भारतानं इंग्लंविरुद्ध पहिला टी-20 सामना 50 धावांनी जिंकला.

0
slider_4552

इंग्लंड :

कसोटी मालिका पार पडल्यानंतर भारत आणि इंग्लंड आता टी २० सामन्यांमध्ये आपापली क्षमता सिद्ध करण्यासाठी जोर लावणार आहे. या मालिकेतील पहिला सामना साउथॅम्प्टनमधील ‘द रोज बाऊल’ स्टेडियममध्ये झाला. हा सामना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतानं इंग्लंविरुद्ध पहिला टी-20 सामना 50 धावांनी जिंकला.

सामन्यात हार्दिकनं फलंदाजीसह गोलंदाजीनंही (51 धावा, 4 विकेट्स) कमाल दाखवलीय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतानं इंग्लंडसमोर 20 षटकात 8 विकेट्स गमावून 199 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्यु्त्तरात इंग्लंडच्या संघाला 148 धावापर्यंत मजल मारता आली. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडच्या डावातील पहिल्याच षटकात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं आक्रमक फलंदाज जोस बटलरला शून्यावर बाद करून माघारी घाडलं. दरम्यान, युवा गोलंदाज अर्शदीप सिंहनं त्याच्या कारकिर्दीतील पहिलं षटक निर्धाव फेकून इंग्लंडवर दबाव टाकाला. त्यानंतर हार्दिक पांड्यानं जेसन रॉय, डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करनला आपल्या जाळ्यात अडकवत सामना भारताच्या बाजूनं झुकवला. दरम्यान, इंग्लडचा संघ 20 षटकात 148 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून मोईन अलीनं सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. भारताकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंहनं प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, हर्षल पटेलला एक विकेट्स मिळाली.

साउथॅम्प्टनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (14 चेंडू 24 धावा) आणि युवा फलंदाज ईशान किशन (10 चेंडू 8 धावा) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर दीपक हुडा आणि सुर्यकुमार यादवनं संघाच डाव सावरला. परंतु, 17 चेंडूत 33 धावांची छोटीशी वादळी खेळी करत दीपक हुडा आऊट झाला. त्यानंतर 11.4 षटकार सुर्यकुमारही (19 चेंडूत 39 धावा) बाद झाला. दीपक हुडा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यानं चांगली खेळी केली.परंतु, सतराव्या षटकात अक्षर पटेलच्या रुपात भारताला पाचवा धक्का लागला. त्यानंतर अठराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिकही आऊट झाला. त्यानं 33 चेंडूत 51 धावा केल्या. दरम्यान, भारतानं इंग्लंडसमोर षटकात 8 विकेट्स गमावून धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनला प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाल्या. तर, रीस टोपले, मॅथ्यू पार्किन्सन आणि टायमल मिल्स यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

See also  जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेट साठी कर्णधार.