अमोल बालवडकर फाऊंडेशन च्या माध्यमातून “शाळा परिसर ट्रॅफिक फ्री अभियान” ला सुरुवात.

0
slider_4552

बालेवाडी :

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-औंध शालेय परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळकर साहेब यांना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पत्र दिले. तसेच या परिसरातील सर्व शाळांनाही ट्रॅफिक समस्येवर पत्रव्यवहार केलेला आहे. वाहतूक कोंडी मुळे शालेय वाहतूक वेळेवर पोचत नाही. त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. म्हणून अमोल बालवडकर फाऊंडेशन च्या माध्यमातून “शाळा परिसर ट्रॅफिक फ्री अभियान” राबविण्यात येत आहे. आज त्यांनी बाणेर येथील ऑर्किड स्कूल येथे वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांना घेवुन भेट देवून स्कूल मुख्याध्यापक व व्यवस्थापनाशी वाहतूक नियोजन संबंधित चर्चा केली.

याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व नागरिकांनी यासंदर्भात वारंवार तक्रार केली असून ही दैनंदिन होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने योग्य ती उपाययोजना करून विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास हा सुखकर करावा अशी विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना केली आहे. तसेच यावेळी सदरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपणास अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने देखील सहकार्य केले जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळकर यांना दिले.

तसेच आज बाणेर येथील ऑर्किड स्कूलला भेट देऊन यावेळी शाळा परिसरात स्कुल बस व पालकांच्या गाड्यामुळे होणार्या वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्याकरीता सविस्तर चर्चा केली. यावेळी शाळेच्या परिसरातील ड्राईव्ह वे चा वापर पालकांनी मुलांना शाळेत सोडवताना व नेताना करुन मुख्य रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्यास मदत करावी अशी विनंती केली.

यावेळी शक्य होईल तितक्या अधिकाधिक पालकांनी आपली मुले शालेय प्रशासनाच्या स्कुल मधुनच शाळेत पाठवावी अशी संकल्पना देखिल शाळेकडुन राबविण्यात येत आहे. ॲार्किड स्कुल प्रशासनाकडुन हि वाहतुक कोंडी सोडविण्याकरीता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे व्यवस्थापकांनी सांगितले.

अमोल बालवडकर पुढे म्हणाले की, बाणेर बालेवाडी भागातील विबग्योर हायस्कूल, भारती विद्यापीठ हायस्कूल, एसकेपी कॅम्पस, मिटकॉन या स्कूल व्यवस्थापनाला भेटून शालेय वाहतुक योजना बाबत चर्चा करून परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरता “शाळा परिसर ट्रॅफिक फ्री” अभियानांतर्गत प्रयत्न करणार आहे.

See also  जागतिक डॉक्टर दिनानिमित्त बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचा सन्मान. 

यावेळी माझ्यासमवेत शाळेच्या मुख्याद्यापिका सौ.संगिता कपुर मॅडम, व्यवस्थापिक सौ.कुमार मॅडम, श्री.सुनिल काळे सर, वाहतुक शाखेचे काकडे साहेब, धानेवाड साहेब, अनिल प्रधान उपस्थित होते.