औंध -शिवाजीनगर – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Thu, 12 Sep 2024 01:19:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना महाराष्ट्र विधानसभा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्रदान https://maknews.live/archives/17096?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258c%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae Thu, 12 Sep 2024 01:19:14 +0000 https://maknews.live/?p=17096

पुणे :

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. मुंबई येथील विधानभवनामधील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. राज्य सरकारच्या राष्ट्रकुल संसदिय मंडळाच्या वतीने 2021-22 या वर्षातील उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी शिरोळे यांची निवड करण्यात आली होती

राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील विविध प्रश्न मांडत असतांनाच राज्यातीलही अनेक विषय सभागृहात प्रभावीपणे मांडले होते. समस्या मांडत असतांनाच त्या सोडवण्यासाठीच्या सूचना करीत सभागृहात छाप पाडणार्या शिरोळे यांना उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्रदान करीत गौरवण्यात आले. सिद्धार्थ शिरोळे यांनी विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी, खडकी कॅन्टोनमेंटचा महापालिका हद्दीत समावेश, नदीतील जलपर्णी, मराठा आरक्षण, मतदार संघातील पूरग्रस्त वसाहती यांसोबतच इतर अनेक सभागृहात प्रभावी मांडणी केली.

]]>
म्हाळुंगे बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीत बदल… https://maknews.live/archives/16921?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%259b%25e0%25a4%25a4 Fri, 16 Aug 2024 16:40:06 +0000 https://maknews.live/?p=16921

पुणे :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शनिवारी (दि. 17) राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-बेंगलोर महामार्गावर जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच औंध, बाणेर, बालेवाडी, चांदणी चौक परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि अति महत्वाच्या व्यक्ती तसेच खासगी वाहने व सुमारे 900 बस मधून मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमाला येणार आहेत. मुंबई-बेंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत जड-अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई-बेंगलोर महामार्गावरून चांदणी चौक ते उर्से टोल नका दरम्यान येण्यास-जाण्यास जड अवजड वाहनांना बंदी असेल.चाकण येथून पिंपरी-चिंचवड मार्गे बेंगलोर महामार्गावरून येणाऱ्या जड-अवजड वाहनांना बंदी असेल.

पुण्याकडून मुंबईकडे मुंबई-बेंगलोर महामार्गावरून येणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.

तळेगाव, देहूरोड मार्गे मुंबई बेंगलोर महामार्गावर येण्यास जड-अवजड वाहनांना बंदी असेल. यातून अत्यावश्यक सेवेतील वाहने व कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश असेल.

*पुणे पोलिसांनी बाणेर रोडवरील वाहतूक वळवली*

विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळण घेऊन किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.

मुंबई-बेंगलोर बायपास वरून बाणेर रोडवर जाणाऱ्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळून हायस्ट्रीट मार्गे गणराज चौकातून जावे.

पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोड मार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौक मार्गे जावे. किंवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोडमार्गे जावे.

पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक-पाषाण रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक-बाणेर रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल-औंध रोडवर शनिवारी पहाटे बारा ते मध्यरात्री बारा पर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.

]]>
इंदिरा वसाहत येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा… https://maknews.live/archives/16907?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2587%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a4%2582 Fri, 16 Aug 2024 08:14:38 +0000 https://maknews.live/?p=16907

औंध :

इंदिरा वसाहत येथे स्वातंत्र्य दिन निमित्त  उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शांताई प्रतिष्ठान व संविधान अभ्यास गटाच्यावतीने इंदिरा वसाहत येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

साण्विका गायकवाड या छोट्या मुलीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ रणदिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आकाश खवले, रवी गायकवाड, विनायक सोनवणे, राजु खवले, प्रभाकर वाघमारे, दत्ता रणदिवे, अवी वाघमारे आदी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

]]>
माजी नगरसेवक शिवाजी बांगर यांचे निधन… https://maknews.live/archives/16760?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%2595-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597 Wed, 31 Jul 2024 18:12:28 +0000 https://maknews.live/?p=16760

बाणेर :

बाणेर औंध येथील माजी नगरसेवक शिवाजी महादेव बांगर यांचे प्रदीर्घ आजाराने ३१ जुलै रोजी निधन झाले . ते काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष म्हणून देखील पक्षात काम करत होते . बाणेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणून तसेच पुणे महानगरपालिकेच्या विधी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे. बाणेर औंध परिसरातील विविध सामाजिक, राजकीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्यावरती बाणेर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आला. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अविनाश बागवे, बाबुराव चांदेरे, कैलास गायकवाड, दिलीप मुरकुटे आदी उपस्थित होते.

]]>
जर्मनीत औध येथील स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे महान कार्य https://maknews.live/archives/16734?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2594%25e0%25a4%25a7-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8 Sun, 28 Jul 2024 05:44:03 +0000 https://maknews.live/?p=16734

औंध / जर्मनी :

स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंँध पुणे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.श्रीकांत पाटील यांचा जर्मनी दौरा चालू असून भारतीय संस्कृती रुजावी त्यात वाढ व्हावी जर्मनीत भारतीय संस्कृती विस्तार व्हावा या विचाराने अँड, श्रीकांत पाटील जर्मनीत आहेत.

औध मधील स्वामी समर्थ प्रतिष्ठान या वर्षीपासून २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्त भारतीय संस्कृती प्रचार व प्रसार परदेशात जाऊन केला जात आहे. जर्मनीतील क्रिचहेम येथील ही संस्था पुर्ण परदेशी लोकांची आहे. विठ्ठलधाम संस्थेचे नाव असून परमहंस विश्वानंदजी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कार्य चालते. येथे सुंदर आकर्षक विट्ठलाचे मंदिर आहे.या संस्थेला हिंदू
संस्कृती आणि विचार फार आवडतात व त्याच विचाराने संस्था प्रभावित असून युरोप मधील नावाजलेली संस्था आहे.

या संस्थेत ॲड.श्रीकांत पाटील यांचा भारतीय संस्कृती आणि अध्यात्म ह्या विषयावर व्याख्यान झाले. भारतीय तत्वज्ञान आणि विचार सरणी धर्मग्रंथ आणि ऋषीमुनीच्या दिव्य तपश्चर्येचा अंतरज्ञानाने निर्माण झाली आहे .या संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट है आहे कि हिंदु विचार मानवाला ऊत्नती कड़े घेऊन जातात. ही हिंदू संस्कृती सर्व धर्मांचा आदर करते. सर्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करून “जगा आणि जगु द्या” ही संकल्पना मांडते. जगातली सर्वात प्राचीन हिंदू विचार पध्दती आहे. इतर ४८ संस्कृती काळा नुसार लोप पावल्या परंतु हिंदू संस्कृती आजही टिकुन आहे.

याचे कारण मानवाला मिळणारे समाधान आणि आनंद
या विचारातून मिळते हे सिद्ध झाले आहे.आम्ही फक्त हिंदू संस्कृतीत काय चांगले विचार आहेत जे अवलंबण्या सारखे आहेत. याचा प्रचार करत आहोत आम्ही कोणालाही हे नाही सांगत कि आमच्या धर्माचा स्वीकार करा. हिंदू धर्म हा संतांच्या मार्गावर चालणारा आहे.विठ्ठल धाम या संस्थेचे हिन्दु विचार सरणीवर काम ऊत्तम पध्दतीने चालु ठेवले असून जगा पुढे एक आदर्श ठेवला आहे.

 

]]>
पूरग्रस्तांना मनसे कार्यकर्त्यांची मदत… https://maknews.live/archives/16731?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af Sat, 27 Jul 2024 11:14:06 +0000 https://maknews.live/?p=16731

औंध :

पुणे शहरामध्ये गेली दोन दिवस झालेल्या अति मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.असून छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील चंद्रमणी संघ औंध रोड,आदर्श नगर बोपोडी,पडळ वस्ती,पाटील इस्टेट शिवाजीनगर या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले असता. प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन स्थानिक नागरिकांना धीर दिला.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व पुढील उपाययोजनांसाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सर्व पूर परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या सोबत आहे. कोणत्याही प्रकारची अडचण व मदतीसाठी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा ही विनंती.घटनास्थळी पाहणी वेळी विभाग अध्यक्ष विनायक कोतकर, स्थानिक शाखाध्यक्ष मयूर बोलाडे, गोकुळ अडागळे, आकाश धेंडे, अंथोनी आढाव, आकाश धोत्रे आदी उपस्थित होते.

औंध रोड येथील चंद्रमणी संघ या वसाहती मध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती,या परिस्थितीमध्ये स्थानिक नागरिक मोझेस अडसूळ, राजनंदिनी खंडागळे, अशोक उबाळे या नागरिकांचे पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. या परिस्थितीचा आढावा मनसे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे, जितेंद्र कांबळे, सिद्धांत अडसूळ, समिर शेळके यांनी केला. यावेळी स्थानिक सर्व आढावा घेऊन नागरिकांना मदतीचे आव्हान करण्यात आले.

या वेळी वसहितीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व विद्युत पुरवठ्याबाबत बऱ्याच तक्रार करत होते. महावितरण बोपोडी शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली, व लवकरात लवकर खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर सुरळीत करण्यात येण्याची मागणी करण्यात आली, व आरोग्य संबंधित उपाययोजना व पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे काम मनसे पदाधिकाऱ्यांनी केली.

]]>
सचिन मानवतकर सोशल फाउंडेशन च्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार… https://maknews.live/archives/16597?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a4%259a%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25ab%25e0%25a4%25be%25e0%25a4%2589%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2587 Mon, 08 Jul 2024 16:59:20 +0000 https://maknews.live/?p=16597

औंध :

सचिन मानवतकर सोशल फाउंडेशन आयोजित १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात उत्साहात पार पडला. खरं तर हे विद्यार्थि आयुष्याच्या आशा टप्यावर उभे आहेत, जिथे त्याना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शन तर गरजेचे आहेच पण त्याहुन जास्त वर्षभर आभ्यास करण्यासाठी काही साहित्य देखील गरजेच आहे. याच गोष्ठीची जान ठेऊन , प्रत्येक वर्षी न चुकता हा सामाजिक उपक्रम सचिन मानवतकर सोशल फ़ाऊंडेशन तर्फे घेण्यात येतो.

याहि वर्षी हा अनोखा उपक्रम विशेष मान्यवरांच्या उपस्थिति मध्ये दिमाखात पार पडला. या वेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सचिन मानवतकर यांना जी सामाजिक काम करत असताना समाजाप्रती आस्ता व आपुलकी आहे त्याच सामाजिक व प्रामाणिक भावनेतुनच सचिन मानवतकर प्रतिवर्षी वस्ती भागातिल गरीब विद्यार्थी साठी विशेष सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्या साठी माझ्या शुभेच्छा नेहमी मानवतकर यांच्या सोबत आहेत आणि कायम राहतील अशा भावना व्यक्त केल्या.

या वेळी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी देखील मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वता सचिन मानवतकर यांची पुर्ण जडघडन वस्ती भागामध्ये झालेली असल्या मुळे. त्यांना वस्तीभागतील विद्यार्थींना शिक्षण घेत असतना काय काय अडचनींना सामोरे जाव लागत याची जान आहे. याच भावनेतुन ते हा उपक्रम नेहमी राबवतात. त्यांनी समाज्यासाठी असेच भविष्यात देखील समाजकार्य करावे.

या वेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी नगरसेवक सनी निम्हण, छ.शिवजी नगर अध्यक्ष- गणेशजी बगाडे, सचिन मानवतकर, मिटुशेठ घडसिंग, काका गरबडे, विकास लोंढे, सुरज गायकवाड, प्रमोद कांबळे, मिनाताई गायकवाड, कुंभारताई, वनमालाताई कांबळे उपस्थित होते.

]]>
मनसेच्या वतीने गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप… https://maknews.live/archives/16593?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2597%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25b5%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a Sun, 07 Jul 2024 17:24:51 +0000 https://maknews.live/?p=16593

औंध :

मनसेच्या वतीने गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप या बोध वाक्यावर आधारित, महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने ३८ औंध रोड, बोपोडी, व इंदिरा-कस्तुरबा वसाहत आदी परिसरातील इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.

मनसे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी किशोर वाघमारे, विश्वास केदारी, वैशाली चव्हाण, काका गरबडे, निलेश जुनवणे, विशाल पवार, विजय बोरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन औंध रोड शाखाध्यक्ष मयूर बोलाडे,जितेंद्र कांबळे, उपविभाग अध्यक्ष दत्तात्रय रणदिवे, जनाई दत्तात्रय रणदिवे यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश धोत्रे, सिद्धांत अडसूळ, समीर शेळके, राहुल भोसले, सुशील कापसे, निलेश बोलाडे यांनी केले.

]]>
मनसेच्या वतीने सुरक्षेसाठी चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशनला निवेदन https://maknews.live/archives/16468?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be Thu, 20 Jun 2024 02:17:12 +0000 https://maknews.live/?p=16468

औंध :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औंध येथील धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर चतु:र्श्रुंगी पुलिस स्टेशन चे वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री शैलेश संखे ह्यांना बंदोबस्त वाढवून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या म्हणुन निवेदन दिले.

महाराष्ट्र सरचिटणीस रणजित शिरोळे ,विभाग अध्यक्ष विनायक कोतकर ,नरेंद्र तांबोळी, उपविभाग अध्यक्ष नीलेश जुनवणे, आकाश धोत्रे, विशाल पवार, सुनील लोयारे, नीलेश रणदिवे आदी उपस्थित होते.

]]>
औंध मधील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करू : पोलीस आयुक्त अमितेश कुमार  https://maknews.live/archives/16463?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2594%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a7-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2597%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2587%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595 Tue, 18 Jun 2024 17:00:59 +0000 https://maknews.live/?p=16463

परिसरातील नागरीकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण ‌करू…!

औंध :

औंध परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासह जे शक्य आहे ते करु. परिसरातील नागरीकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण ‌करू,आज पासून महिनाभरात एक ही गुन्हा औंध परिसरात घडता कामा नये, तसेच औंध मधील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करु असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

औंध येथील समिर राॅय चौधरी यांच्या खुनाच्या घटनेनंतर नागरिकांनी केलेल्या कॅन्डल मार्च ची दखल घेत, व अँड. मधुकर मुसळे यांनी आयुक्तांची मंगळवारी सकाळी भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर लगेच संध्याकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वेस्टन मॉल चौक ते क्लारीअन पार्क सोसायटी पर्यंत पायी चालून समस्याचा आढावा घेतला व नागरिकांची संवाद साधला या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यावेळी अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ-४ चे उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शफिल पठाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आयुक्त म्हणाले की, परिसरात या घटनेमुळे निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना स्वाभाविक असून भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी आमचा प्रयत्न आहे. रस्त्यावर व पदपथावर कोणीही व्यवसाय करणार नाही व वाहतूकीला अडथळा ठरणार नाही यासाठी संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. औंध परिसराला शिस्त लावण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यासह गुन्हेगारानवर वचक राहण्यासाठी व्यूहरचना केली जाईल.परिसरातील फेरीवाले,

हातगाडी,पथारी व्यावसायिक, टप-या किंवा झोपडपट्टीच्या आसपास कुठलीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही‌ व संबंधितांवर कठोर कारवाई करावी यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत असेही ते म्हणाले.

याचबरोबर जेथे मारहाण झाली त्या घटनास्थळाची व वेस्टएंड चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान आयुक्तांनी ॲड.मधुकर मुसळे, माजी नगरसेवीकाअर्चना मुसळे व स्थानिक नागरिकांसह पायी चालत काही ठिकाणांची पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला.

या बैठकीत प्रसंगी बोलताना ॲड.मधुकर मुसळे यांनी सांगितले की, या घटनेमुळे भीतीमय वातावरण निर्माण झाले होते. परत लगेचच चोरीच्या घटना घडल्याने पुन्हा नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. गुन्हेगारीवर वचक बसण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. प्रकरण वाढण्यापुर्वीच सुरुवातीला गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी.

 

 

 

]]>