इंग्लंड :
जसप्रीत बुमराहच्या हाती पहिल्यांदाच टीम इंडियाची कमान दिली गेली आहे. 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे होणार्या इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) कसोटीत तो कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारणार आहे.
नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आयसोलेशनमध्ये आहे आणि त्याच्या खेळण्याची परिस्थिती नाही. म्हणून जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. आणि ऋषभ पंत या सामन्यासाठी उपकर्णधार असेल.
कपिल देव यांच्यानंतर बुमराह हा भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. कपिलने अखेरची 1987 मध्ये संघाची जबाबदारी स्वीकारली होती. म्हणजेच 35 वर्षांनंतर हा योगायोग घडला आहे. बुमराहने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत पहिल्यांदाच ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याला आयर्लंडविरुद्ध कर्णधारपदाची संधी मिळाली.
जसप्रीत बुमराहच्या क्रिकेटमध्ये आगमनाची कहाणी बहुतेक खेळाडूंप्रमाणेच संघर्षाची आहे. तो 5 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. 28 वर्षीय जसप्रीत बुमराहने मार्च 2013 मध्ये मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी पहिला टी-20 सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 20 धावांत एक विकेट घेतली. मात्र, या सामन्यात गुजरातने महाराष्ट्राचा 8 गडी राखून पराभव केला. त्याच वर्षी त्याला मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये 2 सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ३ विकेट्सही घेतल्या. 2014 मध्ये 11 आणि 2015 मध्ये 4 सामने खेळले. पण 2016 पासून तो मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू बनला. त्याने मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत 120 सामन्यांत 145 बळी घेतले आहेत. 10 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने दोनदा 4 आणि एकदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.