मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, मानद सचिव डॉ. सुजित परदेशी, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते उपस्थित होते.

यंदा ‘सीओईपीजीवनगौरव पुरस्कार’ अहमदाबाद येथील ज्येष्ठ उद्योजक पी. एन. भगवती यांना देण्यात आला, भगवती यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील ‘जे. पी. मॉर्गन चेस’च्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया, अमेरिकेतील ‘टेस्ला मोटर्स’चे वरिष्ठ संचालक हृषिकेश सागर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांना सीओईपी अभिमान पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.

जगात ऑटोमोबाइल क्षेत्रात अमेरिका , चीन,) आणि भारत ,येथील अर्थव्यवस्था अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहे. आपल्या देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) रूपाने देशाला आणि राज्याला सर्वाधिक कर प्राप्त करून देणारे हे क्षेत्र आहे. या क्षेत्राने साडेचार कोटी नागरिकांना रोजगार दिला आहे. येत्या पाच वर्षांत या क्षेत्राचा विस्तार दुप्पट होऊन अर्थव्यवस्था 55 लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट उद्योजकांना दिले आहे. लवकरच ऑटोमोबाइल क्षेत्रात आपण अमेरिकेलाही मागे टाकू,” असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

]]>
मायक्रोसॉफ्ट कंपनी हिंजवडीत करणार 519 कोटींची गुंतवणूक https://maknews.live/archives/17099?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2589%25e0%25a4%25ab%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f-%25e0%25a4%2595%25e0%25a4%2582%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b5 Thu, 12 Sep 2024 17:15:20 +0000 https://maknews.live/?p=17099

पुणे :

सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने आयटी हब असलेल्या हिंजवडीत 519.72 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे भविष्यात मायक्रोसॉफ्ट कडून हिंजवडी मध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत.

मायक्रोसॉफ्टची भारतीय शाखा, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे 66 हजार 414.5 चौरस मीटर (16.4 एकर) जमीन खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यात ही खरेदी झाली असून या व्यवहारात इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपी कडून जमीन खरेदी केली गेली आहे.

सन 2022 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने पिंपरी चिंचवड शहरात 25 एकर भूखंड खरेदी केला. मायक्रोसॉफ्टकडून पिंपरी चिंचवड शहरात डेटा सेंटर सुरू केले जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. पिंपरी चिंचवड पाठोपाठ मायक्रोसॉफ्ट ने हैदराबाद मध्ये देखील 48 एकर जमीन खरेदी केली. पिंपरी चिंचवड शहरासह मुंबई आणि चेन्नई येथे देखील कंपनीकडून डेटा सेंटर तयार केले जातील.

मायक्रोसॉफ्टच्या बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या पाच शहरांमध्ये असलेल्या कार्यालयांमध्ये सुमारे 23 हजार कर्मचारी काम करत आहेत. मायक्रोसॉफ्टने सन 2024 च्या सुरुवातीला एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये सन 2025 पर्यंत 20 लाख लोकांना एआय आणि डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज केले जाणार आहे. ‘स्किल्स फॉर जॉब्स’ या उपक्रमांतर्गत कंपनीकडून कौशल्याधारित मनुष्यबळ विकसित केले जाणार आहे.

]]>
भाजपने घेतली आघाडी; विधानसभेसाठी 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर https://maknews.live/archives/17035?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2598%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2586%25e0%25a4%2598%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8 Wed, 04 Sep 2024 17:05:34 +0000 https://maknews.live/?p=17035

हरियाणा :

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून हरियाणा विधानसभेसाठी भाजपची 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांकडून तेथील उमेदवारांची नावे घोषित केली जात आहेत. भाजपने आज हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी 67 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या मतदारसंघात भाजपने बदल केला आहे. यंदा ते लाडवा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानातून निवडणूक लढवत आहेत, सध्या ते करनाल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान, हरियाणाचे माजी गृहमंत्री अनिल वीज यांना अंबाला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या केंद्रीय समितीकडून हरियाणतील विधानसभेच्या 90 जागांपैकी 67 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीच्या हालचाली सुरू आहेत. हरियाणात आपने लोकसभेची एक जागा लढली होती, एका लोकसभा क्षेत्रात 9 विधानसभेच्या जागा येतात, त्या अनुषंगाने आपने 10 जागांची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेस फक्त 7 जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस हरियाणात आपसोबत युती करण्यासाठी एवढा आटापीटा का करीत आहे? याचे कारण फक्त भाजप असल्याचे दिसून येते.

*पहिल्या यादीत जाहीर झालेले उमेदवार*

कालका – शक्ति रानी शर्मा

पंचकूला – ज्ञान चंद गुप्ता

अंबाला शहर – असील गोयल

मुलाना – संतोष सरवन

सढौरा – बलवंत सिंह

जगाधरी – कंवर पाल गुर्जर

यमुनानगर – धनश्याम दास अरोड़ा

रादौर – श्याम सिंह राणा

शाहबाद – सुभाष कलसाना

थानेसर – सुभाष सुधा

पेहोवा – सरदार कमलजीत सिंह अजराना

गुहला – कुलवंत बाजीगर

कलायत – कमलेश ढांडा

कैथल – लीला राम गुर्जर

नीलोखेड़ी – भगवान दास कबीरपंथी

]]>
संकटग्रस्त बालकांसाठी 1098 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत https://maknews.live/archives/16990?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%2595%25e0%25a4%259f%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-1098-%25e0%25a4%25b9 Fri, 23 Aug 2024 17:49:48 +0000 https://maknews.live/?p=16990

दिल्ली :

कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीकरिता चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे.

भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24×7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकते किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात.

1098 या टोल फ्री क्रमांकावरवर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

]]>
भारतातील सर्व विमानतळे, सीमांवर ‘मंकीपॉक्स अलर्ट’; ‘या’ देशातून येणाऱ्या प्रवाशांवर राहणार विशेष लक्ष https://maknews.live/archives/16954?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8 Wed, 21 Aug 2024 17:58:41 +0000 https://maknews.live/?p=16954

दिल्ली :

आफ्रिका खंडातून मंकीपॉक्स या आजाराने सीमा ओलांडल्या आहेत. पाकिस्तानात मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेसह देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांवर मंकीपॉक्स अलर्ट जारी केला आहे.

जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

मंकीपॉक्स साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य पथकाला सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास त्याच्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

मंकीपॉक्स आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांत हा विषाणू आढळत असून हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्यापडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

मंकीपॉक्स हा प्रामुख्याने थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यामार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे होणाऱ्या संसर्गाद्वारे होवू शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीतील राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि लेडी हार्डिंज या तीन मोठ्या केंद्रीय रुग्णालयांमध्ये नोडल केंद्र तयार केली आहेत. मंकीपॉक्सच्या रुग्णांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. सध्या भारतात कोणालाही मंकीपॉक्सची लागण झालेली नाही.

दरम्यान कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लस बनवणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीने मंकीपॉक्सवर लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांनी ‘आम्ही ही लस एका वर्षात तयार करू’ अशी माहिती दिली आहे.

]]>
मंकीपॉक्स आजाराला घाबरू नका, सतर्क रहा https://maknews.live/archives/16948?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582%25e0%25a4%2595%25e0%25a5%2580%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2589%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%2586%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2598%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2582 Tue, 20 Aug 2024 18:01:26 +0000 https://maknews.live/?p=16948

दिल्ली :

जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

मंकीपॉक्स साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य पथकाला सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास त्याच्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

*मंकीपॉक्स आजार काय आहे?*

मंकीपॉक्स आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांत हा विषाणू आढळत असून हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्यापडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

मंकीपॉक्स हा प्रामुख्याने थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यामार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे होणाऱ्या संसर्गाद्वारे होवू शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

*संशयित रुग्णाची लक्षणे*

मंकीपॉकस् रुग्णाला मागील 3 आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करुन राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे, सुजलेल्या लसीका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा, घसा खवखवणे आणि खोकला अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात.

*आजारापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी*

संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुण पांघरुणाशी संपर्क येऊ देऊ नये. हातांची स्वच्छता ठेवावी. आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करावा. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

*खबरदारीच्या उपाययोजना*

मंकीपॉक्स या आजाराविषयी प्रशासनाच्यावतीने सर्वप्रकारची काळजी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. यानुसार आरोग्य सेवा आयुक्त रंगा नायक यांनी विभाग प्रमुखांसोबत बैठक घेवून सर्व क्षेत्रीय आरोग्य उपसंचालक, आरोग्य अधिकारी, महापालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी देखील सतर्कता बाळगल्यास या आजाराच्या संसर्गापासून दूर राहता येईल.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त, आरोग्य सेवा तथा व्यवस्थापकीय संचालक रंगा नायक म्हणाले, “मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क राहावे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या आजाराबाबत संशयित रुग्ण आढळल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.”

]]>
१७ ऑगस्ट रोजी गरुडझेप मोहिमेची आग्रा येथून होणार सुरुवात… https://maknews.live/archives/16911?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a5%25a7%25e0%25a5%25ad-%25e0%25a4%2591%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a1%25e0%25a4%259d%25e0%25a5%2587%25e0%25a4%25aa-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b9 Fri, 16 Aug 2024 12:09:34 +0000 https://maknews.live/?p=16911

पुणे  :

१७ ऑगस्ट १६६६ शिवचातुर्य दिनाला 357 वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्त सालाबाद प्रमाणे आग्रा ते राजगड : १२५३ किमी पायी मोहीमेचे आयोजन १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२४ पर्यंत ही गरुड झेप मोहीम पूर्ण करण्यास येणार आहे. मोहिमेचे हे पर्व पाचवे असून १७ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सुरुवात होणार असल्याचे गरुड झेप मोहीम अध्यक्ष राकेश विधाते यांनी सांगितले.

रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आग्रा भेट आणि आग्राहून क्रूर-अत्याचारी औरंगजेबाच्या तब्बल ९९ दिवसांच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुडझेप! त्यामुळे गेले सलग चार वर्ष ही मोहीम राबवली जात आहे.

राजांच्या या पराक्रमाला अभिवादन, या देदीप्यमान इतिहासाचे स्मरण आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहोचवण्यासाठी हातात धगधगती शिवज्योत घेऊन शेकडो मावळे आग्रा ते राजगड हे १२५३ किमी. अंतर १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट, २०२४ या 13 दिवसांत धावत पूर्ण करणार आहेत.

या गरुडझेपः मोहिमेचे हे ५ वे पर्व आहे. धावणारे १५०० मावळे या मोहिमेत सामील होणार आहेत. शिवाय, मुक्कामांच्या ठिकाणी लाठीकाठीसारखे मर्दानी खेळ व प्रसिद्ध शिवव्याख्यात्यांची व्याख्याने हे या मोहिमेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असणार आहे. आग्रा ते राजगड या मार्गावर हरितपट्टा तयार करण्यासाठी वृक्षांच्या 1.5 लाख बिया धावण्याच्या वाटेवर टाकत मावळे येणार आहेत. बीपी_डायबेटिस_मुक्त_भारत हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे गरुड झेप मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष मारुती गोळे यांनी सांगितले.

]]>
भारताचे बर्लिन जर्मनीतील राजदूत पी हरीश यांचे हस्ते झेंडावंदन… https://maknews.live/archives/16904?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2 Fri, 16 Aug 2024 08:02:52 +0000 https://maknews.live/?p=16904

जर्मनी :

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.30 मिनीटानी भारताचे बर्लिन, जर्मनीतील भारताचे राजदूत पी हरीष यांच्या हस्ते बर्लिन मधील भारतीय दूतावासाच्या कार्यालयीन इमारतीत ,भारतीयांच्या ऊपस्थितीत ऊस्साहाने संपन्न झाला. झेंडावंदना नंतर लगेचच राजदूत हरीष यानी आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांचे लिखीत भाषण इंग्रजी व हिंदी मधे वाचुन दाखविले.

राजदूत सांगत असताना महत्वाच्या मूध्यावर भारतीयानी केलेली प्रगती ऊल्लेख केला. गुलामगिरीतून मुक्त होत असतानाच स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून हे स्वातंत्र्य आहे हे विसरून चालणार नाही. याची आठवण करून दिली. महात्मा गांधी, भगतसिंग, सरदार पटेल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, बेरजा मुंढा यानी देशाकरता केलेल्या कार्याचा ऊल्लेख केला. महान लोकशाही, कल्याण योजना निवडणूक ऊत्तम प्रक्रियेचा ऊल्लेख कैला.

भाषण नंतर बर्लिन मधील भारतीयांनी गांण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात देशभक्तीपर गीत गायले गेले. मेरी देशकी धरती सोना ऊगले ह्या ऊपकार मधील गीतानी सांगता केली. कार्यक्रम नंतर सर्व भारतीय एकमेकांना शुभेच्छा देत अल्पोपाहारानी कार्यक्रम संपला.

राजदूत पी हरीष यांच्या भेटीची वेळ अडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औन्ध पुणे .महाराष्ट्र भारत . घेतल्यामुळे सविस्तर चर्चा झाली. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान च्या कार्यास भारतीय दूतावासाची मदत असेल असे श्रीकांत पाटील याना सागितले.

]]>
महामार्गांवरील अतिक्रमणे काढून घ्या; भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे आवाहन https://maknews.live/archives/16839?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a3 Sat, 10 Aug 2024 00:35:25 +0000 https://maknews.live/?p=16839

पुणे :

पुणे- सोलापूर, पुणे- नाशिक, खेड (राजगुरुनगर) ते सिन्नर (नाशिक), पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम तीन दिवसाच्या आत काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.

प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर क्रमांक 65 वरील हडपसर ते हिंगणगाव (इंदापूर) पुणे नाशिक क्रमांक 60 वरील नाशिक फाटा ते चांडोली तसेच खेड (राजगुरुनगर) ते सिन्नर (नाशिक) क्रमांक 548 डी वरील तळेगाव-चाकण-शिकापूर, पुणे सातारा क्रमांक 48 वरील देहूरोड (पुणे) ते शेंद्रे (सातारा) व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 वरील हडपसर ते दिवेघाट हद्दीत मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. अतिक्रमण काढण्याबाबत प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलेले नाही.

त्यामुळे या हद्दीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूस केलेली अनधिकृत अतिक्रमणे, बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम 2002 अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल, असेही कदम यांनी सांगितले

]]>